हेज्यायची कटकट...
बर्याच दिवसांनी काल माझी जात आठवली होती
सहज बोलता बोलता कोणीतरी तिची आठव काढली होती
आमची जात लागत नाही प्रवेशाला, फी माफीला की आंदोलनवाल्यांना
पैसा बक्कळ पडलाय, कोण विचारतोय आम्हा ओपनवाल्यांना
नाही, मान्य की देशाच्या गरीब जनतेचा उत्कर्ष झाला पाहिजे
पण मग आमच्याच शिटातला का बरं सगळ्यांना वाटा पाहिजे
आमचे शेजारचे सूचीतले गेल्याच महिन्यात फॉरेन ट्रीपवरून आले
पोराला फार शीण झालेला परीक्षेचा, त्याने चांगले ९०% की हो काढले
त्यांच्या सुपुत्राला मुंबईबाहेरील जागा नको होती म्हणून आग्रह धरला
आणि आरक्षण कोट्यातील जागेसाठी त्याने आपला फॉर्म भरला
आम्ही म्हटलं द्या ना काका सोडून ही जागा एखाद्या गरीबासाठी
च्यायचे काका डाफरले, म्हणाले काय बेणं बिनकामाचं लागलंय पाठी
दुसर्या किंवा फार-फारतर तिसर्या यादीत लागला असता क्रम
पण तेवढ्यासाठी राउंडावर जायचे कोण घेणार श्रम
आता, त्यांच्या भाव-बंदांसाठी ते स्वत:च नाहीत विचार करत
पण आम्ही मात्र उभे आहोत बी-कॉम-एस्सी-ए च्या कळा सोसत
आजकाल पैसेवाल्यांच्याच तोंडाला सगळे झोंबतात
गरीब साले लय शांतपणे आयुष्य जगत रहातात
जात जात म्हणणार्याच्या टिरीवर फटके हाणा
आणि आरक्षण फक्त गरीबाच्या पोरांसाठीच आणा
....कविता यथे संपते आहे....
ता.क.
यमक कसंबसं जुळवलंय पण कवितेचं तंत्र नाही राव जमलं
काही कळो ना कळो, कळा मात्र सोसा समजून काळीज आपलं (आवो, धडपडू नका. परत वाचा)
भारी समर्थ
जात जात म्हणणार्याच्या
द्यायला आहोत ना तयार
भारी समर्थ,
:)
बर्याच दिवसांनी काल माझी जात
हास्य
मस्त कविता आणि भावना पण योग्य
मस्त कविता..!
माझी जात कोणी काढायची नाय ती
माझी जात कोणी काढायची नाय ती
मी कवीतेशी सहमत्....मस्तच