✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

महालक्ष्मी च्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी

अ
अजातशत्रु यांनी
Fri, 04/15/2011 - 20:57  ·  लेख
लेख
मानवमुक्तीचा लढा अधिक गतिमान करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापुरातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात स्त्रीमुक्तीच्या लढय़ाचे पहिले पाऊल पडले. वस्तुत: याचे रनशिन्ग म.न,से. आमदार श्री.राम कदम यानी फुन्कले होते, पण इथेही भा.ज .पा. ने राजकरण करत भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून देवीच्या पहिल्या गाभाऱ्यात प्रवेश केला कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी हि गेली अनेक वर्षे चालु आहे, अपवाद फक्त राज घराण्यातिल/ आणि Celebrity स्त्रिया मुळात मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी का? याचे समाधानकारक उत्तर तेथिल ब्राम्हण पुजारि का देउ शकत नाहित.... तथापि अलीकडच्या काळात हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि आज बुधवारी तर महिलांनी आंदोलन करीत सत्याग्रहाने एक नवे पाऊल पुढे टाकले.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30923 वाचन

💬 प्रतिसाद (120)

प्रतिक्रिया

बाकीचे उत्तर सवडीने लिहितो

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/19/2011 - 15:35 नवीन
बाकीचे उत्तर सवडीने लिहितो ग. फक्त गैरसमज दूर करतो आधी :-
आम्ही काय भर घालणार. आमच्या चुका दुरुस्त आधी करायला हव्यात. असो
हे तुला नाही काही. अजातशत्रुनांना विनंती आहे. अभ्यासु माणुस तू आहेस का ते ? असा कसा गैरसमज करुन घेतलास बरे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

अभ्यासु माणुस तू आहेस का ते ?

टारझन
Tue, 04/19/2011 - 15:38 नवीन
अभ्यासु माणुस तू आहेस का ते ?
श्री राजकुमार , तुम्हाला अभ्यासु बैमाणुस म्हणायचे आहे काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धन्यवाद. बैमाणुस शब्द आला

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/19/2011 - 15:44 नवीन
धन्यवाद. बैमाणुस शब्द आला असता तर अनावधानाने अजातशत्रुंचा अपमान झाला असता ;) म्हणुन माणुस ह्या शब्दावरुन निभावुन नेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

'माझा विरोध ब्राह्मणांना नसून

मृत्युन्जय
Tue, 04/19/2011 - 14:41 नवीन
'माझा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे.' माझा विरोध मुर्खांना नसुन मुर्खपणाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

इथे एक नमुद करतो कि माझा

अप्पा जोगळेकर
Tue, 04/19/2011 - 20:28 नवीन
इथे एक नमुद करतो कि माझा आक्षेप हा ब्राम्हण जाती वर नसुन,ब्राम्हण्यांवर आहे. शब्दांचे खेळ कशाला करता ? एखाद्या विशिष्ट जातीवर राग असेल तर निदान तसे उघडपणे सांगण्याची धमक दाखवा. तुम्ही सशाच्या काळजाचे नाही ना, तर मग उगा भेदरटपणा नको. त्यातुनच आपल्या भारतवर्षाला वर्ण व्यवस्था/ जातव्यवस्था/ स्त्रियांवरिल जाचक अटी त्यांना गुलामा प्रमाणे वागवणे या व अशा अनेक अनिष्ट प्रथा आणी धार्मिक गोष्टींचा "मौल्यवान सांस्कृतिक" ठेवा मिळाला आहे... अशा प्रथांचा त्यांनी कायमच अफूसारखा उपयोग करुन भोळ्या भाबड्या लोकांना विषमते च्या गुलामगिरीत ठेविले आहे, ही माहिती अर्धवट, अपुरी आहे. कोणीतरी एक ग्रंथ लिहिला आणि हजारो वर्षे त्याचे परिणाम करोडो लोकांना भोगावे लागले इतकी ही गोष्ट साधी नाही. निवडणुकीत प्रचार करण्यासाठी ठीक आहे. एका ब्राम्हण लेखकाने हिंदू धर्म, वर्णव्यवस्था वगैरे वगैरे येथे वर्णव्यवस्थेचा अल्पसा परामर्श घेतला आहे. ते काही अंतिम सत्य नव्हे. पण निदान ते तुमच्यासारखे कोणत्याही जातीवर डूख धरुन लिहिलेले नाही. अहो पण हि व्यवस्था निर्माण केलि कुणी? यावर आपण कधी विचार करणार आहोत कि नाहि? कोणी निर्माण केली, कशी निर्माण झाली, कोणी कोणी फॉलो केली याचा जरुर विचार करा आणि थोडेसे वाचनही करा. कोणत्यातरी जातीचे नियमितपणे प्रसिद्ध होणारे मासिक किंवा पाक्षिक संदर्भासाठी वाचू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

