Skip to main content

साहित्याशी जवळिक साधत -

लेखक विदेश यांनी बुधवार, 15/06/2011 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्याशी जवळिक साधत खुशाल हा बसणार , गोड बोलुनी सर्वांशी हा साहित्यातच रमणार ! भविष्यवाणी सांगुन गेले जाणते कुणी स्वर्गाला भविष्यवाणी खोटी नव्हती , सांगतोच मी तुम्हाला ! बालपणीचा काळ सुखाचा - म्हटले आहे कुणीतरी वह्या नि पुस्तक हाती पडता, चीरफाड मी नित्य करी ; शैशवात मी वह्यांत लपवी - आठवणींची मोरपिसे , फूल सखीच्या गज-यामधले पुस्तकातुनी दडवितसे ! कविता, कादंबरी नि नाटक यांचा नव्हता गंध मला दैनिक मासिक पुस्तक साहित्याची आवड तरी मला ! साहित्याशी सलगी करणे मजला खूपच आवडले, 'वजनदार साहित्य' मलाही रद्दीत घेणे परवडले ! दीड-दान्डीचे मोल मला; ते नसेल काही इतरांना - हर्ष होतसे मलाच , माझा 'रद्दी डेपो' बघताना !!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 882
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

छान!!