जीवघेणे-२

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
16 May 2008 - 5:02 pm

आमची प्रेरणा मिल्याची सुंदर गझल जीवघेणेरेकते रेड्याप्रमाणे! जीवघेणेका असे म्हणतेस गाणे! जीवघेणेनाव ओठांवर कुणाचे घेतले मीआमचे चुकले उखाणे जीवघेणेएक तर गिरवायची शेणात नावेआणि वासाचे बहाणे जीवघेणे'कबुतरां'ना पाहणा गेलो खरे पणभेटले भलते ससाणे जीवघेणेचालतो मी आज येथे हे असे का?पाडले होते उताणे जीवघेणे तिंबले कणके परी मजला कशाला?रोजचे हे मार खाणे जीवघेणेबायकोला खण उघडताना मिळालेआमचे काही पुराणे जीवघेणेशब्द सारे संपल्यावर संयमाचेकाढले आमचे घराणे जीवघेणे

विडंबन

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

16 May 2008 - 5:08 pm | मनस्वी

सुरुवातच बेफाम..

'कबुतरां'ना पाहणा गेलो खरे पण
भेटले भलते ससाणे जीवघेणे

:))
मस्तच हो केशवसुमार!

"तिंबले" शब्द फार प्रिय आणि जवळचा आहे वाटतं तुमचा.

मदनबाण's picture

16 May 2008 - 5:22 pm | मदनबाण

नाव ओठांवर कुणाचे घेतले मी
आमचे चुकले उखाणे जीवघेणे

व्वा !!!!
'कबुतरां'ना पाहणा गेलो खरे पण
भेटले भलते ससाणे जीवघेणे

हे तर लय बेस्ट पहा.....

मदनबाण.....

गिरीराज's picture

16 May 2008 - 5:27 pm | गिरीराज

शब्द सारे संपल्यावर संयमाचे
काढले आमचे घराणे जीवघेणे

अगदी जबरी... मूळ शेराला जवळ असूनही वास्तवतेच्या अधिक जवळ आहे ! :)

केशवसुमार's picture

17 May 2008 - 8:18 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मना पासून आभार.
(आभारी)केशवसुमार

फटू's picture

18 May 2008 - 9:20 pm | फटू

'कबुतरां'ना पाहणा गेलो खरे पण
भेटले भलते ससाणे जीवघेणे

वयाच्या गद्धे पंचविशीत असल्यामुळे हा अनुभव आम्ही बरेच वेळा घेतो... :D

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...