छान चर्चा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/19/2011 - 15:26 नवीन
छान चर्चा. कोणत्याही मंदिरात अथवा सार्वजनिक ठिकाणी स्त्री-पुरुष असा भेदभाव करुन कोणालाही प्रवेश नाकारु नये. बाकी, अशा भेदभाव करणार्‍या रुढी-परंपरा हळूहळू नष्ट होत आहेत ही चांगली गोष्ट. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

डॉ. बिरुटेंना धन्यवाद..

योगप्रभू
Tue, 04/19/2011 - 17:58 नवीन
डॉ. बिरुटे, मला प्रतिसादातून जे काही सांगायचे होते, तो अर्थ तुम्ही उत्तम जाणलात, याबद्दल धन्यवाद. खरे तर स्त्री समानतेचा हा लढा इथेच संपत नाही. नुसते महिलांना गाभार्‍यात दर्शन खुले करुन पुरेसे नाही. देवीच्या पुजारीवर्गात पौरोहित्य पारंगत महिलांना स्थान मिळेल त्यादिवशी खरा न्याय दिला, असे म्हणता येईल. सध्या मात्र सुधारणेच्या दिशेने जे पाऊल पुढे पडले आहे त्याचे स्वागत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनु क्षत्रिय नसून ब्राह्मणच होता

