✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद).

न
नितिन थत्ते यांनी
Mon, 06/27/2011 - 14:37  ·  लेख
लेख
. . . प्रेरणा आज ओळख करून घेऊ, भारतात जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद. इतिहासात पाहिले असता, महात्मा गांधींच्या खुनानंतर हिंदुत्ववादी लोकांना भारतात तोंड दाखवायला जागा उरली नाही. त्यांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सर्वसामान्य हिंदू घटनेत समावेश केलेल्या पुरोगामी तरतुदींकडे आकृष्ट होऊ लागला होता. पुराणमतवादी हिंदुत्ववाद्यांना असलेला हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी नेहरूंच्या मृत्यूनंतर लवकरच स्वामी चिन्मयानंद यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना पवई मुंबई येथे १९६४ मध्ये केली. ही संस्था हिंदू लोकांचे संघटन करण्याचे काम करते. रा स्व संघाची ही एक शाखा आहे असेही म्हणता येईल. हिंदू मूल्यांचे संरक्षण, संवर्धन आणि प्रसार करण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. सुमारे १९८० पर्यंत भारतीय हिंदूंना एकत्र करण्याचे काम या संस्थेने केले. नंतर या संस्थेचा उत्कर्ष सुरू झाला आणि ही संस्था अमेरिकेपर्यंत पोहोचली. आता ही संस्था जगभरातील एक प्रमुख हिंदूत्ववादी संस्था बनली आहे. अयोध्येमध्ये या संस्थेने एक भले मोठे मंदिर बांधण्याचे गाजर दाखवल्याने ती बर्‍याच हिंदुत्ववादी बांधवांच्या आदरास पात्र झाली आहे. सध्या अमेरिकेतील व परदेशांतील हिंदु जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य चालले आहे. विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते साध्या वेशात राहतात. ते जवळ कोणतेही इतर साधन बाळगत नाहीत. त्यांचा मुक्काम आपापल्या घरांमध्येच असतो. ते हिंदुत्वाचे शिक्षण देतात. संस्थेतर्फे अधूनमधून संतांचा मेळावा म्हणजेच धर्म संसद आयोजित केला जातो. याला मोठा प्रतिसाद लाभतो. ही संस्था रा स्व संघाची शाखा असली आणि तिचे नेते भाजप या पक्षात सहभागी असली तरी रा स्व संघाच्या जवाबदारी झटकण्याच्या प्रवृतीमुळे ही संस्था कोणत्याही अतिरेकी घटनेत सहभागी नसल्याचा दावा करते. तसेच या संस्थेतून आलेले कार्यकर्ते दहशतवादी कृत्ये करीत असल्याची शक्यताही नोंदवली जाते. पण या संस्थेच्या सरकारी यंत्रणेत शिरलेल्या हस्तकांमुळे तिचा हिंसाचाराशी कोणताही संबंध नसल्याचे आजवर म्हटले गेले आहे. . . . . सावधां दक्ष
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या
13338 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

चुकीची कामे केली तर तो खरा

अन्या दातार
Wed, 06/29/2011 - 17:31 नवीन
चुकीची कामे केली तर तो खरा चेहरा आणि चांगली कामे केली की खोटा चेहरा का? चांगला न्याय आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

अवांतर : श्री विकासजी तुम्ही

विजुभाऊ
Tue, 06/28/2011 - 11:29 नवीन
अवांतर : श्री विकासजी तुम्ही येथे प्रकाशीत केलेली छायाचित्रे ही जर आंतरजालावरून घेतली असतील तर त्याचा तसा स्पष्ट उल्लेख करावा.
  • Log in or register to post comments

स्पष्टीकरण

विकास
Tue, 06/28/2011 - 16:44 नवीन
मी दिलेली छायाचित्रे ही काढलेली नव्हती तसे कुणाला वाटले असेल आणि भावना दुखावल्या गेल्या असल्या तर (उ.दा. सोनीयाजी, राहूलजी का नाहीत वगैरे वगैरे वरून) क्षमस्व. बाकी त्या छायाचित्राचा दुवा दिला त्या प्रतिसादाच्या खालच्याच ओळीत दिला होता. मात्र सोनीया का नाहीत असा गैरसमज राहू नये म्हणून खालील चित्रफितीत अवश्य बघावी. सुरवातीस जरी निवेदकाने "सोणिया गांधी" म्हणले असले तरी त्याला लोकप्रिय नेत्या सोनीयाजींचेच नाव घेयचे होते. त्यांच्याबरोबर याच संस्थेच्या व्यासपिठावर मा. प्रणव मुखर्जी, मा. वायलर रवी, मा. करण सिंग, भारताचे राजदूत वगैरे पण उपस्थित होते. मला फक्त उत्सुकता आहे, की सागरपार काँग्रेसकडून मायदेशच्या काँग्रेसला आर्थिक मदत कशी होते ते. याबद्दल जर आपल्याला अथवा मा. थत्त्यांना काही माहिती असली तर ती येथे अवश्य द्यावीत ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मा. थत्त्यांना मा.थत्त्यांना

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/28/2011 - 17:12 नवीन
मा. थत्त्यांना
मा.थत्त्यांना म्हणजे माहात्मा थत्त्यांना का? दुरात्मा परा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

खी खी खी

नितिन थत्ते
Tue, 06/28/2011 - 17:39 नवीन
>>सागरपार काँग्रेसकडून मायदेशच्या काँग्रेसला आर्थिक मदत कशी होते ते. बाहेरून आर्थिक मदत? मी तर आजवर ऐकत आलो की काँग्रेसवाले देशातला पैसा बाहेर नेतात......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

बरोबर आहे!

