क्षण एक पुरे जगण्यास खरा
क्षण एक पुरे जगण्यास खरा
जगणे कसले शतवर्ष नरा?
क्षण एक पुरे जगण्यास खरा
लपवून व्यथा रडतोय मनी
दिसतोच सदा मुखडा हसरा
जगणेच नको असले तसले
परसात पडून जणू कचरा
मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा
श्रमतो, दमतो, शिणतो पुरता
परिहार जणू जुळता नजरा
दिसतात इथे जन सज्जन हे
अपुलाच स्वभाव नसेल बरा
रुळताच मनी भलतेसलते
पुसतात कशास हवा नवरा
वरदान मिळो "अभया"त जगा
दररोज घरात जणू दसरा
- गंगाधर मुटे
----------------------------------
वृत्त :तोटक
रदीफ : गैरमुरद्दफ
----------------------------------
मरणास इथे नच घाबरतो असते
सुन्दर विचार
गैरमुरद्दफ म्हणजे रदीफ नसलेली
कविता/गझल -
सर्वांना प्रतिसादाबद्दल
पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११
ही गझल प्रकाशित झाली आहे. ----------------------------------