गात येथे तू उगा का थांबलेला
गात येथे तू उगा का थांबलेला
वाहवा तो करुन मारा पेंगलेला !
जाउ दे त्याला किती उंचावरीही -
दोर आम्ही नीट त्याचा कापलेला
तोंड भरुनी मानलेला जो सलोखा
पाठ फिरताना गळा का दाबलेला ?
काल माशी ना उठे नाकावरीची -
आज मिरवी शूर नेता गाजलेला !
शांतिचा नारा घुमे दाही दिशांना
नेम तो जनतेवरी का रोखलेला ?
शांतिचा नारा घुमे दाही
दुसरे कडवे कळले नाही. जरा
महत्वाकांक्षेला खीळ -