✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझे नावडते संगीतकार

त
तिमा यांनी
Tue, 05/24/2011 - 21:16  ·  लेख
लेख
आजच प्रवास करत असताना अचानक बसवाल्याने एफेम रेडियो लावला. त्यातल्या चरपटपंजरीचा त्रास कमी का काय म्हणून चरपटणारीने 'आज राजेश रोशनजी का बर्थ डे है' असे सांगून सगळी राजेश रोशनची गाणी लावली. त्यामुळे असह्य मानसिक ताप झाला. त्यातूनच ही कल्पना सुचली की आपले नावडते संगीतकार आठवावेत. पूर्वी कोणीतरी, आवडते संगीतकार, यावर कौल घेतला होता. म्हणून कौले काढायला गेलो तर 'पर्याय वाढवा' हे दाबल्यावर पुढचे सगळे इंग्रजीतच टाईप व्हायला लागले. बरीच खटापट केल्यावर विचार केला, की मग हा विषय चर्चेलाच टाकावा. मला नावडणार्‍या संगीतकारांची नांवे उतरत्या क्रमाने दिली आहेत. जेवढा नंबर वरचा तेवढा त्याच्या संगीताचा मानसिक त्रास जास्त, अशा पध्दतीने! का आवडत नाही त्याची कारणे शक्य आहे तिथे दिली आहेत. तर होउन जाऊ द्यात एकदा! १. राजेश रोशन याचं हे ..... हो... सुरु झालं की वाटतं की किशोरसारख्या गुणी गायकाचा इतका वाईट उपयोग दुसर्‍या कुणीच केला नाही. सपक चाली, एकदम खालच्या सा वरुन वरच्या षडजावर उड्या... छ्या! एकही गाणे कधी आवडले नाही. मागे मार्मिक मधे शुध्दनिषाद यांनी ह्याचा उल्लेख 'स्वर्गीय बापाने मरताना पोराच्या हाती नुसताच बेंडबाजा दिला असे वाचल्याचे स्मरते. २. उषा खन्ना उडत्या चाली, पण कधी आकर्षक वाटल्याच नाहीत. ३. भप्पी लहरी चोरीव आणि त्याच्यासारख्याच उबगवाण्या ४. रवि बर्‍याचशा चाली म्हणजे दळण आणि त्याच्या नावावरच्या काही उत्कृष्ट चाली त्यानेच दिल्या असतील का याविषयीची दाट शंका.(उदाहरणार्थ : लागेना मोरा जिया) ५. लक्ष्मीकांत प्यारेलाल पारसमणी सारख्या काही उत्तम चालींनंतर पार ढेपाळले आणि 'हाथी मेरे साथी' नंतर तर त्यांच्या प्रत्येक गाण्यात कुठल्यातरी म्युझिक पीस मधे हत्ती ओरडायला लागला. ६. राम लक्ष्मण लक्ष्मी प्यारे नंतरचे बँडवाले! ७. शंकर (जयकिशन नंतरचा) तरी वरील रत्नांपेक्षा पुष्कळ बरा. वरील यादी ही आणखीही वाढवता येईल पण त्या उरलेल्या मंडळींनी काहीवेळा बरे संगीत दिले आहे म्हणून त्यांना या यादीत जागा नाही. फक्त जुन्या संगीतकारांचाच विचार केला आहे कारण नवीन संगीतकारांचे संगीत माझ्या डोक्यावरुन जाते. मिपावर अनेक जाणकार आहेत. त्यांना काय वाटते हे जाणण्याची इच्छा आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11735 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

सगळ्यात जास्त आवडणारे संगीतकारः मदन मोहन आणि सचिनदेव बर्मन

सुधीर काळे
Wed, 06/08/2011 - 01:09 नवीन
उषा खन्नांचे "दिल देके देखो"साठी दिलेले संगीत भन्नाट होते. अतीशय आवडत असे व आजही त्यातली गाणी जुनी वाटत नाहींत. तसेच ओ. पी. नय्यरसाहेबांच्या संगीताबद्दल म्हणता येईल! सगळ्यात न आवडणारा: "हात नका लाऊ त्याच्या सीडीला" फेम हिमेसभाईच! आवाजही तद्दन टाकाऊ!! सगळ्यात जास्त आवडणारे संगीतकारः मदन मोहन (बिचारे अकाली दिवंगत झाले) आणि सचिनदेव बर्मन! 'कयामतसे कयामततक'चे संगीतकार आनंद-मिलिंद यांनी पाश्चात्य संगीतामागे भरकटत जाणार्‍या सिनेसंगीताला 'लायनी'त आणले म्हणून तेही आवडतात. जय हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

