Skip to main content

जीवघेणे-२

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 16/05/2008 17:02 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा मिल्याची सुंदर गझल जीवघेणे

रेकते रेड्याप्रमाणे! जीवघेणे
का असे म्हणतेस गाणे! जीवघेणे

नाव ओठांवर कुणाचे घेतले मी
आमचे चुकले उखाणे जीवघेणे

एक तर गिरवायची शेणात नावे
आणि वासाचे बहाणे जीवघेणे

'कबुतरां'ना पाहणा गेलो खरे पण
भेटले भलते ससाणे जीवघेणे

चालतो मी आज येथे हे असे का?
पाडले होते उताणे जीवघेणे

तिंबले कणके परी मजला कशाला?
रोजचे हे मार खाणे जीवघेणे

बायकोला खण उघडताना मिळाले
आमचे काही पुराणे जीवघेणे

शब्द सारे संपल्यावर संयमाचे
काढले आमचे घराणे जीवघेणे

लेखनविषय:

वाचने 2915
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

सुरुवातच बेफाम..
'कबुतरां'ना पाहणा गेलो खरे पण भेटले भलते ससाणे जीवघेणे
:)) मस्तच हो केशवसुमार! "तिंबले" शब्द फार प्रिय आणि जवळचा आहे वाटतं तुमचा.

नाव ओठांवर कुणाचे घेतले मी आमचे चुकले उखाणे जीवघेणे व्वा !!!! 'कबुतरां'ना पाहणा गेलो खरे पण भेटले भलते ससाणे जीवघेणे हे तर लय बेस्ट पहा..... मदनबाण.....

शब्द सारे संपल्यावर संयमाचे काढले आमचे घराणे जीवघेणे अगदी जबरी... मूळ शेराला जवळ असूनही वास्तवतेच्या अधिक जवळ आहे ! :)

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मना पासून आभार. (आभारी)केशवसुमार

'कबुतरां'ना पाहणा गेलो खरे पण भेटले भलते ससाणे जीवघेणे वयाच्या गद्धे पंचविशीत असल्यामुळे हा अनुभव आम्ही बरेच वेळा घेतो... :D पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...