Skip to main content

गात येथे तू उगा का थांबलेला

लेखक विदेश यांनी गुरुवार, 28/07/2011 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
गात येथे तू उगा का थांबलेला वाहवा तो करुन मारा पेंगलेला ! जाउ दे त्याला किती उंचावरीही - दोर आम्ही नीट त्याचा कापलेला तोंड भरुनी मानलेला जो सलोखा पाठ फिरताना गळा का दाबलेला ? काल माशी ना उठे नाकावरीची - आज मिरवी शूर नेता गाजलेला ! शांतिचा नारा घुमे दाही दिशांना नेम तो जनतेवरी का रोखलेला ?
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1489
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

दोराच्या सहाय्याने एखादा गिर्यारोहण करू इच्छितो, पण आमची मानवी वृत्ती त्याला थोडेच सुखासुखी सहजासहजी ध्येय प्राप्त करू देणार ? अडथळा आणणारच !