थेंबे-थेंबे
एक थेंब टपकला
तिच्या करूण डोळ्यातून
बोच रुतवून गेला
हताशलेल्या काळजामधून
एक थेंब गळला
थबथबलेल्या कपाळावरून
आशा रुजवून गेला
भेगाळलेल्या जमिनीतून
एक थेंब प्रवेशला
शिंपल्याच्या ओठांमधून
बोच छुपवायला लपला
चंदेरी टोपडे पांघरून
एक थेंब चुकार
दमला पोहून पोहून
शर्यतीमधून हरला
अडला बंद दार बघून
एक थेंब निसटला
अभेद्य आवरणामधून
मिलनाचा सांगावा आला
वाट पहाणाऱ्या फ़ळातून
एक थेंब पसरवला
गोलाकार कळकटामधून
चंदेरी साज झळालला
पात्राच्या अंगांगावरून
एक थेंब मोहरला
आसुसलेल्या जमिनीमधून
तृप्त सुगंध महकला
उन्हा्ळलेल्या झळांमधून
थेंब थेंब जमवला
अनुभुतीच्या ओळींमधून
शब्दसाज जर भावला
द्या दाद प्रतिसादांमधून
*************************
छान जमलीये
छान
सुंदर