✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

थेंबे-थेंबे

अ — अरुण मनोहर, Sun, 05/15/2011 - 19:03
एक थेंब टपकला तिच्या करूण डोळ्यातून बोच रुतवून गेला हताशलेल्या काळजामधून एक थेंब गळला थबथबलेल्या कपाळावरून आशा रुजवून गेला भेगाळलेल्या जमिनीतून एक थेंब प्रवेशला शिंपल्याच्या ओठांमधून बोच छुपवायला लपला चंदेरी टोपडे पांघरून एक थेंब चुकार दमला पोहून पोहून शर्यतीमधून हरला अडला बंद दार बघून एक थेंब निसटला अभेद्य आवरणामधून मिलनाचा सांगावा आला वाट पहाणाऱ्या फ़ळातून एक थेंब पसरवला गोलाकार कळकटामधून चंदेरी साज झळालला पात्राच्या अंगांगावरून एक थेंब मोहरला आसुसलेल्या जमिनीमधून तृप्त सुगंध महकला उन्हा्ळलेल्या झळांमधून थेंब थेंब जमवला अनुभुतीच्या ओळींमधून शब्दसाज जर भावला द्या दाद प्रतिसादांमधून *************************

प्रतिक्रिया द्या
1283 वाचन

💬 प्रतिसाद (3)

छान जमलीये

स्पा
Sun, 05/15/2011 - 19:30 नवीन
छान जमलीये
  • Log in or register to post comments

छान

गणेशा
Mon, 05/16/2011 - 19:54 नवीन
छान लिहिले आहे.. असेच लिहित रहा ... वाचत आहे..
  • Log in or register to post comments

सुंदर

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 05/17/2011 - 11:14 नवीन
एक थेंब चुकार दमला पोहून पोहून शर्यतीमधून हरला अडला बंद दार बघून
मस्त! आवडली!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा