खूप पायवाट चालून आलो
खूप चढण चढून झाली
मागे वळून बघतो तेव्हा
आम्ही खूप सुखी होतो
असे खरेच वाटून जाते
असे मनात अलगद येते
कठीण होते सगळे जगणे
तरी खूप सुख होते
एक खांबी तंबू होता
तरी मनगटात जोर होता
तसा शप्पत घोर नव्हता
पाठीवरती हात होता
भक्कम असा आधार होता
हे शप्पत खरे होते .....!! !
काय केले बायकोसाठी ..?
कधीतरी गजरा आणला
तेवढ्याने ती तृप्त होती
माझ्या फाटक्या संसारात
शप्पत ती सुखी होती .....
एखादी साडी दिवाळीला
तेवढी ती पुरवीत असे
शब्दांचे कौतुक
तेवढे तिला पुरे असे
आता बघतो सगळी कडे
परदेशात आलो आहे
नि आजची पोरे बघतो आहे
घर आहे , गाडी आहे
छोटा असा संसार आहे
दोघेही शिकलेली
भक्कम अशी हुशार आहेत
परदेशात स्थिर आहेत
डोळ्यासमोर ध्येय आहे
मनामध्ये स्वप्न आहे
कसे कुणास ठाऊक
उगाच माझ्या मनात येते :
कोठल्यातरी दडपणाखाली
दबलेली.... थकलेली ..!!
एकटेच संसाराचा गाडा ढकलीत आहेत ...
पाठीवर हात ठेवून
धीर द्यायला कोण आहे ..?
ह्या परदेशात पोरे अगदी एकटी ..!
अगदी एकटी आहेत ......!!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1880
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाठीवर हात ठेवून धीर द्यायला
माफ करा प्रकाश साहेब! पण
प्रतिसादातील मताबद्दल आदर
In reply to माफ करा प्रकाश साहेब! पण by उदय के'सागर
नेहमीचेच परदेशरुदन दिसले इथे.
प्रकाश दा, कविता मस्तच आहे.
....... बापाच ह्रद्य आक्रदन
चांगली कविता
ओ भावजी,
In reply to चांगली कविता by सहज
मला तरी कविता आवडली बुवा!