माझे नावडते संगीतकार
आजच प्रवास करत असताना अचानक बसवाल्याने एफेम रेडियो लावला. त्यातल्या चरपटपंजरीचा त्रास कमी का काय म्हणून चरपटणारीने 'आज राजेश रोशनजी का बर्थ डे है' असे सांगून सगळी राजेश रोशनची गाणी लावली. त्यामुळे असह्य मानसिक ताप झाला. त्यातूनच ही कल्पना सुचली की आपले नावडते संगीतकार आठवावेत. पूर्वी कोणीतरी, आवडते संगीतकार, यावर कौल घेतला होता. म्हणून कौले काढायला गेलो तर 'पर्याय वाढवा' हे दाबल्यावर पुढचे सगळे इंग्रजीतच टाईप व्हायला लागले. बरीच खटापट केल्यावर विचार केला, की मग हा विषय चर्चेलाच टाकावा. मला नावडणार्या संगीतकारांची नांवे उतरत्या क्रमाने दिली आहेत. जेवढा नंबर वरचा तेवढा त्याच्या संगीताचा मानसिक त्रास जास्त, अशा पध्दतीने! का आवडत नाही त्याची कारणे शक्य आहे तिथे दिली आहेत. तर होउन जाऊ द्यात एकदा!
१. राजेश रोशन
याचं हे ..... हो... सुरु झालं की वाटतं की किशोरसारख्या गुणी गायकाचा इतका वाईट उपयोग दुसर्या कुणीच केला नाही. सपक चाली, एकदम खालच्या सा वरुन वरच्या षडजावर उड्या... छ्या! एकही गाणे कधी आवडले नाही. मागे मार्मिक मधे शुध्दनिषाद यांनी ह्याचा उल्लेख 'स्वर्गीय बापाने मरताना पोराच्या हाती नुसताच बेंडबाजा दिला असे वाचल्याचे स्मरते.
२. उषा खन्ना
उडत्या चाली, पण कधी आकर्षक वाटल्याच नाहीत.
३. भप्पी लहरी
चोरीव आणि त्याच्यासारख्याच उबगवाण्या
४. रवि
बर्याचशा चाली म्हणजे दळण आणि त्याच्या नावावरच्या काही उत्कृष्ट चाली त्यानेच दिल्या असतील का याविषयीची दाट शंका.(उदाहरणार्थ : लागेना मोरा जिया)
५. लक्ष्मीकांत प्यारेलाल
पारसमणी सारख्या काही उत्तम चालींनंतर पार ढेपाळले आणि 'हाथी मेरे साथी' नंतर तर त्यांच्या प्रत्येक गाण्यात कुठल्यातरी म्युझिक पीस मधे हत्ती ओरडायला लागला.
६. राम लक्ष्मण
लक्ष्मी प्यारे नंतरचे बँडवाले!
७. शंकर (जयकिशन नंतरचा)
तरी वरील रत्नांपेक्षा पुष्कळ बरा.
वरील यादी ही आणखीही वाढवता येईल पण त्या उरलेल्या मंडळींनी काहीवेळा बरे संगीत दिले आहे म्हणून त्यांना या यादीत जागा नाही.
फक्त जुन्या संगीतकारांचाच विचार केला आहे कारण नवीन संगीतकारांचे संगीत माझ्या डोक्यावरुन जाते.
मिपावर अनेक जाणकार आहेत. त्यांना काय वाटते हे जाणण्याची इच्छा आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सगळ्यात जास्त आवडणारे संगीतकारः मदन मोहन आणि सचिनदेव बर्मन
लई भारि धागा, पण वर मुवेने
हा नमुना बघाच
हिमेश
खूप मस्त विषय!!
बप्पीदांची
नक्कीच
!!!
ह्म्म....
अजून एक
माझी (ना) पसंद
माझी (ना) पसंद
माझी (ना) पसंद
आपल्याला तर बॉ देवबाप्पांचे
मला पण ...
आपल्याला बुवा कुणाचाच राग वाटत नाही..
आपल्याला बुवा कुणाचाच राग वाटत नाही..
सरसकट