विकास
Tue, 06/28/2011 - 19:21 नवीन
बाहेरून आर्थिक मदत? मी तर आजवर ऐकत आलो की काँग्रेसवाले देशातला पैसा बाहेर नेतात...... बरोबर माहीत आहे की तुम्हाला! पण असं बघा, देशाबाहेर पैसा काढायला केलेली मदत देखील "आर्थिक मदत" च आहे ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

>>बरोबर माहीत आहे की

नितिन थत्ते
Wed, 06/29/2011 - 20:26 नवीन
>>बरोबर माहीत आहे की तुम्हाला ते तुमच्यासारख्या लोकांकडूनच सारखं सारखं सांगितलं जायचं. पण आता तुम्ही उलट म्हणताय तर समजूया की नसतील जात काँग्रेसवाल्यांकडून स्वित्झर्लंडमध्ये पैसे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

-१

अजातशत्रु
Wed, 06/29/2011 - 13:49 नवीन
सोनिया बैनी जर स्वतःच्या पदरचा पक्षाचा झेंडा जरी विकत घेतला असेल, तर ती काँग्रेसला बाहेरून झालेली आर्थिक मदतच आहे, ;) ( माहिती स्त्रोत - मान.शरदचंद्ररावजी पवार,भाजपा, अलीकडचा रामदेव बाबा) ( सागरतीरी )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

प्रस्तुत धागा विडंबन आहे

शाहिर
Wed, 06/29/2011 - 18:43 नवीन
प्रस्तुत धागा विडंबन आहे हे काही जण सोयीस्कर रीत्या विसरलेले आहेत
  • Log in or register to post comments

कंस

विकास
Wed, 06/29/2011 - 19:51 नवीन
कंस वापरले म्हणून विडंबन असे म्हणायचे आहे का? आता कंस ह्या शब्दाचे मराठीत देखील दोन अर्थ आहेत, त्यातील एक विशेषनाम आहे ;) पण ते वापरून हा प्रश्न विचारलेला नाही! मला वाटते विडंबन म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण लेखन. मा. थत्त्यांनी येथे जाहीर करावे की त्यांनी जे काही या कंस वापरून दिलेल्या मथळ्याच्या लेखात लिहीले आहे ते त्यांनी अतिशयोक्तीपूर्ण लिहीले आहे, पक्षी: वास्तवास धरून नाही, म्हणजे कुणाचा गैरसमज होणार नाही अथवा सोयीस्कररीत्या विसरणे होणार नाही. जर त्यांनी गप्प रहायचे ठरवले तर त्यांच्या दृष्टीने हे विडंबन नव्हते असा समज करून घेऊया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

चॅलेंज?

नितिन थत्ते
Wed, 06/29/2011 - 20:31 नवीन
>>मला वाटते विडंबन म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण लेखन. मी अतिशयोक्ती म्हणून लिहिलेले नाही. तसेही विडंबन याचा अर्थ अतिशयोक्तीपूर्ण लेखन असा होत नसावा. >>मा. थत्त्यांनी येथे जाहीर करावे की त्यांनी जे काही या कंस वापरून दिलेल्या मथळ्याच्या लेखात लिहीले आहे ते त्यांनी अतिशयोक्तीपूर्ण लिहीले आहे, पक्षी: वास्तवास धरून नाही, म्हणजे कुणाचा गैरसमज होणार नाही अथवा सोयीस्कररीत्या विसरणे होणार नाही. मी जे लिहिले आहे ते (टु द बेस्ट ऑफ माय नॉलेज) वास्तवास धरून आहे असे येथे जाहीर करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

धन्यवाद!

विकास
Wed, 06/29/2011 - 21:38 नवीन
मी जे लिहिले आहे ते (टु द बेस्ट ऑफ माय नॉलेज) वास्तवास धरून आहे असे येथे जाहीर करतो. "टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज" या स्पष्टओक्तीबद्दल धन्यवाद! ही चर्चा आपण गांभिर्यानेच चालू केली आहे हे आता स्पष्ट झाले त्यामुळे आता इतर कुणाला त्यावरील प्रतिक्रीया म्हणजे सोयीचा गैरसमज / विसर वाटू नये. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

छान माहीती दिलीत आपण

नर्मदेतला गोटा
Wed, 06/29/2011 - 23:24 नवीन
छान माहीती दिलीत आपण
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा