✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मास्तरांची पेन्सिल स्केचेस

भ
भडकमकर मास्तर यांनी
Fri, 05/16/2008 - 09:33  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27341 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 09:37 नवीन

(विषय दिलेला नाही)

Image removed.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 05/16/2008 - 09:37 नवीन

मास्तर

तुम्ही पण चित्रकार. मला वाटते बहुतेक एक वेगळा चित्रकला विभाग निघणार मिपावर
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/16/2008 - 13:46 नवीन

सुंदर चित्रे !!! वा मास्तर वा !!!

तुम्ही पण चित्रकार. मला वाटते बहुतेक एक वेगळा चित्रकला विभाग निघणार मिपावर असेच म्हणतो !!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
भ
भाग्यश्री Fri, 05/16/2008 - 09:50 नवीन

अफलातून

अफलातून आहेत हो!! गिरीश ओकांचे सगळ्यात जास्त आवडलं, मग सुबोध भावे.. फारच छान!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 05/16/2008 - 09:50 नवीन

छान .....

छान चित्रे आहेत..... का ते माहित नाही पण वरील सर्वच चित्रांचे डोळे (बाहुल्या) मला जरा वेगळ्या वाटल्या..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 05/16/2008 - 09:54 नवीन

तू

तू म्हटल्यावर मला पण जाणवलं.. बहुधा, काळ्या बुब्बुळांमधे पांढरा डॉट असतो, इथे जरा उलटं आहे म्हणून का? पंकज कपूरच्या चित्रात कॉलरला, नाकाला ती रूपेरी किनार कशाने आणली मास्तर??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Fri, 05/16/2008 - 09:58 नवीन

हो

इथे जरा उलटं आहे म्हणून बहुधा त्यामुळेच मला तसे वाटत असावे..... मला पण गिरीश ओकांचे चित्र जास्त आवडलं..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 10:03 नवीन

कोणास ठाउक

कोणास ठाउक कसे असते?,.. फोटोत दिसते तसे काढायचा प्रयत्न तरी करतो ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 09:58 नवीन

कॉलरला,

कॉलरला, नाकाला ती रूपेरी किनार आता नक्की आठवत नाहीये...वेगवेगळ्या गोष्टी करून पाहिल्या, वेगवेगळी खोडरबरे वापरून पाहिली...पण जमेना... मग एका खोडरबराला टोक काढले पेन्सिलसारखे... त्यानेच जमले असावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
व
विसोबा खेचर Fri, 05/16/2008 - 10:06 नवीन

सुंदर...

सुंदर रेखाटने! पंकजकपूर आणि डॉ ओक यांची रेखाटने मस्तच आली आहेत! मास्तर, आपल्याला दंडवत! अवांतर - च्यामारी, मिपावर खरोखर इतकी गुणी मंडळी आहेत, चित्रकार आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, उत्तम फोटोग्राफर आहेत, सुग्रास पाककृतीकार आहेत, की इतक्या सर्व या गुणी लोकात साला आपलं काय काम बरं? असा अलिकडे मला न्यूनगंड वाटू लागला आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 05/16/2008 - 12:23 नवीन

असेच म्हणतो

च्यामारी, मिपावर खरोखर इतकी गुणी मंडळी आहेत, चित्रकार आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, उत्तम फोटोग्राफर आहेत, सुग्रास पाककृतीकार आहेत, की इतक्या सर्व या गुणी लोकात साला आपलं काय काम बरं? असा अलिकडे मला न्यूनगंड वाटू लागला आहे! Smile
मी पण असेच म्हणतो. सतलज - मी तर तुझा पंखा झालोय! :) अवांतर - अरे-तुरे चालेल ना? मला शेठ, पंत नकोसे वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 13:39 नवीन

बिन्धास्त

बिन्धास्त अरे तुरे कर ... धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
आ
आनंदयात्री Fri, 05/16/2008 - 10:23 नवीन

डॉ ओक

सगळ्यात छान जमलेत .. बाकिचे पण मस्त !
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 05/16/2008 - 10:56 नवीन

मास्तर... मानगए...

