क्षण एक पुरे जगण्यास खरा
जगणे कसले शतवर्ष नरा?
क्षण एक पुरे जगण्यास खरा
लपवून व्यथा रडतोय मनी
दिसतोच सदा मुखडा हसरा
जगणेच नको असले तसले
परसात पडून जणू कचरा
मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा
श्रमतो, दमतो, शिणतो पुरता
परिहार जणू जुळता नजरा
दिसतात इथे जन सज्जन हे
अपुलाच स्वभाव नसेल बरा
रुळताच मनी भलतेसलते
पुसतात कशास हवा नवरा
वरदान मिळो "अभया"त जगा
दररोज घरात जणू दसरा
- गंगाधर मुटे
----------------------------------
वृत्त :तोटक
रदीफ : गैरमुरद्दफ
----------------------------------
वाचने
1650
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
मरणास इथे नच घाबरतो असते
मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा
सुरेख... :)
सुन्दर विचार
सुन्दर विचार सुरेख गुम्फले आहेत.
पण रदीफ : गैरमुरद्दफ म्हणजे काय ?
गैरमुरद्दफ म्हणजे रदीफ नसलेली
In reply to सुन्दर विचार by अगोचर
गैरमुरद्दफ म्हणजे रदीफ नसलेली गझल. :)
रदीफ म्हणजे
पहिल्या व्दिपदीतील दोन्ही ओळीच्या शेवटी
व
त्यानंतर प्रत्येक व्दीपदीच्या खालच्या ओळीत शेवटी
हमखास येणारा शब्द किंवा शब्दसमुह.
जसे की,
गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही
फुलल्या फुलास नाही, थोडी तमा कळीची
एका स्वरात गाणे, साथीत गात नाही
कविता/गझल -
दिसतात इथे जन सज्जन हे
अपुलाच स्वभाव नसेल बरा
द्विपदी आवडली.
सर्वांना प्रतिसादाबद्दल
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :)
पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११
----------------------------------

पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११
ही गझल प्रकाशित झाली आहे.
----------------------------------