अहो आण्णा ...
आण्णा, उपास करून करून एक होईल तुमची मान पाठ
पिझ्झा खात उपोषण लाइव्ह बघाणार्यांशी तुमची गाठ ...
फेसबुक वर लाईक करून तुम्हाला पाठींबा देणारी हि जमात
निवडणुकीच्या लॉंग वीकएंडला पळते सहकुटुंब रानावनात ...
दोन दिवस मी देखील पुरवली माझी मोर्च्याची निषेधाची खाज
५ ची टोपी २० ला विकत घेताना अजिबात बाळगली नाही लाज
उधारीची मेणबत्ती घेऊन काल बर्याच दिवसांनी इतका चाललो
शेवटी थकून २० रुपये ज्यादा देऊन रिक्षेने डायरेक्ट घरी आलो ...
अहो कुणाच्या भरवश्यावर आणि किती दिवस हे चालणार
वेळ आली कि सगळेच जण नैतिकता चुलीत घालणार ...
शेवटी आम्ही पडलो सामान्य, आम्हात परिवर्तनाची काय कुवत
आमच्या घरादारात, मनामनात शिरले आहे हे कडू कॉंग्रेस गवत
आण्णा, उपास करून करून एक होईल तुमची मान पाठ
पिझ्झा खात उपोषण लाइव्ह बघाणार्यांशी तुमची गाठ ...
- विश्वेश
लेखनविषय:
याद्या
2119
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
:) आवडले..
हा हा हा
In reply to :) आवडले.. by ऋषिकेश
अरेरे
In reply to :) आवडले.. by ऋषिकेश
हाहा
In reply to :) आवडले.. by ऋषिकेश
सुन्दर कविता, खरच जर लोकपाल
अहो कुणाच्या भरवश्यावर आणि
सुंदर.. आवडेश !!
नेमकेपणाने मांडलेले कटु सत्य
खरय
खरंय. पटले. कविते च्या
चुक
१००% खरंय!! छान लिहिली आहे