गिरीश ओक आणि पंकज कपूर मस्तच. सुबोध भावे चटकन ओळखू येत नाही. पंकज कपूरच्या नाकातून प्रकाशझोत आल्यासारखे वाटते. मास्तर.. रेखाटनांचे क्लासेस कधी सुरु करताय.. :)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 13:45 नवीन

पंकज

पंकज कपूरच्या नाकातून प्रकाशझोत आल्यासारखे वाटते. मलाही आत्त तसेच वाटतेय... :)) :)) हो त्या फोटोमध्येही तसाच प्रकाशझोत येत होता... : ). कसे काय जमते बुवा यांना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 05/16/2008 - 21:28 नवीन

पंकज

पंकज कपूरच्या नाकातून प्रकाशझोत आल्यासारखे वाटते :) :) नशीब नाका॑त कापूस घातल्यासारखे नाही वाटले.. :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ध
धमाल मुलगा Fri, 05/16/2008 - 11:04 नवीन

मास्तर....यू

मास्तर....यू टू ???? पंकज 'करमचंद' कपूर आणि डॉ.ओक बढिया.... आयला, तात्याबा म्हनत्यात ते माझ्याशाठी काय चपखल बसतंय बॉ...
च्यामारी, मिपावर खरोखर इतकी गुणी मंडळी आहेत, चित्रकार आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, उत्तम फोटोग्राफर आहेत, की इतक्या सर्व या गुणी लोकात साला आपलं काय काम बरं? असा अलिकडे मला न्यूनगंड वाटू लागला आहे!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 05/16/2008 - 11:34 नवीन

वा..

अरे व्वा,मास्तर,तुम्ही सुध्दा चित्रकार तर !.. सुंदर रेखाटने!
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Fri, 05/16/2008 - 14:07 नवीन

माझा अनुभव

या दिवसात मिपावर खुपच रेखाटने येउ लागली आहेत. त्यावरुन ८ वर्षापुर्वीची एक गोष्ट आठवली. नुकताच इंजिनीयरींगला प्रवेश घेउन मी सोलापुरला होस्टेलवर रहायला गेलो होतो. सुरवातीच्या दिवसात आसपासच्या रूम मधील सगळ्यांशी जुजबी ओळख झाली. सगळेच नविन. कॉलेजही निट सुरु झाले नसल्याने आम्ही चकाट्या पिटत ओळखी वाढवत होतो. त्यातला असाच एक मुलगा अधुन मधुन चित्रे काढून आम्हाला दाखवायचा. त्याच्या रूमपार्टनेरशी माझी समान शीले व्यसनेशु न्यायाने बरी ओळख झाली होती. तर एक दिवस मी त्याच्या रुममधे गेलो असता त्या चित्रकाराने हाक मारुन मला एक चित्र दाखवले. ते चित्र लांब टेबलावर ठेउन मी यायच्या आधी ते दोघे त्याचे रसग्रहण करत होते. मी आयताच सापडलो त्याच्या तावडीत. छातीपासुन वर एका व्यक्तीचा चेहरा स्केच केला होता. माझ्या अल्पबुध्धीला आणि कलाकारी आंधळेपणा असल्याने तो कोणत्या व्यक्तीचा चेहरा आहे हे ओळखता आले नाही. वर तो चित्रकार कुठलाही तपशील न पुरवता फक्त "कसे आहे?" येवढेच विचारत होता. कोट, टाय, गोबरे गाल यावरुन मला ते बाबासाहेबांचे स्केच वाटले. मग मी पण कौतुक सुरु केले. "वा ! सुंदर!! मस्तच काढलयस!! अगदी हुबेहुब आलय स्केच.... तू चित्रकलेच्या परिक्षा दिलेल्या आहेस का?" त्या चित्रकाराचा चेहरा माझ्या एक एक शब्दानीशी फुलत होता. डोळ्यातून कृतकृत्य झाल्याचे आणि अभिमानाचे भाव ओसांडून वहात होते. आणि त्याचवेळी मला पुढचा प्रश्न टाकायची दूर्बुध्धी झाली. "आरे पण तू बाबासाहेबांना चष्मा का नाही काढलास?". टाचणी लागून फुगा फुटावा तसा त्याचा चेहरा खरर्रकन उतरला. त्यात आगीत तेल म्हणून मागे बसलेला माझा मित्र फ्याकन हसला. "का रे? काय झाले?" परिस्थीतीची जाणीव होउन मी विचारले त्यावर "काही नाही. तू जा", येवढच तो चित्रकार तुटकपणे म्हणाला. मी तेथून सटकलो आणि माझ्या रुम मधे येउन बसलो. १० मिनीटानी तो मित्र हसत हसत रुम मधे शिरला. मला टाळी देउन म्हणाला"काय राव तू तर पारच मारून ठेवलीस त्याची. तू यायच्या आधी आम्ही त्या चित्रावरच चर्चा करत होतो. मी आगोदर लै कौतुक करुन ठेवले होते त्या चित्राचे. तू फारच मारलीस. तू गेल्यावर चित्रकार मला शिव्या देत होता की तू खोटे का बोललास? आगोदरच का नाही सांगीतलेस स्केच भंकस आलय म्हणून? असे म्हणून त्याने ते चित्र फाडून त्याचे तुकडे तुकडे केले आणि खिडकीतून फेकुन दिले." मी : आरे पण येवढे चिडायला काय झाले त्या चित्रकाराला? आणि ते चित्र नक्की कुणाचे होते? मित्र : दिलीपकुमारचे काढल होत त्याने चित्र.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 14:11 नवीन

भावना

भावना पोचल्या... =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
म
मनस्वी Fri, 05/16/2008 - 14:14 नवीन

कृतकृत्य

:)) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 14:09 नवीन

ही थोडी

ही थोडी तिरळी वाटणारी तै कोण बरं असावी? Image removed.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 05/16/2008 - 14:13 नवीन

महिमा..

मला नाही तिरळी वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 14:48 नवीन

तुम्हाला

तुम्हाला तर लगेच ओळखली की... मलाच नीट कळेना मगाशी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ऋ
ऋचा Fri, 05/16/2008 - 14:11 नवीन

बिपाषा

बिपाषा बासु :)) :)) :))
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 14:12 नवीन

(विषय दिलेला नाही)

Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 06/03/2008 - 17:16 नवीन

किरण बेदी

आवडल्या. स्मितहास्य असलं तरी नजर काहीतरी शोधते आहे हे डोळ्यांतील भाव आणि कपाळावरील आठ्या दाखवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 14:14 नवीन

(विषय दिलेला नाही)

Image removed.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/16/2008 - 14:21 नवीन

:)

माफ करा मास्तर, परंतु कुसुमाग्रज अंमळ कॉमिकच दिसताहेत! :)) आपला, तात्याग्रज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 14:36 नवीन

(विषय दिलेला नाही)

;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ऋ
ऋचा Fri, 05/16/2008 - 14:14 नवीन

मास्तर

मास्तर तुमी तर लै भारी निगाले की वो!!!!!!!!!! =D>
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 14:15 नवीन

हा पोरगा

हा पोरगा बराच बरा जमलाय असं मला वाटतंय.. Image removed.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 05/16/2008 - 18:23 नवीन

आयला हा तर मी !!!

आरारा ... अरे माझे चित्र !!! अहो भडकमकर मास्तर, खरं सांगा आपण कधी भेटलो होतो का ? अगदी हुबेहुब "मीच की तो " ... अशेच वाढलेले केस, चेहर्‍यावर सदा हास्य आता फक्त एक स्टायलीश चष्मा चढवा म्हणजे झाले ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ध
धमाल मुलगा Fri, 05/16/2008 - 14:18 नवीन

आबाबाबाबा

आबाबाबाबाबा..... येक म्हराठी नाटकं करणारा, चित्रकार असलेला, 'डेंटल सर्जन' ? ओ मास्तर, च्यायला, एकदा नीट वाचून बघा ही ओळ...आम्हाला वाचायला पण झेपत नाय, तुम्हाला एव्हढं सगळं करायला कसं जमतं हो?
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 14:46 नवीन

इव्हेंट....

बास काय? इव्हेन्ट मॅनेजमेंट करायला घेताय काय आमची? ... संवाद... " कसं काय बुवा जमतं तुला हे? खरंच हे लोकांपुढे आलं पाहिजे... आपण प्रदर्शन लावूयात का? तू बोलूच नकोस्..लावूयातच... मस्त मोठ्या कलादालनात लावू... बघायला रांगा लागतील रांगा... पेपरा बिपरात छापून आणू...तू एका हातात दाताचा चिमटा, दुसर्‍या हातात स्केच करायची पेन्सिल, आणि स्टेजवर अभिनय करत आहे असे प्रतीकात्मक फोटो पण टाकूयात....... एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ... हुसेन बिसेनला बोलवू, त्याच्या हस्ते तुझा सत्कार करू... तो नको म्हणतोस? बरं.... अरे पण तो आला तर पब्लिसिटी केवढी मिळेल... काही विचार करू नकोस, तू सगळं माझ्यावर सोड... तू प्रसिद्ध चित्रकार झालासच म्हणून समज..." .........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Fri, 05/16/2008 - 15:28 नवीन

हाणा तिच्याआयला....

आम्हीच सापडलो परत! =)) बाकी ही प्रदर्शनाची कल्पना मस्त आहे ;) गर्दी खेचायला 'बुश,लिंकन,उंट,कुत्रा आणि थांब लक्ष्मी कुंकू लावते' चा एक अंक फुकट दाखवू...तेव्हढीच त्या नाटकाची पण जाहिरात होईल.
तू एका हातात दाताचा चिमटा, दुसर्‍या हातात स्केच करायची पेन्सिल, आणि स्टेजवर अभिनय करत आहे असे प्रतीकात्मक फोटो पण टाकूयात.......
=)) =)) जब्बरान् !!!! च्यायला, काय भारी दिसेल नै?
हुसेन बिसेनला बोलवू,
हॅट्ट....ते थेरडं माझ्या समोर जरी आलं ना तर नागडा करुन वेताच्या ओल्या फोकानं सडकून काढेन त्याला..सीतामाई आणि बजरंगबलीची नागडी चित्रं काढतंय, दळभद्री सालं. बाकी आपण इव्हेंट एकदम झकास जमवू....त्याची काळजी नको..मागं रंगपंचमीला राजुआन्ना शेट्टी भेटला होता, त्याला सांगून आपण गावभर फलक पण लावून टाकू...एकदम जंक्शान करु पोग्रॅम....तेव्हढं.....१,५१,०००/- चेक धाडून द्या हापिसात म्हणजे लागतो लगेच तयारीला ;) -(इव्हेंट म्यानिजर) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ऋ
ऋचा Fri, 05/16/2008 - 14:18 नवीन

