[ज्योतिष] दिनांक १ जुलै २०११ रोजीची अभद्र अमावस्या

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
20 Jun 2011 - 9:22 am

दिनांक १ जुलै २०११ रोजी सायन कर्क राशीत ९ अंश ८ मि. वर अमावस्या होत असून ही अमावस्या गोचर शनी, युरेनस (हर्षल) बरोबर केंद्र योग करते. त्यात शनी बरोबर होणारा केंद्र योग हा अत्यंत तीव्र स्वरुपाचा आहे. या शिवाय ही अमावस्या प्लुटॊबरोबर प्रतियुती करते. थोडक्यात अमावस्ये मुळे बृहच्चौकोन ही भौमितिक रचना तयार झाली असल्याने ही अमावस्या एकंदर "अभद्र" अशीच म्हणावी लागेल.

अपघात, अडथळे, वैफल्य, घातपात, क्वचित जनक्षोभ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या या अमावस्येच्या पुढेमागे १ आठवडा संभवतात. पुढे दिलेल्या जन्मतारखाना ही अमावस्या विशेष त्रासदायक जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com/2011/06/blog-post_20.html

ज्योतिष

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

20 Jun 2011 - 9:32 am | अमोल केळकर

धन्यवाद

अमोल केळकर

सूर्यपुत्र's picture

20 Jun 2011 - 1:08 pm | सूर्यपुत्र

>>धन्यवाद अमोल केळकर
स्वःतालाच धन्यवाद??? छान. :)

-सूर्यपुत्र.

नरेशकुमार's picture

20 Jun 2011 - 9:51 am | नरेशकुमार

शनी बरोबर होणारा केंद्र योग हा अत्यंत तीव्र स्वरुपाचा आहे.

काही युनीट वगेरे आहे का तिव्रता मोजायला ?

ही अमावस्या प्लुटॊबरोबर प्रतियुती करते. थोडक्यात अमावस्ये मुळे बृहच्चौकोन ही भौमितिक रचना तयार झाली असल्याने

... बॉर !
.
.
चालू द्या.चालू द्या.

सुनील's picture

20 Jun 2011 - 2:12 pm | सुनील

वेळीच सावध केल्याबद्दल धन्यवाद!

१ जुलैच्या ह्या अभद्र अमावस्येचा त्रास होऊ नये म्हणून त्याच सायंकाळी एक शांती-बैठक आयोजित करण्याचा मानस आहे. (अनायसे शुक्रवारही आहेच!)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jun 2011 - 2:39 pm | परिकथेतील राजकुमार

अपघात, अडथळे, वैफल्य, घातपात, क्वचित जनक्षोभ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या या अमावस्येच्या पुढेमागे १ आठवडा संभवतात.


हे सगळे रोजच घडत असते. त्यात नविन ते काय ?

मूकवाचक's picture

20 Jun 2011 - 6:18 pm | मूकवाचक

बृहच्चौकोन याविषयी अधिक माहिती वाचायला आवडेल. धन्यवाद.

नाना बेरके's picture

20 Jun 2011 - 6:28 pm | नाना बेरके

श्रि. युयुस्तू म्हणतात ते बरोबर आहे. आत्तापासूनच (धागा वाचल्यावाचल्याच) , अमावस्येच्या १५ दिवस अगोदर वैफल्यग्रस्त भावना मनात येऊ लागली आहे. :O

आत्मशून्य's picture

20 Jun 2011 - 6:44 pm | आत्मशून्य

एकंदर.... बर्‍याच जणांचा बाजार उठणार असंच दीसतय. तसच ब्लोगवरती वाइट जन्म तारीख इतक्या आहेत की कोणाला वाइट अनूभव येणार नाहीत हे २ ओळीत सांगता आले असते आणी लोकांची बॅडविड्थ वाचवता आली असती.

JAGOMOHANPYARE's picture

20 Jun 2011 - 6:59 pm | JAGOMOHANPYARE

छान.

मालोजीराव's picture

20 Jun 2011 - 7:03 pm | मालोजीराव

१ जुलै ला अभद्र अमावस्या असल्याने मी कंपनीत येऊ शकत नाई...अश्या विषयाचे लिव्ह अप्लिकेशन लेटर कसे लिहावे? कृपया मार्गदर्शन करा
(शुक्र,शनी,रविवार जोडून सुट्ट्या घेण्यास उत्सुक असणारा)

तिमा's picture

20 Jun 2011 - 8:32 pm | तिमा

शनिच्या एका कुयोगात माझी जन्मतारीख आहे. खपणार बहुतेक हे थेरडं!

विनायक प्रभू's picture

20 Jun 2011 - 8:43 pm | विनायक प्रभू

लेखन.
असो.
अमुशेच्या दिवशी काय काय करायचे नसते ह्यावर एकदा डीटेलवार लेख येउ द्या.

नितिन थत्ते's picture

20 Jun 2011 - 9:28 pm | नितिन थत्ते

>>या शिवाय ही अमावस्या प्लुटॊबरोबर प्रतियुती करते.

प्लूटो हा बाहेरून घुसखोरी करून आपल्या सूर्यमालेचं रेशनकार्ड काढून स्थानिक म्हणून बरेच वर्ष राहिला असं नुकतंच उघडकीला आल्याने हल्ली आम्ही प्लूटोला महत्त्व देत नाही.

स्मिता.'s picture

20 Jun 2011 - 10:13 pm | स्मिता.

माहितीबद्दल धन्यवाद!

या अभद्र अमावस्येच्या परिणामांपासून वाचण्यासाठी काहीतरी उपाय असेल ना, तोही सांगायचा होता. नाहीतर नाना बेरके म्हणतात तसे आतापासूनच वैफल्यग्रस्त भावना मनात येऊ लागली आहे.

बाय द वे, बृहच्चौकोन म्हणजे काय? कसा असतो तो? त्या आकारचे काहीही अभद्रच असते का?