अजातशत्रु
Wed, 04/20/2011 - 22:14 नवीन
चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्मिती करणारा आदीपुरुष मनु क्षत्रिय असेल तर त्याने चातुर्वर्ण निर्माण केले असे म्हणता येनार नाहि, कारण कुणितरि "क्षत्रिय" असण्यासाठी आधी ते चार वर्ण अस्तीत्वात हवे होते. शिवाय स्वतः मनुस्मृतिच सांगते कि विराट पुरुषाने मनुची निर्मिति केलीय आणी त्यात मनुने मरीची, भ्रूगु इ. महर्षीची निर्मिति केली, आता भ्रूगु वगैरे महर्षी हे ब्राह्मण असताना त्यांचा पिता असलेला मनु हा "क्षत्रिय" कसा काय होऊ शकतो बुवा??:?:~ आणखी एक साधं लॉजिक जर तुम्हि म्हणता तसे डोळे झाकुन जर मानले कि तो "क्षत्रियच" होता तर इतका उत्क्रुष्ट आणि मौलीक ग्रंथ लिहीणारा क्षत्रिय मनु हा उगी बामणांना श्रेष्ट दर्जा आणी खास अधिकार हक्क (आरक्षण), आणि सवलतींचि खैरात का करेल?:? त्याने ती फक्त क्षत्रियांनाच दिली असती नसति का?:) आणी चर्चा हि मग क्षत्रियांवर करावि लागली नसती का:? <<कुठल्याही प्रकारचे ग्रंथ रचून/लिहून इतरांना एज्युकेट करताना क्षत्रियांनी इतर जातींना शिकवण देण्याची प्रथा आपल्याकडे नव्हती यावर दुमत कुणाचे असण्याचे कारण नाहि, <<<महाभारतात "मनुरब्रवित, मनो:राजधर्मा, मनो: शास्त्रम" असा उल्लेख आहे..... अपुरी माहिती..... असा उल्लेख जरुर आहे पण.... तो मनु दुसरा आहे.... हि वंशावळ पहा १- मरिचि..... २- क्श्यप......= दाक्षयणी ( दक्ष प्रजापतीची एक कन्या) ३- अदित्य आणि विवस्वत ४- विवस्वता चा मुलगा मनु (१० पुत्र)......= यम पुढेहि आहे. पण मारुतिचं शेपुट कशाला वाढवा महाभारतातला मनु मिळाला एवढं पुरे आहे ना..:) असो भारतीय संस्क्रुतीचा गवगवा करणारे असंख्य वेळा तारतम्यहीण वागतात. संस्क्रुतीचा अभिमान असणे वेगळे आणि पुरातन काळातील असली-नसली महत्ता शोधत आजच्या व्यंगांवर मुद्दाम पांघरुण घालने वेगळे.भारतीय संस्क्रुतीत काहीच महनीय नाही हे म्हणनेही चुक आहे... पण जातीय डंखाने आणि पुरेपुर दांभिकतेने आपला समाज भरला असल्याने ख-या इतिहासाचे अन्वेषण न करताच, सत्याचा आधार न घेताच फुकाच्या बेटक्या फुगवण्यास सज्ज असतो आणि हेच भारतीय समाजाचे दुर्दैव आहे. इतिहासाची चिकित्सा या कोणत्याही घटकाला मान्य नसते. उदा. तुकाराम हा कसल्याही स्थीतित सदेह वैकुठाला जावु शकत नाही हे जर वैज्ञानिक सत्य असेल तर मग नेमके तुकारामाचे काय झाले यावर चर्चा सहसा घडत नाही...घडली तरी ती पुन्हा जातीय अंगावरच जावुन ठेपते. म्हनजे सत्यशोधन बाजुलाच रहाते. पण याहीपेक्षा अहंकारी भावना पसरवणारे लेखन संशोधनाच्या नावाखाली केले जाते ते तर आपल्या मानसिकतेचे दिवाळे निघाले असल्याचे लक्षण आहे. भारताला इतिहास लेखन परंपरा असल्याने सावरकरांनी त्यांच्या "सहा सोणेरी पाने" या ग्रंथात एकामागुन एक बेधडक अति-साहसी विधाने केली आहेत. मुळात त्यांचे सर्वच नायक ब्राह्मण आहेत. इतिहासाचे अत्यंत पक्षपाती विवेचन त्यात आहे. ते ठीक आहे...मुळात सवरकर हे इतिहासतज्ञ नव्हतेच म्हणुन ते क्षम्यही मानता येईल...पण तोच इतिहास आहे असे समजनारे सावरकर भक्तांचे काय़? <<<माफ करा. आपला संवाद होऊ शकत नाही. कारण मी सर्व जातींना त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारतो आणि एकूणच समाजाचा विचार करताना 'चांगले ते चांगले, वाईट ते वाईट' (सगळ्यांच जातींबाबत) अशी माझी भूमिका आहे. मला भविष्याकडे जाण्याची इच्छा आहे आणि तुमचा मार्ग भूतकाळाकडे जाण्याचा आहे. योगप्रभु साहेब आपला संवाद इथे होऊ शकतो कि.. आणि त्याच बरोबर इतरांचा हि.... प्रतिक्रिया सकारात्मक असो कि नकारात्मक कोणताहि आतातायी पणा न करता त्यावर समंजसपणे चर्चा घडवुन हि नविन गोष्टि कळतात त्या नव्याने शिकता येतात.. आणि मुळात खरं असेल तेच लोकांसमोर येतं आणि यावं हिच प्रामाणीक ईच्छा आहे.. बाकी आपण सर्व जातींना त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारतो (त्या शिवाय पर्याय नाहि) आणि एकूणच समाजाचा विचार करताना 'चांगले ते चांगले, वाईट ते वाईट' (सगळ्यांच जातींबाबत) अशी आपली भूमिका आहे. त्याबद्दल मि ही सहमत आहे <<मला भविष्याकडे जाण्याची इच्छा आहे आणि तुमचा मार्ग भूतकाळाकडे जाण्याचा आहे. भूतकाळ विसरलात तर भविष्यकाळ कसा घडवणार?? आपण भूतकाळात केलेल्या चुकां मधुनच शिकत असतो असो........ कारण इतिहास विसरणारे इतिहास घडवु शकत नाहि या मताचा मि आहे:)
  • Log in or register to post comments

इतिहासतज्ञ

आनंदयात्री
गुरुवार, 04/21/2011 - 00:36 नवीन
>>इतिहासाचे अत्यंत पक्षपाती विवेचन त्यात आहे. ते ठीक आहे...मुळात सवरकर हे इतिहासतज्ञ नव्हतेच म्हणुन ते क्षम्यही मानता येईल. सावरकरांना क्षमा करताय तुम्ही !! बरं बरं .. चालुद्या .. बाकी इतिहासतज्ञ कोण मग ? आ. ह. साळुंखे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

अजातशत्रू म्हणजे संजय सोनावणी

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/21/2011 - 13:37 नवीन
अजातशत्रू म्हणजे संजय सोनावणी आहेत का? ;) नाही ते जर ते नसतील तर वरील प्रतिसादातील संपूर्ण लेखन हे सोनावणींच्या ब्लॉगवरुन जसेच्या तसे उचलुन आणले आहे. संपादक दखल घेतील काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

शिवाय स्वतः मनुस्मृतिच सांगते

अप्पा जोगळेकर
Sun, 04/24/2011 - 16:31 नवीन
शिवाय स्वतः मनुस्मृतिच सांगते कि विराट पुरुषाने मनुची निर्मिति केलीय आणी त्यात मनुने मरीची, भ्रूगु इ. महर्षीची निर्मिति केली. आता भ्रूगु वगैरे महर्षी हे ब्राह्मण असताना त्यांचा पिता असलेला मनु हा "क्षत्रिय" कसा काय होऊ शकतो बुवा??: निर्मिती केली असे म्हणायचे आहे की जन्म दिला असे म्हणायचे आहे ते स्पष्टपणे लिहावे. निर्मिती करणारा माणूस जीवशास्त्रीय पिता असण्याचे कारण नाही. जसे - पुराणामध्ये काहीजण अग्नीय ज्वालेमधून , काही जण यज्ञातून, काही जण घामाच्या थेंबातून वगैरे निर्माण होत असतात. सबब क्षत्रिय माणुस ब्राम्हणाची निर्मिती करु शकेल. आणखी एक साधं लॉजिक जर तुम्हि म्हणता तसे डोळे झाकुन जर मानले कि तो "क्षत्रियच" होता तर इतका उत्क्रुष्ट आणि मौलीक ग्रंथ लिहीणारा क्षत्रिय मनु हा उगी बामणांना श्रेष्ट दर्जा आणी खास अधिकार हक्क (आरक्षण), आणि सवलतींचि खैरात का करेल?:? काही लोक परधार्जिणे असतात. भारताला इतिहास लेखन परंपरा असल्याने सावरकरांनी त्यांच्या "सहा सोणेरी पाने" या ग्रंथात एकामागुन एक बेधडक अति-साहसी विधाने केली आहेत. मुळात त्यांचे सर्वच नायक ब्राह्मण आहेत. इतिहासाचे अत्यंत पक्षपाती विवेचन त्यात आहे. ते ठीक आहे...मुळात सवरकर हे इतिहासतज्ञ नव्हतेच म्हणुन ते क्षम्यही मानता येईल...पण तोच इतिहास आहे असे समजनारे सावरकर भक्तांचे काय़? चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

अशि चर्चा याआधिहि इथे झालि आहे

अजातशत्रु
Wed, 04/20/2011 - 22:22 नवीन
अशि चर्चा याआधिहि इथे झालि आहे http://www.misalpav.com/node/12039 तुर्तास रजा............ "इतिहास विसरणारे इतिहास घडवु शकत नाहि "
  • Log in or register to post comments

मूळ विषय राहिला बाजूलाच...

योगप्रभू
गुरुवार, 04/21/2011 - 17:36 नवीन
महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात स्त्रियांना प्रवेशबंदी, या विषयावर धागा उघडला असताना तेवढ्यापुरता मर्यादित न ठेवता आता मनुस्मृती, सावरकर, सहा सोनेरी पाने व ब्राह्मण नायक, तुकाराम वगैरे उपाख्याने सुरु झालेली दिसताहेत. याचाच अर्थ ज्ञानेश्वर, रामदास, दादोजी, पेशवे ही मंडळी नाटकात एंट्री घेण्यासाठी विंगेत नक्कीच उभी असणार. कल्याण आहे, इतकेच म्हणतो. अजातशत्रुंनी सगळे मुद्दे एकाच धाग्यात कोंबण्यापेक्षा विषयानुरुप स्वतंत्र धागे काढावेत, असे नम्र निवेदन.
  • Log in or register to post comments

होय लेखन जसेच्या तसे उचलुन आणले आहे.

अजातशत्रु
गुरुवार, 04/21/2011 - 18:07 नवीन
"भारतीय संस्क्रुतीचा गवगवा करणारे असंख्य वेळा तारतम्यहीण वागतात. संस्क्रुतीचा अभिमान असणे वेगळे आणि पुरातन काळातील असली-नसली महत्ता शोधत आजच्या व्यंगांवर मुद्दाम पांघरुण घालने वेगळे.भारतीय संस्क्रुतीत काहीच महनीय नाही हे म्हणनेही चुक आहे... पण जातीय डंखाने आणि पुरेपुर दांभिकतेने आपला समाज भरला असल्याने ख-या इतिहासाचे अन्वेषण न करताच, सत्याचा आधार न घेताच फुकाच्या बेटक्या फुगवण्यास सज्ज असतो आणि हेच भारतीय समाजाचे दुर्दैव आहे. इतिहासाची चिकित्सा या कोणत्याही घटकाला मान्य नसते. उदा. तुकाराम हा कसल्याही स्थीतित सदेह वैकुठाला जावु शकत नाही हे जर वैज्ञानिक सत्य असेल तर मग नेमके तुकारामाचे काय झाले यावर चर्चा सहसा घडत नाही...घडली तरी ती पुन्हा जातीय अंगावरच जावुन ठेपते. म्हनजे सत्यशोधन बाजुलाच रहाते. पण याहीपेक्षा अहंकारी भावना पसरवणारे लेखन संशोधनाच्या नावाखाली केले जाते ते तर आपल्या मानसिकतेचे दिवाळे निघाले असल्याचे लक्षण आहे. भारताला इतिहास लेखन परंपरा असल्याने सावरकरांनी त्यांच्या "सहा सोणेरी पाने" या ग्रंथात एकामागुन एक बेधडक अति-साहसी विधाने केली आहेत. मुळात त्यांचे सर्वच नायक ब्राह्मण आहेत. इतिहासाचे अत्यंत पक्षपाती विवेचन त्यात आहे. ते ठीक आहे...मुळात सवरकर हे इतिहासतज्ञ नव्हतेच म्हणुन ते क्षम्यही मानता येईल...पण तोच इतिहास आहे असे समजनारे सावरकर भक्तांचे काय़?" फक्त हे २ उतारे मला इथे महत्वाचे वाटले त्यामुळे ते घेन्यात आले आहेत त्याची इथे "गरज वाटली होती" संजय सोनावणी यांचा उल्लेख जागे अभावी व अनावधानाने राहीला गेला आहे... आणि ते मि नम्रपणे मान्य करत आहे.(निदान) पण म्हणुन मनु हा "क्षत्रिय" होऊ शकत नाही:) तसं नसेल तर तसे खंडण करावे... गैरसमज तरी दुर होइल आमचा आणि आपल्या इथल्या मित्रांचा हि ! उगा वडाची साल (बोधी वृक्षाला) उप्स पिंपळा ला:-) imp= मुद्दे खोडता येत नसले कि काहि लोक उगाच मग मुळ मुद्द्याला बगल देउन मग असे प्रतिसाद देतात..=) <<बाकी इतिहासतज्ञ कोण मग ? आ. ह. साळुंखे का ? काय बोलणार इतकच म्हणतो लोकमान्य टिळक/बाबासाहेब पुरंदरे/ राजवाडे हेच काय ते इतिहासतज्ञ इतीहास मान्य आहेत. बाकि संपादक काय ती दखल घेतील लेखन ठेवावे कि ठेउ नये हा सर्वस्वी त्यांचाच अधिकार आहे. संपादकांनि निर्णय घ्यावा हि नम्र विनंती....
  • Log in or register to post comments

फक्त हे २ उतारे मला इथे

अप्पा जोगळेकर
Sun, 04/24/2011 - 16:18 नवीन
फक्त हे २ उतारे मला इथे महत्वाचे वाटले त्यामुळे ते घेन्यात आले आहेत त्याची इथे "गरज वाटली होती" संजय सोनावणी यांचा उल्लेख जागे अभावी व अनावधानाने राहीला गेला आहे... आणि ते मि नम्रपणे मान्य करत आहे.(निदान) याचा अर्थ आधी तुम्ही चोरी केली आणि ती पकडली गेल्यावर मूळ लेखकाचे नाव येथे दिले असे मानण्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

शब्दांचे खेळ

अजातशत्रु
गुरुवार, 04/21/2011 - 19:43 नवीन
<<<इथे एक नमुद करतो कि माझा आक्षेप हा ब्राम्हण जाती वर नसुन,ब्राम्हण्यांवर आहे. शब्दांचे खेळ कशाला करता ? अहो शब्दांचे खेळ कशाला काहिंना "तो" शब्द खटकला म्हणुन तसं स्पष्टिकरण द्यावं लागलं काहिंना टिका सहन होत नसेलतर त्यावर काय बोलायचं <<एखाद्या विशिष्ट जातीवर राग असेल तर निदान तसे उघडपणे सांगण्याची धमक दाखवा. तुम्ही सशाच्या काळजाचे नाही ना, तर मग उगा भेदरटपणा नको. क्रुपया योगप्रभुंना दिलेला प्रतिसाद वाचावा.... (आणि कुणाला जर विचार आवडलेच नाहित तर लगेच कुणी गोळि घालनार नाहि...... जशी गांधिजींना कुणा" माथेफिरु" ने घातली) इथे ब्राम्हण हा उल्लेख जाणीव पुर्वक टाळला आहे उगा प.रा. ना राग यायचा ;-) भेदरटपणा असता तर असा धागाच काढला नसता याची नोंद घ्यावी.. आता जर फ्रंट वर एखादि विशिष्ट जातच असेल तर त्यांना टिका जास्त सहन करावि लागणार ना... त्या मुळेच कि काय लोकांना दंगलि/ मोर्चे/ आणी विरोधा साठि भडकवणारे लोक हे कधिच फ्रंट वर नसतात पोलिसांच्या गोळ्या/लाठ्या खातात ते फक्त सामान्य लोक.. उदा. ताजीच आहेत पण विषयांतर नको... <<<ही माहिती अर्धवट, अपुरी आहे. कोणीतरी एक ग्रंथ लिहिला आणि हजारो वर्षे त्याचे परिणाम करोडो लोकांना भोगावे लागले इतकी ही गोष्ट साधी नाही. निवडणुकीत प्रचार करण्यासाठी ठीक आहे. निवडणुकीचं नंतर पाहु खात्रि आहे तिथेहि विरोधि पक्षात तुम्हि असालच बरं ही माहिती अर्धवट, अपुरी आहे.(मान्य...कारण जागे अभावि सगळंच इथे देता येत नाहि) कोणीतरी एक ग्रंथ लिहिला आणि हजारो वर्षे त्याचे परिणाम करोडो लोकांना भोगावे लागले इतकी ही गोष्ट साधी नाहीच आहे कारण तत्कालीन परिस्थिती आणी तेव्हाची सामाजीक परिस्थिती/ सामाजीक स्थित्यंतरे इ.मध्ये खुप मोठा फरक होता/आहे कारण आर्य आल्या नंतर हजारो वर्षे त्याचे परिणाम इथल्या करोडो लोकांना भोगावे लागले. कारण तीच इथली जगण्याची पद्धती म्हणुन इथं रुढ झाली (किंवा लादल्या गेली) <<<कोणी निर्माण केली, कशी निर्माण झाली, कोणी कोणी फॉलो केली याचा जरुर विचार करा आणि थोडेसे वाचनही करा. मलाच उलट प्रश्न विचारण्या पेक्षा आपण जर मि ज्या गोष्टिंवर आक्षेप नोंदवले आणि जे मुद्दे उपस्थित केले त्याचे "तुमच्यापरिने" खंडण केले असते तर ते अधिक संयुक्तिक वाटले असते. कोणत्यातरी जातीचे नियमितपणे प्रसिद्ध होणारे मासिक किंवा पाक्षिक संदर्भासाठी वाचू नका. हि गोष्ट तुम्हालाहि लागु होते..... <<<याचाच अर्थ ज्ञानेश्वर, रामदास, दादोजी, पेशवे ही मंडळी नाटकात एंट्री घेण्यासाठी विंगेत नक्कीच उभी असणार. भिती रास्त आहे..... फक्त एवढच म्हणेन कि मुळ मुद्द्याला बगल देउन इकडचे तिकडचे/ मग हे कोण आहेत? म हा असा का? असे प्रतिसाद देण्या पेक्षा मुळमुद्दे खोडुन काढा कि राव.. अथवा मान्य करा कि भारतिय संस्क्रुतित मनुस्म्रुति नावाचा मौलिक ग्रंथ मनु ने लिहुन अखंड भारतवर्षा वर फार "उपकार" केले आहेत.. त्यातुनच आपल्या भारतवर्षाला वर्ण व्यवस्था/ जातव्यवस्था/ स्त्रियांवरिल जाचक अटी त्यांना गुलामा प्रमाणे वागवणे या व अशा अनेक अनिष्ट प्रथा भारतीय संस्क्रुतीत जातीय डंखाने आणि पुरेपुर दांभिकतेने आपला समाज भरला असल्याने हे ख-या इतिहासाचे आणि भारतीय समाजाचे दुर्दैव आहे. मि उपस्थित केलेले मुद्दे खोटे असुन त्याचा मनुस्म्रुती शी दुरान्वये संबंध नाहि असं तरी म्हणुन दाखवावे:) अशा प्रथांचा उपयोग कायम अफूसारखाकरुन भोळ्या भाबड्या लोकांना अजुनही विषमते च्या गुलामगिरीत ठेवण्या पेक्षा इतिहासाची चिकित्सा करु द्या आणि मुळात खरं असेल तेच लोकांसमोर येउ द्या आणी मुख्य म्हणजे ते आपल्या विवेक बुद्धिला आणि मनाला पटावं यावं हिच प्रामाणीक ईच्छा आहे..
  • Log in or register to post comments

मलाच उलट प्रश्न विचारण्या

अप्पा जोगळेकर
Sun, 04/24/2011 - 16:37 नवीन
मलाच उलट प्रश्न विचारण्या पेक्षा आपण जर मि ज्या गोष्टिंवर आक्षेप नोंदवले आणि जे मुद्दे उपस्थित केले त्याचे "तुमच्यापरिने" खंडण केले असते तर ते अधिक संयुक्तिक वाटले असते. खंडन करायच्याच विचारात होतो पण तेवढ्यात तुम्ही लेखनचौर्य करत आहात हे सिद्ध करणारा परा यांचा प्रतिसाद आणि तुमचा कबुलीजबाब वाचला. कॉपी-पेस्ट केलेल्या आक्षेपांचे खंडन मी करत नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

इथे ब्राम्हण हा उल्लेख जाणीव

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/25/2011 - 18:25 नवीन
इथे ब्राम्हण हा उल्लेख जाणीव पुर्वक टाळला आहे उगा प.रा. ना राग यायचा
ज्या मनुष्याकडे स्वत:चे विचार नाहित, ज्याला चार शब्दांचे मत मांडायला देखील दुसर्‍याने लिहिलेले शब्द चोरी करुन आणावे लागतात अशा मनुष्याच्या बोलण्याच्या काय राग मानायचा ? :) असो... तुम्ही मोठे आणि प्रगल्भ झालात की तुमची दखल घ्यायचा विचार करु. तुर्तास तुम्हाला आणि तुमच्या चौर्यकर्माला फाट्यावर देखील मारायची इच्छा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

द्रुष्टि दोष / बुद्धि दोष ??? आणी त्यावरील स्पष्टीकरण..

अजातशत्रु
Mon, 05/02/2011 - 20:43 नवीन
@कॉपी-पेस्ट केलेल्या आक्षेपांचे खंडन मी करत नसतो.#अप्पा जोगळेकर अहो मालक मी कॉपी-पेस्ट काय केलंय?आणी माझे आक्षेप काय आहेत हेच जर तुम्हाला समजत नसेल (समजलं असेलही पण गोची झाली हो,अस काहीस आहे का??) तर काय म्हणायचं? मुळात माझे आक्षेप तुम्हाला खोडता आले नाहीत तेव्हा तुम्ही पळवाटाच शोधनार.... असो वर सांगितल्या प्रमाणे फक्त २ उतारे इथे महत्वाचे वाटले म्हणुन ते उदा.दाखल घ्यावे लागले (ते सोडुन बाकी सगळे माझे आक्षेप /मुद्दे आहेत) तसे आपण इतर पुस्तक किंवा वर्तमानपत्रां मधून वानगी दाखल घेतच असतो कि..मग ती पण चोरीच का? आणी तशीही लिंक दिलेली आहेच तर जरा तिथे जाण्याची तसदी घेतली असतीत तर फार बरे झाले असते, तो संपुर्ण लेख मी जसाच्या तसा इथे आणलेला नाही आहे(हे सिद्ध आहे) त्यातले फक्त २ उतारेच इथे आहेत, आणी मुळ लेखकाचे नावही मी जाहीर केलेय ते माझ्या नावावर न खपवता.. त्या मुळे ही चोरी होउ शकत नाही उगा उसना आविर्भाव आणून = कॉपी-पेस्ट केलेल्या आक्षेपांचे खंडन मी करत नसतो असे म्हणने म्हणजे चर्चेला बगल देण्यासारखं आहे. त्यापेक्षा मि उपस्थित केलेले मुद्दे खोटे असुन त्याचा मनुस्म्रुती शी दुरान्वये संबंध नाहि असं सिद्ध करुन दाखवा, @तुम्ही मोठे आणि प्रगल्भ झालात की तुमची दखल घ्यायचा विचार करु. तुर्तास तुम्हाला आणि तुमच्या चौर्यकर्माला फाट्यावर देखील मारायची इच्छा नाही.# प.रा. यावर काय बोलणार.... इथे(म्हणजे फक्त मि. पा. वर)तुम्हीच एक थोर मोठे आणि प्रगल्भ विचारवंत दिसत आहात (निरीक्षण) त्यामूळे अशा थोर माणसाच्या शेपटीवर आमच्या सारख्या पामराचा चुकून पाय पडला.. हे निमीत्त मात्र, नाहीतर आपल्या प्रतिक्रीये वरुन आपण फारच सज्जन दिसत आहात.. अवांतर: कामामुळे आणी संस्थलाच्या टेक्निकल प्रोब्लेम (२ वेळा लिहिला होता पण प्रकाशित होउ शकला नाहि) त्यामूळे हा प्रतिसाद इतक्या उशारा देत आहे, अतिअवांतर : माझे सगळे आक्षेप /मुद्दे यांचं जर कुणी (पुरावासिद्ध) खंडण केलं तर मि इथे जाहिर माफी मागेन, एक राहिलं संपादक/ संपादक मंडळ यांनी "ते" (कॉपी-पेस्ट)लिखाण उडविले नाहि त्याबद्दल त्यांचे जाहिर आभार ( ज्यांनी आक्षेप घेतला होता त्यांनी पण याची दखल घ्या.आक्षेप टिकला नाही) आणी पुढच्यावेळी मि ही खबरदारी घेइन ( उल्लेख करायची).. तुर्तास रजा........
  • Log in or register to post comments

उगा उसना आविर्भाव आणून =

अप्पा जोगळेकर
Mon, 05/09/2011 - 22:14 नवीन
उगा उसना आविर्भाव आणून = कॉपी-पेस्ट केलेल्या आक्षेपांचे खंडन मी करत नसतो असे म्हणने म्हणजे चर्चेला बगल देण्यासारखं आहे. जे पुराव्याने सिद्ध झालं आहे ते सूर्यप्रकाशासारखं स्वच्छच आहे. याउप्पर तुम्ही स्वत:च्या मनाची हवी तशी समजूत घालून घेऊ शकता. चर्चेला बगल दिली, चर्चेतून पळ काढला, सूंबाल्या केला काय हवं ते म्हणून स्वतःच्या मनाचे समाधान करुन घ्यायची मोकळीक तुम्हाला आहेच. आणी पुढच्यावेळी मि ही खबरदारी घेइन ( उल्लेख करायची).. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा