Skip to main content

कोंबडा आरवतो -

लेखक विदेश यांनी रविवार, 03/07/2011 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
कोंबडा आरवतो कुकूऽऽच कूऽक ऊठ बाळा आता झोप झाली खूऽप |१| कावळा करतो काव काव काव हास बाळा आता आईला बोलाव |२| चिमणीची चाले चिव चिव चिव सरकत बाळा आता बाबांना शिव |३| मोत्या भुंकतो भो भो भो बाळ आलं रांगत बाजूला हो |४| पोपट बोलतो मिट्टूऽऽमिया दुडुदुडु बाळ चाले बघायला या |५| मनीमाऊ म्हणते म्याऊ म्याऊ बाळाच्या गंमती बघायला जाऊ |६|

वाचने 2054
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आपण मिपाचे बालकवी आहात! (लो. टिळकांनी नारायण श्रीपाद राजहंस यांना "बालगंधर्व" म्हटले या चालीवर वाचावे.)

छान :)

मस्त मस्त... आमच्या छोट्या बाळाला पण ही कविता आवडली... :)