तळतेस भजी तू जेव्हां -
(चाल: नसतेस घरी तू जेव्हां -)
तळतेस भजी तू जेव्हां -
जीव 'सुटका सुटका' म्हणतो..
मिरच्यांचे वरती तुकडे
तोंडात घास का फिरतो ?
बघ फेटून पीठ- कसाही
का गोळा कच्चा जळतो !
ही जिव्हा रुचीहीन होते -
अन् तोंड पोळता कण्हतो !
येताच कुणी दाराशी..
क्षणभरात सरती मागे
खिडकीशी धुरकट वारा-
तो वांधा करून जातो !
तव तेलीं विरघळणाऱ्या
मज दिसती कायम गुठळ्या -
त्रासाधिन खारट गोळे
मी तसाच गुपचचुप खातो !
तू लांब सखे मज धाड
नच सांगू ही भजी खाण्या -
कढईचा जीव उगाच..
माझ्यासह कुरकुर करतो !
का अजून गॅसही मोठा !
ना तंत्रच जमले अजुनी ?
भजी का तू तळतच पिडते -
भजी खाऊन जीवच रडतो !!
आवडलं
छान
+१
+१
ह्हा ह्हा ह्हा....कडक
ह्हा ह्हा ह्हा....कडक
मस्तच !
वा!
सही विडंबन.. च्यायला सुरात
अरेरे !! काय ही दारूण आवस्था
जबरदस्त.. आवडेश !!
भारी.......!!!!
झक्कास जमले आहे विडंबन.
कडक घाणा...
क ड क खुसखुशीत
+१
झक्कास