Skip to main content

आता नाही ...

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 08/06/2011 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
सुचते बरेच काही, पण लिहिणे होत नाही ... दिसते बरेच काही, पण पाहणे होत नाही ... छळते तुझीच साद, सखे पण येणे होत नाही ... साठवले बरेच काही, पण देणे होत नाही ... तुझ्या घरावरून सखे , हल्ली जाणे होत नाही पूर्वीची ती युगुलगीते, आता गाणे होत नाही ... स्वच्छंद मनस्वीतेने आता जगणे होत नाही जाहलो भ्याड इतका आता मरणे होत नाही ...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 870
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

सुचते बरेच काही, पण लिहिणे होत नाही ...
अगदी हेच झाले आहे आमचे सध्या!! असो. बाकी तुमची कविता मस्तच जमलीये.
स्वच्छंद मनस्वीतेने आता जगणे होत नाही जाहलो भ्याड इतका आता मरणे होत नाही
याला तोडच नाही. :)