गणपतीची आरती

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
1 Sep 2011 - 11:04 am

Ganesh

गणपतीची आरती

जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा
आरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥

वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी
कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी
खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥

पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची
नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची
रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥

तूच बाप,माय तुचि, आम्ही तुझी लेक
एक आस जीवनास, पंथ दावी नेक
अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥

गंगाधर मुटे
................................................

कविता

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

1 Sep 2011 - 1:27 pm | आशु जोग

वाह छान !

नगरीनिरंजन's picture

1 Sep 2011 - 1:42 pm | नगरीनिरंजन

आरती चांगली गेय जमली आहे पण काही शब्द खटकले.
नरेश हा शब्द गणपतीसाठी वापरावा की नाही? नरेश हा शब्द आपण राजा या अर्थी वापरतो.
शिवाय "आम्ही तुझी लेक" हे वृत्तासाठी केले आहे का? आम्ही तुझी लेकरे चांगले वाटले असते.

अर्धवटराव's picture

1 Sep 2011 - 11:15 pm | अर्धवटराव

छान आहे आरती... बाप्पा खुष होतील ऐकुन :)

अर्धवटराव

पर्णजुडी हरळीची ??

तृण्जुडी हरळीची, कस वाटत्य?

आरती छान्च.

गंगाधर मुटे's picture

2 Sep 2011 - 7:27 pm | गंगाधर मुटे

नगरीनिरंजनजी आणि अपर्णाजी,

तुमच्या सुचना योग्य आहेत. पण ही आरती माझ्या रानमेवा या काव्यंसग्रहात प्रकाशीत झाल्याने आता बदल करू शकणार नाही.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद. :)

गंगाधर मुटे's picture

24 Aug 2017 - 4:39 pm | गंगाधर मुटे

गणपती बाप्पा मोरया :)

मोदक's picture

24 Aug 2017 - 5:37 pm | मोदक

मंगलमुर्ती मोरया :)

गंगाधर मुटे's picture

2 Sep 2019 - 9:10 am | गंगाधर मुटे

गणपती बाप्पा मोरया !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2019 - 9:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या कुठेय, पत्ता द्या. ;)

-दिलीप बिरुटे