लई भारि धागा, पण वर मुवेने

५० फक्त
गुरुवार, 05/26/2011 - 07:41 नवीन
लई भारि धागा, पण वर मुवेने लिहिलंय त्याला १००० +, मला तर गाणं या एकाच गोष्टीशी घेणं देणं असतं बाकी कोण काय याची काही गरजच नसते. त्यामुळं संगितकार त्यांची स्टाईल, वरचा ग खालचा ध असले प्रश्न मला पडत नाहीत.
  • Log in or register to post comments

हा नमुना बघाच

हुप्प्या
गुरुवार, 05/26/2011 - 10:24 नवीन
http://www.youtube.com/watch?v=9VFYkdtMf00 अन्नू मलिकची ही एक उत्कृष्ट रचना. उंच बिल्डींग लिफ्ट बंद हैच्या तोडीची! उल्लू के पठ्ठे या वरवर पहाता शिवी वाटणार्‍या वाक्प्रचाराचा असा लवचिकपणे वापर करुन त्याची एक आगळीच रंगत निर्माण केली आहे. जगातील विविध कानाकोपरातील नृत्य शैली, विविध भाषा अशी साहित्य कलेची रेलचेल आहे म्हणा ना! आणि दस्तुरखुद्द अन्नूजींचा आवाज म्हणजे काय सोन्याला सुगंधच!
  • Log in or register to post comments

हिमेश

किसन शिंदे
गुरुवार, 05/26/2011 - 11:43 नवीन
हिमेश रेशमिया.. प्रीतम... साजिद वाजीद... भप्पी लहिरी... एक बोर्डरच संगीत सोडल तर अन्नू मलिकही या यादीत बसू शकेल..
  • Log in or register to post comments

खूप मस्त विषय!!

समीरसूर
गुरुवार, 05/26/2011 - 13:06 नवीन
मला ए. आर. रहमान अजिबात आवडत नाही. कधीही त्याची गाणी मी आवडीने ऐकली आहेत असे झाले नाही. "चुपकेसे लगजा गले, रात की चादर तले.." हे 'साथिया' मधले गाणे मात्र मला खूप आवडते. बाकी "जय हो..." अत्यंत बकवास वाटते. त्या गाण्याला ऑस्करच काय, अखिल भुसारी कॉलनी भाजी विक्रेता संघाचा 'साँग ऑफ द डे' हा ही पुरस्कार मी दिला नसता. खूप तांत्रिक संगीत, अत्यंत सदोष गायकी, घाणेरडे उच्चार, कंटाळवाण्या चाली, आणि वेगवेगळ्या आवाजांचा इलेक्ट्रॉनिक गोंधळ यामुळे रहमानची गाणी मला ऐकायला आवडतच नाहीत. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. राजेश रोशनची काही गाणी चांगली आहेत. "दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया हैं..." (आखिर क्यों?) "तुम से बढकर दुनिया में न देखा कोई और जुबां पर..." (कामचोर) "थोडा हैं थोडे की जरूरत हैं..." (बातों बातों में) "छूकर मेरे मन को किया तुने क्या इशारा..." (याराना) "परदेसिया तुने ये किया, सब कहते हैं तुमने मेरा दिल ले लिया..." (मि. नटवरलाल) ही गाणी चांगली वाटतात. पण जास्त संख्या उबग आणणार्‍या गाण्यांची आहे हे नक्की! पण राजेश रोशनची गाणी खूप हिट होतात हे खरे. उदा. "मुंगडा, मुंगडा...", "जाती हुं मैं, जल्दी हैं क्या...", "वादा न तोड, तू वादा न तोड..." (हे गाणे तर हॉलिवूडच्या एका चित्रपटात वापरले होते), "कहो ना प्यार हैं..." इत्यादी. बप्पी लाहिरीची गाणी धमाल असतात (असायची). वर यादी आहेच. ढिंगचाक गाणी (किशोर आणि आशा) ठेका धरायला लावायची आणि अजूनही आवडतात. "ताथय्या ताथय्या हो हो.." (हिंमतवाला) "तोफा तोफा.." (तोहफा) "कोई यहाँ आहा नाचे नाचे" (डिस्को डान्सर) "आय एम अ स्ट्रीट डान्सर" (इल्जाम) "इंतेहा हो गयी..." (शराबी) "आज रपट जाये तो..." (नमक हलाल) "किसी नजर को तेरा इंतजार आज भी हैं..." (ऐतबार) "मंजिलों पे आके लुटते हैं दिलो के कांरवा..." (शराबी) "तम्मा तम्मा लोगे..." (थानेदार) "यार बिना चैन कहां रे..." (साहेब) ही आणि अशी बरीच गाणी चांगली वाटतात ऐकायला. मला नौशाद आणि शंकर जयकिशन आवडत नाहीत. रटाळ चाली वाटायच्या त्यांच्या. 'मुघल-ए-आझम' मधली एक ती "हम भी देखेंगे" ही कव्वाली सोडली तर नौशाद मला आवडले नाहीत कधी. शंकर-जयकिशनची राज कपूरची गाणी कधीच आवडली नाहीत. कल्याणजी-आनंदजी पण आवडते नाहीत. एका "नीले नीले अंबर पे चांद जब आये..." साठी त्यांच्या बाकीच्या गाण्यांकडे दुर्लक्ष करता येते. :-)
  • Log in or register to post comments

बप्पीदांची

गवि
गुरुवार, 05/26/2011 - 13:16 नवीन
बप्पीदांची गाणी आठवून दिल्याबद्दल धन्यवाद. बाकी राजेशजींच्या गाण्यांमधे तुम्ही दिलेले "थोडा हैं थोडे की जरूरत हैं..." (बातों बातों में) हे बातों बातों में ऐवजी खट्टा मीठा मधे असावे अशी शंका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

नक्कीच

समीरसूर
गुरुवार, 05/26/2011 - 15:03 नवीन
बरोबर आहे. माझे थोडे कन्फ्युजन झाले. धन्यवाद. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 05/26/2011 - 13:16 नवीन
या धाग्यावर प्रदीपदांच्या प्रतिक्रियांची वाट बघत होतो. त्या आल्या. अजून एकाची वाट बघत आहे. :)
  • Log in or register to post comments

ह्म्म....

शैलेन्द्र
गुरुवार, 05/26/2011 - 15:43 नवीन
ह्म्म....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अजून एक

गोगोल
Sat, 05/28/2011 - 06:26 नवीन
कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

माझी (ना) पसंद

रणजित चितळे
गुरुवार, 05/26/2011 - 14:52 नवीन
अनु मलीक (उर्मट वाटतो - नसेलही पण वाटतो0. जतीन ललीत सोनीक ओमी उषा खन्ना हिमेश रेषमीया आनंद मिलींद अमर उत्पल बाकी एक दोन पिक्चर चे संगीतकार येथे विचारात घेतलेले नाहीत. धागा व त्यावरच्या प्रतिक्रीया खुप आवडल्या. लोकांच्या आवडी निवडी वाचून मजा आली. जवळ जवळ सगळ्यानाच अनु मलीक आवडत नाहीत हे पाहून बरे वाटले.
  • Log in or register to post comments

माझी (ना) पसंद

रणजित चितळे
गुरुवार, 05/26/2011 - 14:52 नवीन
अनु मलीक (उर्मट वाटतो - नसेलही पण वाटतो). जतीन ललीत सोनीक ओमी उषा खन्ना हिमेश रेषमीया आनंद मिलींद अमर उत्पल बाकी एक दोन पिक्चर चे संगीतकार येथे विचारात घेतलेले नाहीत. धागा व त्यावरच्या प्रतिक्रीया खुप आवडल्या. लोकांच्या आवडी निवडी वाचून मजा आली. जवळ जवळ सगळ्यानाच अनु मलीक आवडत नाहीत हे पाहून बरे वाटले.
  • Log in or register to post comments

माझी (ना) पसंद

रणजित चितळे
गुरुवार, 05/26/2011 - 14:53 नवीन
अनु मलीक (उर्मट वाटतो - नसेलही पण वाटतो). जतीन ललीत सोनीक ओमी उषा खन्ना हिमेश रेषमीया आनंद मिलींद अमर उत्पल बाकी एक दोन पिक्चर चे संगीतकार येथे विचारात घेतलेले नाहीत. धागा व त्यावरच्या प्रतिक्रीया खुप आवडल्या. लोकांच्या आवडी निवडी वाचून मजा आली. जवळ जवळ सगळ्यानाच अनु मलीक आवडत नाहीत हे पाहून बरे वाटले.
  • Log in or register to post comments

आपल्याला तर बॉ देवबाप्पांचे

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/26/2011 - 16:29 नवीन
आपल्याला तर बॉ देवबाप्पांचे संगीत आवडते. आणि देवबाप्पा मिपाचे सदस्य देखील आहेत. बाकी सगळे संगीतकार आपण फाट्यावर मारतो.
  • Log in or register to post comments

मला पण ...

वाहीदा
Mon, 06/06/2011 - 13:26 नवीन
देवबाप्पा इज टू गुड ! (परा, सगळी अक्षरे बघ कशी मी मराठीत लिहीली आहेत ;-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आपल्याला बुवा कुणाचाच राग वाटत नाही..

योगप्रभू
Tue, 05/31/2011 - 11:34 नवीन
संगीतावर (म्हणजे म्युझिक या अर्थाने) प्रेम करणार्‍याला कुणाचाही द्वेष/राग/तिरस्कार वाटू नये. संगीतकार म्हणजे प्रत्येक वेळी महान कलाकृती निर्माण करेल, अशी अपेक्षा का ठेवावी? सिद्धहस्त लेखक कधी कधी अगदी सुमार लिहून जातात. घरचेच उदाहरण घ्या. आपली आई/पत्नी कितीही सुगरण असल्या तरी कधीकधी त्यांचीही पाककृती बिघडते. यावरुन एकदम त्यांची संभावना कस्पटासमान करता येत नाही. राजेश रोशनने संगीत दिलेली ज्युली (१९७५) चित्रपटातील गाणी मला आवडतात. प्रीती सागरने गायलेले 'माय हार्ट इज बीटिंग' हे गाणे कधीही ऐकले तरी मजा येते. आता कधी राजेशची भट्टी बिघडली म्हणून त्याला एकदम भिकार ठरवायचे का? मला वाटते, आपण प्रत्येकाचे चांगले ते घ्यावे आणि आनंद लुटावा. मला प्रदीप यांची पोस्ट आवडली. सहमत आहे. आवडलेल्या एखाद्या गाण्याची चाल घेऊन त्याला भारतीय रुपडे दिले असेल तर त्याला चोरी म्हणू नये. चित्रपट कथांच्या बाबतीत असे सर्रास म्हटले जाते. इरिक सीगलच्या 'मॅन, वूमन अँड चाईल्ड' या कादंबरीवरुन प्रेरणा घेऊन 'मासूम' हा चित्रपट तयार केलाय. पण भारतीय वातावरणाला चपखल बसलाय की नाही? छाया चित्रपटातील 'इतना ना मुझसे तू प्यार बढा' हे गाणे घ्या. याची चाल म्हणजे मोझार्टची क्र. ४० ची सिंफनी. संगीतकार सलील चौधरी यांनी त्याचा वापर करुन इतके सुंदर गाणे बनवले आहे आणि तलत व लतानेही त्यात बहार आणली आहे. आता याला आपण चोरी म्हणू का?
  • Log in or register to post comments

आपल्याला बुवा कुणाचाच राग वाटत नाही..

योगप्रभू
Tue, 05/31/2011 - 11:37 नवीन
संगीतावर (म्हणजे म्युझिक या अर्थाने) प्रेम करणार्‍याला कुणाचाही द्वेष/राग/तिरस्कार वाटू नये. संगीतकार म्हणजे प्रत्येक वेळी महान कलाकृती निर्माण करेल, अशी अपेक्षा का ठेवावी? सिद्धहस्त लेखक कधी कधी अगदी सुमार लिहून जातात. घरचेच उदाहरण घ्या. आपली आई/पत्नी कितीही सुगरण असल्या तरी कधीकधी त्यांचीही पाककृती बिघडते. यावरुन एकदम त्यांची संभावना कस्पटासमान करता येत नाही. राजेश रोशनने संगीत दिलेली ज्युली (१९७५) चित्रपटातील गाणी मला आवडतात. प्रीती सागरने गायलेले 'माय हार्ट इज बीटिंग' हे गाणे कधीही ऐकले तरी मजा येते. आता कधी राजेशची भट्टी बिघडली म्हणून त्याला एकदम भिकार ठरवायचे का? मला वाटते, आपण प्रत्येकाचे चांगले ते घ्यावे आणि आनंद लुटावा. मला प्रदीप यांची पोस्ट आवडली. सहमत आहे. आवडलेल्या एखाद्या गाण्याची चाल घेऊन त्याला भारतीय रुपडे दिले असेल तर त्याला चोरी म्हणू नये. चित्रपट कथांच्या बाबतीत असे सर्रास म्हटले जाते. इरिक सीगलच्या 'मॅन, वूमन अँड चाईल्ड' या कादंबरीवरुन प्रेरणा घेऊन 'मासूम' हा चित्रपट तयार केलाय. पण भारतीय वातावरणाला चपखल बसलाय की नाही? छाया चित्रपटातील 'इतना ना मुझसे तू प्यार बढा' हे गाणे घ्या. याची चाल म्हणजे मोझार्टची क्र. ४० ची सिंफनी. संगीतकार सलील चौधरी यांनी त्याचा वापर करुन इतके सुंदर गाणे बनवले आहे आणि तलत व लतानेही त्यात बहार आणली आहे. आता याला आपण चोरी म्हणू का?
  • Log in or register to post comments

सरसकट

मैत्र
Mon, 06/06/2011 - 12:49 नवीन
कोणाला एकदम वाईट म्हणण्यात अर्थ नाही. रवी / बप्पीदा / रहमान ला अजिबात आवडत नाही म्हणणार्‍यांना वर अनेक उत्तरं दिली आहेत. रहमान बद्दल थोडं -- तो खूप कृत्रिम संगीत देतो. खूप जास्त वाद्य वापरतो वगैरे गोष्टी अनेकांना आवडत नाहीत ... या चित्रपटातलं एकूणच सर्व संगीत उत्तम आहे रोजा, लगान, जोधा अकबर, तक्षक, भगत सिंग, गजनी, देल्ही ६, स्वदेस ह्या गाण्यां मध्ये रहमान वर घेतले जाणारे नेहमीचे आक्षेप लागू होत नाहीत: ऋत आ गई रे - १९४७ अर्थ चुपके से - साथिया सुनता है मेरा खुदा - पुकार नहीं सामने - ताल करिये ना - ताल कभी नीम नीम - युवा लुका छूपी - रंग दे बसंती अल्बम -- जन गण मन -- सर्व नामवंत कलाकारांना घेऊन केलेलं. अल्बम -- माँ तुझे सलाम -- वंदे मातरम - केवळ वाद्यसंगीत असलेलं वंदे मातरम स्पिरीट ऑफ युनिटी कॉन्सर्ट्स - टायटल म्युझिक भारतबाला प्रॉड्क्शन्स साठी केलेलं काम ... ही फक्त वानगी दाखल यादी आहे. यात तथाकथित पाश्चिमात्य धर्तीची गाणी धरलेली नाहीत ज्यात म्युझिक सिंथेसाईज केलेलं आहे पण अतिशय गाजलेली आणि चांगली गाणी आहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा