मिकाच्या उत्साहाला सलाम करून अजून 'एक काहीच्या काही भयाण' विडंबन.
या भरल्या गटारात चाचपडताना |
बार बार तुझ्या शोधात फिरतांना |
बाकड्यावर बसून तुझी वाट पाहतांना|
कळले की सारे सारे पैसे संपून गेले, काल रात्री ||
चोरली माझी नवी ती सारी वस्त्रे |
धरली नि बदडली देहाची गात्रे |
सांजवेळी स्मरली आपल्या पार्ट्यांची सत्रे ,
मित्र सारे की सारे बिल न देता गेले, काल रात्री ||
बारचे वेटरही मजबूत काळे |
शर्ट चोरला पँटही नेली लंगोट आवळे|
अन् इथे कुणी सोडलेले सुसाट नळे |
बघ सखे कसे सारे सारे जलमय झाले, काल रात्री ||
कविता जणू शब्दबंबाळ जाळे |
दमूनी पाहतो, कधी संपते न कळे|
किती करावे मी तरी पांढर्यावर काळे|
निम्मी विडंबित करून थांबलो येथेच, काल रात्री ||
काव्यरस
वाचने
1525
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
बबब!!
रात्री
In reply to बबब!! by मिसळलेला काव्यप्रेमी
किती करावे मी तरी पांढर्यावर