प्रेमाचा पंचनामा - २
लेखनविषय (Tags)
प्रेमाचा पंचनामा - १
अमरींदरने माउसची क्लिक क्लिक सुरू केली. फोल्डरच्या आत फोल्डर, फोल्डरच्या आत फोल्डर असला प्रकार सुरु झाला. आता हा काहीतरी डोळ्यांचे पारणे फीटेल असं काहीतरी दाखवणार हे माहिती होतं पण तरीही "फोल्डरच्या आत फोल्डर" प्रकाराने मला हसू आवरेना.
"अबे हस क्यू रहा पांडू", अमरींदर माझ्यावर उखडलाच. "
"यार, स्कुल इंजिनीयरींगमें मेरा एक दोस्त था. उसके घरपे पीसी था. वो उस पीसीमें ब्लू फिल्म्स ऐसेही फोल्डर के अंदर फोल्डर बनाके रखता था. सबसे बाहरके फोल्डर का नाम डेटा, उसके अंदरवालेका, असाईनमेंट, उसके अंदर प्रोजेक्ट. ऐसे पांच छे फोल्डरके बाद वो फिल्म की फाईल रहती थी"
"अबे करना पडता हैं यार. ये मेरा मशीन सारी दुनिया मेरेही क्रेडेंशियलसे अॅक्सेस करती हैं. और अपनी जनता बिना कुछ उंगली किये बिना कामही नहीं कर सकती. गलतीसें किसीके हाथ कुछ लग गया तो साला सारी दुनिया को बता देंगे"
एव्हाना अमरींदरने "कामाचं" फोल्डर ओपन केलं होतं. पठठयानं मोठा थंबनेल व्ह्यू सेट केला होता. हेसुद्धा मुलीचेच फोटो आहेत हे एव्हाना कळून चुकलं होतं. पण काहीतरी गंडलं होतं. फोटोंमध्ये दम नाही हे त्या थंबनेलवरुनच कळत होतं. पण तरीही मी धीर सोडला नव्हता. म्हटलं फोटो ओपन तर करु देत.
अमरींदर ने एक फोटो ओपन केला. ओम फस्स्स. पोपट झाला होता. चार पाच मुलींचा घोळका. सगळ्याच मुली अगदी अॅव्हरेज. माल अशी कुणी नव्हतीच. जिच्यावर कॅमेरा फोकस केला आहे असं वाटत होतं तीही अशीच. चारचौघींसारखी. आणि सर्वात वाईट म्हणजे ती मुलगी चक्क बुटकी होती. पाच फूट वगैरे असावी. अमरींदर नेक्स्ट नेक्स्ट करु लागला. पण सगळ्या फोटोंमध्ये फोकस त्या बुटक्या मुलीवर होता. आणि त्या मुलीत पाहण्यासारखं नव्हतं. कुठे ती भरदार निकिता मिश्रा आणि कुठे हा बुटका वांगा. साला सगळ्या मुडचा विचका झाला होता.
"क्या हैं बे ये? तू चिकन मटन छोडके घास कबसे खाने लगा?" मी वैतागत अमरींदरला विचारलं.
"राजश्री कोल्हटकर", अमरींदर अगदी शांतपणे म्हणाला.
"ये कौनसी तमाशावाली का नाम हैं? अबे झंडू, ढंगसे बता ना"
"बताया ना भाई ऊस लडकी का नाम."
"ओहोहो... तो आपने जिस परीके फोटो अभी दिखायें उसका नाम राजश्री कोल्हटकर हैं."
"हां" सरदार शांतच होता. माझ्या मात्र रागाचा पारा चढत चालला होता.
"कहां दिखायी दी तुझे ये हुस्न की परी?"
"ऑफीसके पिकनिकमें. अपनेही मुंबई टीम की हैं. वैसे पुना की हैं, कँपससे अपने मुंबई ऑफीसने उसे सिलेक्ट किया हैं."
"मतलब फ्रेशर हैं. एक बात बता. साले तू छे फुटका सांड, वोह पांच फुटकी बैंगन. किस अँगलसे तुझे वोह पसंद आयी?"
"मैने कब कहा की वोह मुझे पसंद हैं?"
"तो फालतू में क्यों उसके फोटो निकाले?"
"उसे इंप्रेस करने के लिये."
"अबे हलकट, ना वोह दिखने में ढासू हैं, ना तुझे वोह पसंद हैं. तो क्या झक मारने के लिये उसे इंप्रेस करना चाहता हैं?"
"साला तू कब समझेगा नही. कुछ भी ना हाथ लगनेसे अच्छा हैं, कुछ तो हाथ लगे."
आता मात्र माझी टयुब पेटली. सरदारचे ईरादे नेक दिसत नव्हते. बहुतेक पोरीकडून ग्रीन सिग्नल मिळालेला दिसतोय. खाओ खुजाओ बत्ती बुझाओ असा मामला दिसत होता. आणि बहूतेक पोरगी राजी दिसत होती. जाऊ दे तिच्याआयला, आपल्याला काय करायचंय म्हणून मग मी तो विषय डोक्यातून काढून टाकला.
