वाळू
वाळू
समुद्रकाठावरची वाळू अन वाळवंटातली वाळू.
दोन्ही वाळूचेच प्रकार
पण दोन्हीतले स्वभाव किती भिन्न...
एक थंड तर एक उष्ण
एक पाण्याशी जवळीक साधणारी तर
दुसरी पाण्याशिवाय राहणारी
एकीवर थंडवारे वाहतात तर दुसरीवर उष्ण
एकीवर सुंदर सुंदर दृष्य असणारी झाडे, वने, निसर्ग
तर दुसरी रुक्ष, तापलेली, वैराण जागा
.
.
.
.
कधी कधी वाटते की,
तुझ्या अन माझ्या स्वभावातही इतकेच अंतर आहे काय?
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०२/०९/२०११
लेखनविषय:
याद्या
1730
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
माझे ही दोन शब्द
भले बहाद्दर शिघ्रकवी येथे
In reply to माझे ही दोन शब्द by निनाद
आणि काहीच्या काही कविता - अजून एक
अभिनंदन!!
In reply to आणि काहीच्या काही कविता - अजून एक by निनाद
हाय हाय हाय.... कलेजा खल्लास
पाषाणभेद अप्रतिम कविता...
वाह !