is he lionardo dicaprio ????

is he lionardo dicaprio ???? :W
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 14:23 नवीन

होय होय,

होय होय, लिओ आहे तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 14:19 नवीन

घड्या पडून

घड्या पडून आणि डाग पडून थोडं खराब झालेलं चित्र... या तै कधी पसरट चेहर्‍याच्या वाटतात, कधी बरोबर चेहर्‍याच्या दिसतात..... Image removed.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 05/16/2008 - 17:34 नवीन

घड्या पडून सुद्धा.....

ओ मास्तर जबरदस्त की हो !!!!! एका पेक्षा एक..... दात तर फारच सुरेख आले आहेत या चित्रात..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 17:45 नवीन

धन्यवाद...

दात काढताना ( ! ) मी विशेष काळजी घेतो.... :)) :)) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Fri, 05/16/2008 - 18:09 नवीन

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

दात काढताना ( ! ) मी विशेष काळजी घेतो.... =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 14:22 नवीन

हा भौ

हा भौ कॅसेट कव्हर वरून डायरेक्ट चितारलाय... Image removed.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 14:24 नवीन

सिनेमा

सिनेमा पहायला सारख्या कानला जाणार्‍या ताई... Image removed.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 05/16/2008 - 14:26 नवीन

याला

:| याला टॅलंट म्हणायचं की काय म्हणायचं आता.. बोलती बंद केलीत तुम्ही!! मला तरी एकाही चित्रात खोड काढावी असे काहीही दिसले नाही.. अमेझिंग पर्फेक्शन ! मानलं!
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 05/16/2008 - 16:01 नवीन

लय् झॅक!

तुमी तर जबरी कलाकार अहात म्हना की. लाईकनेस मधे मास्टर! पन् खरं सांगू ? कल्पनेतून चित्रं काढणारा खरा ! कापी करनं दुय्यम! तवा तुमची मेम्री ड्राईंग दाखवा राव!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/16/2008 - 17:27 नवीन

कल्पनेतून

कल्पनेतून चित्रं काढणारा खरा ! कापी करनं दुय्यम! खरं बोललात.. ही कॉपी काय कोणीही एका चित्रावर जरा ३ - ४ तास कष्ट केले तर करू शकतो... तवा तुमची मेम्री ड्राईंग दाखवा राव .. आपण मेमरी ड्रॉईंग केलेच नाही कधी..मला माणसांची चित्रे लै आवडतात... फोटोवरून काढायला... त्यात लाईकनेस जमला की बेष्ट वाटते.... जे आवडतं ते करत बसतो... सध्या अँड्र्यू लूमिस नावाचा कोणी एक बाबा होता त्याने फिगर ड्रॉईंग वर पुस्तक लिहिलंय ते जालावर सापडले त्यावरून फिगर ड्रॉइंग शिकतोय, सराव चालू आहे... ..पण पोर्ट्रेट ची मज्जा नाय ना राव त्यात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ग
गणपा Fri, 05/16/2008 - 16:05 नवीन

A++

मास्तर एका पेक्षा एक वरचढ रेखाटने. आणि मिपा वरची सगळी रेखाटन पाहुन वाटते की एक से बढकर एक रेखाटनकार. काँपिटिशन भलतीच रंगली आहे. लगे रहो........
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/16/2008 - 16:43 नवीन

मास्तुरे!

जबराट चित्रे! पंकज कपूर, गिरीश ओक आणि डि कॅप्रिओ एकदम फिट्ट! किरण बेदी आणि कुसुमाग्रज यांचा लाइकनेस चांगला आलाय. (स्वगत - मास्तुरे, बाकी हातात जादू आहे हो तुमच्या! कोणा चित्रकार पेशंटला दाखवू नका, नाहीतर काँपिटिशन आली म्हणून तुमच्यावर 'दात धरायचा'! ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 05/16/2008 - 16:53 नवीन

अरे बाप रे !

तुम्ही तर अफलातुन माणुन आहात, मान गये उस्ताद आपको. स्केचेस ही सही आहेत.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा