Skip to main content

[ज्योतिष] दिनांक १ जुलै २०११ रोजीची अभद्र अमावस्या

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 20/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १ जुलै २०११ रोजी सायन कर्क राशीत ९ अंश ८ मि. वर अमावस्या होत असून ही अमावस्या गोचर शनी, युरेनस (हर्षल) बरोबर केंद्र योग करते. त्यात शनी बरोबर होणारा केंद्र योग हा अत्यंत तीव्र स्वरुपाचा आहे. या शिवाय ही अमावस्या प्लुटॊबरोबर प्रतियुती करते. थोडक्यात अमावस्ये मुळे बृहच्चौकोन ही भौमितिक रचना तयार झाली असल्याने ही अमावस्या एकंदर "अभद्र" अशीच म्हणावी लागेल. अपघात, अडथळे, वैफल्य, घातपात, क्वचित जनक्षोभ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या या अमावस्येच्या पुढेमागे १ आठवडा संभवतात. पुढे दिलेल्या जन्मतारखाना ही अमावस्या विशेष त्रासदायक जाण्याची शक्यता आहे. अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com/2011/06/blog-post_20.html
लेखनविषय:

वाचने 4233
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

शनी बरोबर होणारा केंद्र योग हा अत्यंत तीव्र स्वरुपाचा आहे.
काही युनीट वगेरे आहे का तिव्रता मोजायला ?
ही अमावस्या प्लुटॊबरोबर प्रतियुती करते. थोडक्यात अमावस्ये मुळे बृहच्चौकोन ही भौमितिक रचना तयार झाली असल्याने
... बॉर ! . . चालू द्या.चालू द्या.

वेळीच सावध केल्याबद्दल धन्यवाद! १ जुलैच्या ह्या अभद्र अमावस्येचा त्रास होऊ नये म्हणून त्याच सायंकाळी एक शांती-बैठक आयोजित करण्याचा मानस आहे. (अनायसे शुक्रवारही आहेच!)

अपघात, अडथळे, वैफल्य, घातपात, क्वचित जनक्षोभ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या या अमावस्येच्या पुढेमागे १ आठवडा संभवतात.
हे सगळे रोजच घडत असते. त्यात नविन ते काय ?

बृहच्चौकोन याविषयी अधिक माहिती वाचायला आवडेल. धन्यवाद.

श्रि. युयुस्तू म्हणतात ते बरोबर आहे. आत्तापासूनच (धागा वाचल्यावाचल्याच) , अमावस्येच्या १५ दिवस अगोदर वैफल्यग्रस्त भावना मनात येऊ लागली आहे. :O

एकंदर.... बर्‍याच जणांचा बाजार उठणार असंच दीसतय. तसच ब्लोगवरती वाइट जन्म तारीख इतक्या आहेत की कोणाला वाइट अनूभव येणार नाहीत हे २ ओळीत सांगता आले असते आणी लोकांची बॅडविड्थ वाचवता आली असती.

१ जुलै ला अभद्र अमावस्या असल्याने मी कंपनीत येऊ शकत नाई...अश्या विषयाचे लिव्ह अप्लिकेशन लेटर कसे लिहावे? कृपया मार्गदर्शन करा (शुक्र,शनी,रविवार जोडून सुट्ट्या घेण्यास उत्सुक असणारा)

शनिच्या एका कुयोगात माझी जन्मतारीख आहे. खपणार बहुतेक हे थेरडं!

लेखन. असो. अमुशेच्या दिवशी काय काय करायचे नसते ह्यावर एकदा डीटेलवार लेख येउ द्या.

>>या शिवाय ही अमावस्या प्लुटॊबरोबर प्रतियुती करते. प्लूटो हा बाहेरून घुसखोरी करून आपल्या सूर्यमालेचं रेशनकार्ड काढून स्थानिक म्हणून बरेच वर्ष राहिला असं नुकतंच उघडकीला आल्याने हल्ली आम्ही प्लूटोला महत्त्व देत नाही.

माहितीबद्दल धन्यवाद! या अभद्र अमावस्येच्या परिणामांपासून वाचण्यासाठी काहीतरी उपाय असेल ना, तोही सांगायचा होता. नाहीतर नाना बेरके म्हणतात तसे आतापासूनच वैफल्यग्रस्त भावना मनात येऊ लागली आहे. बाय द वे, बृहच्चौकोन म्हणजे काय? कसा असतो तो? त्या आकारचे काहीही अभद्रच असते का?