Skip to main content

धग

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 12/07/2011 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या भावनांची धग; मी जाणीवपूर्वक कमी करतो आहे;.. जेणेकरून त्यांची झळ; तुला कधीच अस्वस्थ करणार नाही......... .......... मी जळालो तरी तुला कळणार नाही..... मला माहित आहे,....... दिवस ढळणार नाही, रात्र मावळणार नाही......... स्वप्नपंखात वाढणारं वारूळही; कधी कोसळणार नाही......... .........पण आभाळ फाटलं तरीही, आता ते गळणार नाही......... उन्हासोबत सावली; तसा वार्‍याबरोबर गंध येणार..... गाढ साखरझोपेतदेखिल; चाहूल तुझी देणार.............. सुखात तुझ्या; माझा मी; अंग मोडून पडणार.. चुकून आलंच वादळ-..... माझ्या अंगावरती घेणार....... घाबरू नकोस,......... ............चूक-भूल; देणे-घेणे; डोळे मिटूनच होणार...... सावरीचं कुंपण;.... फक्त आधाराला असणार............... ...........................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 976
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया