बदल होतोय कित्येक दशक होत आहे
अनुभवांचे लेणे आता विदुषक होत आहे.
कळले हे कि "काळाचा महिमा अगाध",
मद्याचा प्यालाही मानाचा चषक होत आहे
आंधळ्या राजाची ही आंधळी प्रजा आहे
चक्क मुकाही इथे उदघोषक होत आहे
तिला हि सवय अन त्याला सवय आहे
नजरेने ठार करणे बेलाशक होत आहे
नम्र मांजरी माना झुकवत आहे आता
घंटा गळ्यात बांधणारा मुषक होत आहे
वाचने
1816
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप अर्थपुर्ण कविता. छानच.
कन्सेप्ट चांगली आहे पण
विषय चांगला आहे पण..
धन्यवाद!!!
zakaas... Great..
In reply to धन्यवाद!!! by अभिजीत राजवाडे
काही कल्पना आवडल्या
मस्त