Skip to main content

अहो आण्णा ...

अहो आण्णा ...

Published on 20/08/2011 - 09:37 प्रकाशित मुखपृष्ठ
आण्णा, उपास करून करून एक होईल तुमची मान पाठ पिझ्झा खात उपोषण लाइव्ह बघाणार्यांशी तुमची गाठ ... फेसबुक वर लाईक करून तुम्हाला पाठींबा देणारी हि जमात निवडणुकीच्या लॉंग वीकएंडला पळते सहकुटुंब रानावनात ... दोन दिवस मी देखील पुरवली माझी मोर्च्याची निषेधाची खाज ५ ची टोपी २० ला विकत घेताना अजिबात बाळगली नाही लाज उधारीची मेणबत्ती घेऊन काल बर्याच दिवसांनी इतका चाललो शेवटी थकून २० रुपये ज्यादा देऊन रिक्षेने डायरेक्ट घरी आलो ... अहो कुणाच्या भरवश्यावर आणि किती दिवस हे चालणार वेळ आली कि सगळेच जण नैतिकता चुलीत घालणार ... शेवटी आम्ही पडलो सामान्य, आम्हात परिवर्तनाची काय कुवत आमच्या घरादारात, मनामनात शिरले आहे हे कडू कॉंग्रेस गवत आण्णा, उपास करून करून एक होईल तुमची मान पाठ पिझ्झा खात उपोषण लाइव्ह बघाणार्यांशी तुमची गाठ ... - विश्वेश
लेखनविषय:

याद्या 2119
प्रतिक्रिया 12

:) आवडले.. कालच "मी अण्णा" अशी टोपी घातलेल्या रिक्षावाल्याने मीटरप्रमाणे भाडे घ्यायला दिलेला नकार ऐकून (योगायोगाने मागुनच येणारी) बस पकडून घरी आलो :)

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेशा, तू अंमळ अडाणी आहेस बरे. प्रत्येक जण 'इतरांच्या' भ्रष्टाचाराबाबत आंदोलन करत आहेत. आपण स्वतः व्याख्येनुसार स्वच्छ असतोच. आणि तसेही गंगेत बुडी मारली की पापक्षालन होते ना मग 'मी अण्णा' म्हटले की मी भ्रष्टाचारमुक्त होतोच. गंगेत पापक्षालन करून आलेले नवी पापे करायला मोकळे होतात हे ठाऊक नाही? अवांतर: मटामधील सुहास फडकेंचा ब्लॉग वाचलात का?

अहो कुणाच्या भरवश्यावर आणि किती दिवस हे चालणार वेळ आली कि सगळेच जण नैतिकता चुलीत घालणार ... सुंदर... :) शेवटी आम्ही पडलो सामान्य, आम्हात परिवर्तनाची काय कुवत आमच्या घरादारात, मनामनात शिरले आहे हे कडू कॉंग्रेस गवत अप्रतिम... परवा गोपाळकाला आहे, त्या निमित्त्याने अण्णा कॉग्रेसची हांडी फोडतील का त्याची वाट बघतोय. ;) (अण्णांचा समर्थक आणि भ्रष्टाचारानी विटलेला )

अहो कुणाच्या भरवश्यावर आणि किती दिवस हे चालणार वेळ आली कि सगळेच जण नैतिकता चुलीत घालणार ... सुंदर.. आवडेश !!

अगदी खरी आहे तुमची कविता!

खरंय. पटले. कविते च्या माध्यमाने सर्वांमधे जागरुकता निर्माण करण्याचा आगळाच प्रयत्न. अर्थात, आपण सर्व नागरिकांनी एकजुट होऊन हताश न होता प्राबळ्य दाखविले पाहिजेच. इंटरनेट च्या या युगात, हे आंदोलन कदाचित स्वातंत्र आंदोलना सारखे अंगावर रोम उभे करणारे वाटत नसेलही, परंतु डोळे मिटून का जर स्वतः ला विचारले तर प्रामाणिक उत्तर प्रत्येकाला प्रत्येकाचे कळेलच. कविता छानच.

काय खर आहे, खर आहे लावल आहे सर्वान्नी? हेच तर चुकत आहे - encourage, participate करायच सोडुन उत्साही लोकान्ना मागे खेचायच :-( underestimating the power of ppl - सामान्य म्हने :-(