(चाल: नसतेस घरी तू जेव्हां -)
तळतेस भजी तू जेव्हां -
जीव 'सुटका सुटका' म्हणतो..
मिरच्यांचे वरती तुकडे
तोंडात घास का फिरतो ?
बघ फेटून पीठ- कसाही
का गोळा कच्चा जळतो !
ही जिव्हा रुचीहीन होते -
अन् तोंड पोळता कण्हतो !
येताच कुणी दाराशी..
क्षणभरात सरती मागे
खिडकीशी धुरकट वारा-
तो वांधा करून जातो !
तव तेलीं विरघळणाऱ्या
मज दिसती कायम गुठळ्या -
त्रासाधिन खारट गोळे
मी तसाच गुपचचुप खातो !
तू लांब सखे मज धाड
नच सांगू ही भजी खाण्या -
कढईचा जीव उगाच..
माझ्यासह कुरकुर करतो !
का अजून गॅसही मोठा !
ना तंत्रच जमले अजुनी ?
भजी का तू तळतच पिडते -
भजी खाऊन जीवच रडतो !!
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडलं
विडंबन आवडलं! :)
छान
वेगळ्या, कुरकुरीत विषयावरचं विडंबन आवडलं. अजून येऊ द्यात.
+१
In reply to छान by राजेश घासकडवी
असेच म्हणतो!
+१
In reply to +१ by विकास
असेच म्हणते
ह्हा ह्हा ह्हा....कडक
लई झ्याक जमली बगा भट्टी...पहीला घाना आवडला...फुडचा येउंद्या लवकर...जीभ पानी गाळाया लागली...ह्ही ह्ही ह्ही...:tongue:
ह्हा ह्हा ह्हा....कडक
लई झ्याक जमली बगा भट्टी...पहीला घाना आवडला...फुडचा येउंद्या लवकर...जीभ पानी गाळाया लागली...ह्ही ह्ही ह्ही...:tongue:
मस्तच !
मस्तच !
वा!
जमलं, आणखी येऊ द्या!
सही विडंबन.. च्यायला सुरात
सही विडंबन..
च्यायला सुरात आळवल्यावर बाकी लोक पाहायला लागले ना रे..
- पिंगू
अरेरे !! काय ही दारूण आवस्था
अरेरे !! काय ही दारूण आवस्था ?
म्हणजे तुमचं भज्यां साठी दाही दिशा .... असं असतं कि काय ?
विडंबन चांगलं जमुन आलय ... अगदी सिंहगडावरच्या 'बाळू चा धाबा' मधे मिळणार्या खेकडा भज्यांसारखं .
जबरदस्त.. आवडेश !!
जबरदस्त.. आवडेश !!
भारी.......!!!!
भारी.......!!!!
झक्कास जमले आहे विडंबन.
झक्कास जमले आहे विडंबन.
कडक घाणा...
करपलेल्या "कार्बन" भज्यांवरचं विडंबन झ्याक जमलंय, राव... बाकी सध्या अगदी "भजाळलेलं" वातावरण आहे, नाही !?
येवू द्यात आणखी...
क ड क खुसखुशीत
क ड क
खुसखुशीत
+१
In reply to क ड क खुसखुशीत by वपाडाव
खुसखुशीत विडंबन!
झक्कास
झक्कासच आहे.. :-)
अजून येऊद्या..