... हळूहळू राजश्रीबद्दल माहिती कळू लागली. मुळची पुण्याची. कुठल्यातरी पेठेत राहणारी. फर्ग्युसनमधून बीसीयस आणि तिकडे पौड रोडच्या कुठल्यातरी कॉलेजमधून एमसीयस केलेलं. कँपसमधून बीसीयसच्याच क्वालिफीकेशनवर आमच्या मुंबई ऑफीसने सिलेक्ट केलं तिला. एमसीयस चालू असतानाच. मग एमसीयसचं एक सेमिस्टर बाकी असतानाच ऑफीसला जॉईन झाली. आमच्याच मुंबईच्या प्रोजेक्ट टीममध्ये. एमसीयसचं फायनल सेमिस्टर चालूच होतं तिचं. विकेंडला पुण्याला घरी यायची. असाईनमेंटस आणि प्रोजेक्ट करायची.
अर्थात यातली बरीचशी माहिती अमरींदरनेच सांगितली होती. आपल्याला तिच्याशी काही घेणंदेणं नव्हतं. अमरींदर ज्या मुलीवर हात साफ करण्याचा विचार करतोय ती मुलगीही तशीच असणार यात शंकाच नव्हती. नाही म्हणायला तिलाही मी पुणे टीमचा अॅडमीन कॉर्डीनेटर आहे हे कळून चुकलं होतं. राजश्री अधून मधून मला मेसेंजरवर पिंग करुन माझ्याशी ओळख वाढवायचा प्रयत्न करत होती. अर्थात हे ती "पुढे मागे पुण्याला ट्रान्सफर घेतल्यावर मदत मिळावी म्हणून" हेतूपुरस्पर करत होती. मी मात्र जेव्हढयास तेव्हढं बोलून तिला कटवत असे. च्यायला आपल्याला नकोय असल्या चालू पोरीशी ओळख.
अमरींदरची आणि राजश्रीची ओळख आता घट्ट होऊ लागली होती. निदान अमरींदर तरी तसं बोलून दाखवायचा. कदाचित आमच्यासमोर भाव खाण्यासाठीही असेल. पण ते दोघं रात्री बराच वेळ फोनवर बोलतात हे मात्र अनिकेतने, आमच्याच पुणे टीममधल्या एका पंटरने सांगितलं होतं. अनिकेत अमरींदरचा रुममेट. आणि लॉजिकल पोरगा. तो खोटं बोलण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही टीममधले सारे उपटसुंभ हे सगळं टीब्रेकमध्ये अगदी चवीनं चघळायचो. अमरींदरही सामिल व्हायचा आमच्यात. कारण त्यालाही काही फरक पडत नव्हता. त्याला फक्त हात साफ करायचे होते. नाही म्हणायला त्याचा एक कन्सर्न तो इनडायरेक्टली तो आम्हाला जाणवून देत होता, "साला अपनी मालपें कोई नजर नही डालेगा". च्यायला. हे बरं होतं त्याचं. म्हणजे तो सिरीयस वगैरे असता तिच्याबद्दल तर समजण्यासारखं होतं. पण हा तर स्वतःच आमच्याबरोबर गॉसिपमध्ये सामिल व्हायचा. आणि त्याचवेळी आम्ही तिच्यावर नजर टाकू नये अशीही अपेक्षा करायचा.
संध्याकाळची पाच साडेपाचची वेळ. बाजूच्या शॉपर्स स्टॉपमध्ये "हिरवळ" यायची ही वेळ. ऑफीसच्या पुढयातून जाणार्या जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरही छान माहौल असायचा. आम्ही टीममधले सारे खाली यायचो. चहा प्यायला. अर्थात चहा पिण्याचं केवळ निमित्त. खरा हेतू शॉपर्स स्टॉपची हिरवळ आणि मुंबई पुणे रस्त्यावरचा संध्याकाळचा माहौल असा दूहेरी नेत्रसुख मिळवणे हाच असायचा. ऑफीसच्या कंपाउंड वॉलवर बुडं टेकून बसायचं. हातात प्लास्टीकचे चहाचे कप. समोरुन भरधाव जाणार्या मोटारसायकल, बसेस, कार, स्कुटी आम्ही पाहायच्या. पाहायच्या म्हणजे नजरेसमोर दिसायच्या. आमचं लक्ष फक्त मोटारसायकलवर तरूणाला चिकटून बसलेल्या बुरखाधारी मुलींकडे असायचं. मागे बसलेल्या मुलीने मुलाला घातलेला हातांचा विळखा विवक्षित जागी पडलेला पाहून आम्ही उगाचच आपले उसासे टाकत बसायचो.
त्या दिवशीही आम्ही सारे असेच खाली आलो होतो. नेहमीचाच नजारा होता. नेहमीचंच हातांचे नको त्या जागी विळखे पाहून हळहळणं.
"देख ना साला माल लोग कैसे चिपकके बैठता हैं. अपना साला नसिबही गांडू हैं" अमरींदर शेवटी न राहवून बोललाच.
"साले सरदार, बातें तो तू बडी बडी करता हैं रें. फीर खाली फोकट नसिबको गाली क्यों दे रहा हैं?"
"अबे यार वो राजश्री..."
"उसका क्या?"
"साला जबभी बाईकपें पिछे बैठती हैं, बिचमें पर्स रख देती हैं यार. साला सारा पूना घुमाता हूं उसे लेकीन कुछ मतलब नही."
अरेरे... म्हणजे साहेब ज्या पोरीवर हात साफ करण्याची स्वप्ने पाहत होते, ती पोरगी साहेबांना हातही लावू देत नव्हती तर...
क्रमशः
प्रतिक्रिया
झकास... चालुद्या पुढे....
शिव्या म्हणजे तरुणाइच्या ओव्या
मस्त मस्त चालु दे येउ दे
छान ... असेच लिहित ... वाचत