तू म्हटल्यावर मला पण जाणवलं.. बहुधा, काळ्या बुब्बुळांमधे पांढरा डॉट असतो, इथे जरा उलटं आहे म्हणून का?
पंकज कपूरच्या चित्रात कॉलरला, नाकाला ती रूपेरी किनार कशाने आणली मास्तर??
कॉलरला, नाकाला ती रूपेरी किनार
आता नक्की आठवत नाहीये...वेगवेगळ्या गोष्टी करून पाहिल्या, वेगवेगळी खोडरबरे वापरून पाहिली...पण जमेना...
मग एका खोडरबराला टोक काढले पेन्सिलसारखे... त्यानेच जमले असावे
सुंदर रेखाटने! पंकजकपूर आणि डॉ ओक यांची रेखाटने मस्तच आली आहेत!
मास्तर, आपल्याला दंडवत!
अवांतर - च्यामारी, मिपावर खरोखर इतकी गुणी मंडळी आहेत, चित्रकार आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, उत्तम फोटोग्राफर आहेत, सुग्रास पाककृतीकार आहेत, की इतक्या सर्व या गुणी लोकात साला आपलं काय काम बरं? असा अलिकडे मला न्यूनगंड वाटू लागला आहे! :)
तात्या.
च्यामारी, मिपावर खरोखर इतकी गुणी मंडळी आहेत, चित्रकार आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, उत्तम फोटोग्राफर आहेत, सुग्रास पाककृतीकार आहेत, की इतक्या सर्व या गुणी लोकात साला आपलं काय काम बरं? असा अलिकडे मला न्यूनगंड वाटू लागला आहे! Smile
मी पण असेच म्हणतो. सतलज - मी तर तुझा पंखा झालोय! :)
अवांतर - अरे-तुरे चालेल ना? मला शेठ, पंत नकोसे वाटते!
गिरीश ओक आणि पंकज कपूर मस्तच.
सुबोध भावे चटकन ओळखू येत नाही.
पंकज कपूरच्या नाकातून प्रकाशझोत आल्यासारखे वाटते.
मास्तर.. रेखाटनांचे क्लासेस कधी सुरु करताय.. :)
पंकज कपूरच्या नाकातून प्रकाशझोत आल्यासारखे वाटते.
मलाही आत्त तसेच वाटतेय... :)) :)) हो त्या फोटोमध्येही तसाच प्रकाशझोत येत होता... : ).
कसे काय जमते बुवा यांना...
मास्तर....यू टू ????
पंकज 'करमचंद' कपूर आणि डॉ.ओक बढिया....
आयला, तात्याबा म्हनत्यात ते माझ्याशाठी काय चपखल बसतंय बॉ...
च्यामारी, मिपावर खरोखर इतकी गुणी मंडळी आहेत, चित्रकार आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, उत्तम फोटोग्राफर आहेत,
की इतक्या सर्व या गुणी लोकात साला आपलं काय काम बरं? असा अलिकडे मला न्यूनगंड वाटू लागला आहे!
या दिवसात मिपावर खुपच रेखाटने येउ लागली आहेत. त्यावरुन ८ वर्षापुर्वीची एक गोष्ट आठवली.
नुकताच इंजिनीयरींगला प्रवेश घेउन मी सोलापुरला होस्टेलवर रहायला गेलो होतो. सुरवातीच्या दिवसात आसपासच्या रूम मधील सगळ्यांशी जुजबी ओळख झाली. सगळेच नविन. कॉलेजही निट सुरु झाले नसल्याने आम्ही चकाट्या पिटत ओळखी वाढवत होतो. त्यातला असाच एक मुलगा अधुन मधुन चित्रे काढून आम्हाला दाखवायचा. त्याच्या रूमपार्टनेरशी माझी समान शीले व्यसनेशु न्यायाने बरी ओळख झाली होती. तर एक दिवस मी त्याच्या रुममधे गेलो असता त्या चित्रकाराने हाक मारुन मला एक चित्र दाखवले. ते चित्र लांब टेबलावर ठेउन मी यायच्या आधी ते दोघे त्याचे रसग्रहण करत होते. मी आयताच सापडलो त्याच्या तावडीत. छातीपासुन वर एका व्यक्तीचा चेहरा स्केच केला होता. माझ्या अल्पबुध्धीला आणि कलाकारी आंधळेपणा असल्याने तो कोणत्या व्यक्तीचा चेहरा आहे हे ओळखता आले नाही. वर तो चित्रकार कुठलाही तपशील न पुरवता फक्त "कसे आहे?" येवढेच विचारत होता. कोट, टाय, गोबरे गाल यावरुन मला ते बाबासाहेबांचे स्केच वाटले. मग मी पण कौतुक सुरु केले. "वा ! सुंदर!! मस्तच काढलयस!! अगदी हुबेहुब आलय स्केच.... तू चित्रकलेच्या परिक्षा दिलेल्या आहेस का?" त्या चित्रकाराचा चेहरा माझ्या एक एक शब्दानीशी फुलत होता. डोळ्यातून कृतकृत्य झाल्याचे आणि अभिमानाचे भाव ओसांडून वहात होते. आणि त्याचवेळी मला पुढचा प्रश्न टाकायची दूर्बुध्धी झाली. "आरे पण तू बाबासाहेबांना चष्मा का नाही काढलास?". टाचणी लागून फुगा फुटावा तसा त्याचा चेहरा खरर्रकन उतरला. त्यात आगीत तेल म्हणून मागे बसलेला माझा मित्र फ्याकन हसला. "का रे? काय झाले?" परिस्थीतीची जाणीव होउन मी विचारले त्यावर "काही नाही. तू जा", येवढच तो चित्रकार तुटकपणे म्हणाला. मी तेथून सटकलो आणि माझ्या रुम मधे येउन बसलो. १० मिनीटानी तो मित्र हसत हसत रुम मधे शिरला. मला टाळी देउन म्हणाला"काय राव तू तर पारच मारून ठेवलीस त्याची. तू यायच्या आधी आम्ही त्या चित्रावरच चर्चा करत होतो. मी आगोदर लै कौतुक करुन ठेवले होते त्या चित्राचे. तू फारच मारलीस. तू गेल्यावर चित्रकार मला शिव्या देत होता की तू खोटे का बोललास? आगोदरच का नाही सांगीतलेस स्केच भंकस आलय म्हणून? असे म्हणून त्याने ते चित्र फाडून त्याचे तुकडे तुकडे केले आणि खिडकीतून फेकुन दिले."
मी : आरे पण येवढे चिडायला काय झाले त्या चित्रकाराला? आणि ते चित्र नक्की कुणाचे होते?
मित्र : दिलीपकुमारचे काढल होत त्याने चित्र.
आरारा ... अरे माझे चित्र !!!
अहो भडकमकर मास्तर, खरं सांगा आपण कधी भेटलो होतो का ?
अगदी हुबेहुब "मीच की तो " ...
अशेच वाढलेले केस, चेहर्यावर सदा हास्य आता फक्त एक स्टायलीश चष्मा चढवा म्हणजे झाले ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
बास काय? इव्हेन्ट मॅनेजमेंट करायला घेताय काय आमची?
...
संवाद...
" कसं काय बुवा जमतं तुला हे?
खरंच हे लोकांपुढे आलं पाहिजे...
आपण प्रदर्शन लावूयात का? तू बोलूच नकोस्..लावूयातच...
मस्त मोठ्या कलादालनात लावू...
बघायला रांगा लागतील रांगा...
पेपरा बिपरात छापून आणू...तू एका हातात दाताचा चिमटा, दुसर्या हातात स्केच करायची पेन्सिल, आणि स्टेजवर अभिनय करत आहे असे प्रतीकात्मक फोटो पण टाकूयात.......
एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ...
हुसेन बिसेनला बोलवू, त्याच्या हस्ते तुझा सत्कार करू... तो नको म्हणतोस? बरं.... अरे पण तो आला तर पब्लिसिटी केवढी मिळेल...
काही विचार करू नकोस, तू सगळं माझ्यावर सोड...
तू प्रसिद्ध चित्रकार झालासच म्हणून समज..."
.........
आम्हीच सापडलो परत!
=))
बाकी ही प्रदर्शनाची कल्पना मस्त आहे ;) गर्दी खेचायला 'बुश,लिंकन,उंट,कुत्रा आणि थांब लक्ष्मी कुंकू लावते' चा एक अंक फुकट दाखवू...तेव्हढीच त्या नाटकाची पण जाहिरात होईल.
तू एका हातात दाताचा चिमटा, दुसर्या हातात स्केच करायची पेन्सिल, आणि स्टेजवर अभिनय करत आहे असे प्रतीकात्मक फोटो पण टाकूयात.......
=)) =))
जब्बरान् !!!! च्यायला, काय भारी दिसेल नै?
हुसेन बिसेनला बोलवू,
हॅट्ट....ते थेरडं माझ्या समोर जरी आलं ना तर नागडा करुन वेताच्या ओल्या फोकानं सडकून काढेन त्याला..सीतामाई आणि बजरंगबलीची नागडी चित्रं काढतंय, दळभद्री सालं.
बाकी आपण इव्हेंट एकदम झकास जमवू....त्याची काळजी नको..मागं रंगपंचमीला राजुआन्ना शेट्टी भेटला होता, त्याला सांगून आपण गावभर फलक पण लावून टाकू...एकदम जंक्शान करु पोग्रॅम....तेव्हढं.....१,५१,०००/- चेक धाडून द्या हापिसात म्हणजे लागतो लगेच तयारीला ;)
-(इव्हेंट म्यानिजर) ध मा ल.
:| याला टॅलंट म्हणायचं की काय म्हणायचं आता.. बोलती बंद केलीत तुम्ही!! मला तरी एकाही चित्रात खोड काढावी असे काहीही दिसले नाही.. अमेझिंग पर्फेक्शन ! मानलं!
कल्पनेतून चित्रं काढणारा खरा ! कापी करनं दुय्यम!
खरं बोललात..
ही कॉपी काय कोणीही एका चित्रावर जरा ३ - ४ तास कष्ट केले तर करू शकतो...
तवा तुमची मेम्री ड्राईंग दाखवा राव
.. आपण मेमरी ड्रॉईंग केलेच नाही कधी..मला माणसांची चित्रे लै आवडतात... फोटोवरून काढायला... त्यात लाईकनेस जमला की बेष्ट वाटते....
जे आवडतं ते करत बसतो... सध्या अँड्र्यू लूमिस नावाचा कोणी एक बाबा होता त्याने फिगर ड्रॉईंग वर पुस्तक लिहिलंय ते जालावर सापडले त्यावरून फिगर ड्रॉइंग शिकतोय, सराव चालू आहे...
..पण पोर्ट्रेट ची मज्जा नाय ना राव त्यात...
जबराट चित्रे!
पंकज कपूर, गिरीश ओक आणि डि कॅप्रिओ एकदम फिट्ट!
किरण बेदी आणि कुसुमाग्रज यांचा लाइकनेस चांगला आलाय.
(स्वगत - मास्तुरे, बाकी हातात जादू आहे हो तुमच्या! कोणा चित्रकार पेशंटला दाखवू नका, नाहीतर काँपिटिशन आली म्हणून तुमच्यावर 'दात धरायचा'! ;))
चतुरंग
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
मास्तर
सुंदर चित्रे !!! वा मास्तर वा !!!
अफलातून
छान .....
तू
हो
कोणास ठाउक
कॉलरला,
सुंदर...
असेच म्हणतो
बिन्धास्त
डॉ ओक
मास्तर... मानगए...
पंकज
पंकज
मास्तर....यू
वा..
माझा अनुभव
भावना
कृतकृत्य
ही थोडी
महिमा..
तुम्हाला
बिपाषा
(विषय दिलेला नाही)
किरण बेदी
(विषय दिलेला नाही)
:)
(विषय दिलेला नाही)
मास्तर
हा पोरगा
आयला हा तर मी !!!
आबाबाबाबा
इव्हेंट....
हाणा तिच्याआयला....
is he lionardo dicaprio ????
होय होय,
घड्या पडून
घड्या पडून सुद्धा.....
धन्यवाद...
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
हा भौ
सिनेमा
याला
लय् झॅक!
कल्पनेतून
A++
मास्तुरे!
अरे बाप रे !