Skip to main content

वाळू

वाळू

Published on शुक्रवार, 02/09/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
वाळू
समुद्रकाठावरची वाळू अन वाळवंटातली वाळू. दोन्ही वाळूचेच प्रकार पण दोन्हीतले स्वभाव किती भिन्न... एक थंड तर एक उष्ण एक पाण्याशी जवळीक साधणारी तर दुसरी पाण्याशिवाय राहणारी एकीवर थंडवारे वाहतात तर दुसरीवर उष्ण एकीवर सुंदर सुंदर दृष्य असणारी झाडे, वने, निसर्ग तर दुसरी रुक्ष, तापलेली, वैराण जागा . . . . कधी कधी वाटते की, तुझ्या अन माझ्या स्वभावातही इतकेच अंतर आहे काय? - पाषाणभेद (दगडफोड्या) ०२/०९/२०११
लेखनविषय:

याद्या 1730
प्रतिक्रिया 7

समुद्रकाठावरची वाळू किती भासे कनवाळू अन वाळवंटातली वाळू किती असे ती पायजाळू एक कोरडी उष्माळू भिन्नत्व दोन्हीत आले मला कळू . . . जाणीव ही मनी हळूहळू ती अन मी, असे दूर नि जवळू

समुद्रकाठावरची वाळू किती भासे कनवाळू चला मिळून गावठी गाळू लागली ही धारही गळू जशी गंगा झुळुझुळू सारे मिळून आता झुलू गावठी आणि व्हिस्की भिन्नत्व आले मला हो कळू जाणीव होते तनी हळूहळू नका हो मला असे टाळू संपादकास आले कळू विडंबने नको, आता दूर पळू -निनाद

हाय हाय हाय.... कलेजा खल्लास हो गया...वाहव्वा...आखरी बॉल पे क्या सिक्सर मारा है... @कधी कधी वाटते की, तुझ्या अन माझ्या स्वभावातही इतकेच अंतर आहे काय?

पाषाणभेद अप्रतिम कविता... अवांतर : अलिकडे तुम्ही वेगळ्या शैलीत कविता लिहित आहात.. आणि त्या शैलीतही तुम्ही खुप छान कविता लिहिशुभेच्छा. असेच लिहित रहा... वाचत आहे

पाषाणभेद आणि वाळू हे काँबीनेशनच आवडून गेले एकदम.