मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्याच्यातला नास्तिक माणूस ..!!

प्रकाश१११ · · जे न देखे रवी...
मुलगा असतो परदेशात नि ती दोघे एकटीच असतात संध्याकाळची वेळ असते ती देवाजवळ नेहमी प्रमाणेच हात जोडून प्रार्थना करीत असते देवाजवळची समई तिचा प्रसन्न प्रकाश फोटोतील देवाच्या चित्रावरून परावर्तीत होऊन मंद मंद पसरत असतो सगळीकडे ...सर्वत्र ..! तिच्या चेहर्यावर .... कोठे कोठे फुलत जातो तो देवाकडे नुसताच बघत बसतो त्याने त्याच्या ओंजळीत काय काय टाकले ते शोधत बसतो .....! ती भाबडेपणे काही काही मागत बसते देवाजवळ मुलांचे सुख ...! त्यांच्या साठी आरोग्य...!! जेथे आहेत तेथे सुखी राहावे म्हणून तिची ओंजळभर प्रार्थना आणि स्वतासाठी त्यांच्या सुखांत स्वताचे सुख शोधीत बसते आणि तो मात्र शांतपणे तिच्या मागणीला अनुमोदन देत असतो हलकेच मनातल्या मनात देवा तिची साधना सफल संपूर्ण कर असे विनवत असतो त्याच्यातला नास्तिक माणूस तिच्या प्रार्थनेपुढे नतमस्तक होत असतो .....!!

वाचने 2000 वाचनखूण प्रतिक्रिया 11

जाई. 05/09/2011 - 20:57
छान वाटल कविता वाचून. नास्तिकातला आस्तिकपणा छान पकडलाय.

नगरीनिरंजन 05/09/2011 - 22:38
>>त्याच्यातला नास्तिक माणूस तिच्या प्रार्थनेपुढे नतमस्तक होत असतो ही कल्पना खूप आवडली. इतरवेळी देवाच्या मूर्तीसमोर वाकावंसं वाटत नाही पण आजीच्या घरी महालक्ष्मी बसतात तेव्हा अगदी साष्टांग नमस्कार का घातला जातो याचे उत्तर मिळाले.