मलबारी एग रोस्ट.

गणपा's picture
गणपा in पाककृती
15 Apr 2011 - 9:15 am

दुबईला लग्ना आधी आम्ही ऑफिस मधले ४ बॅचलर मित्र, पेइंगेस्ट म्हणुन एकत्र रहायचो. ४ खोल्यां पैकी २ खोल्या घरमालकाने भाड्याने दिल्या होत्या. त्या आम्ही चार मित्रांनी पटकावल्या होत्या. किचन वापरायची मुभा होती. पण शक्यतो ते जुम्मे के जुम्मेच वापरल जायचं. (नाही म्हणायला घर मालक जेव्हा सुट्टीत महिनाभर गोव्याला जायचा तेव्हा आमची चंगळ असायची.) त्यामुळे रोजच्या जेवणासाठी आम्ही मलबारी, पंजाबी, नेपाळी,पाकिस्तानी,मद्राशी अश्या वेग वेगळ्या होटेल्समध्ये वार लावले होते. (गोवन हॉटेल फक्त विकांतासाठी फिक्स असायच. ;))
दुबईत मलबार्‍यांची टपरीवजा हॉटेल पावसाळ्यात कोपर्‍या कोर्‍यात उगवणार्‍या कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी पसरलेली आहेत. आमच्या पैकी कुणी बाजीरावाची औलाद नसल्याने रोज चांगल्या हॉतेलात जाउन दुप्पट दाम मोजणे शक्य नव्हतं. त्यामुळेच कोपर्‍यावरचा स्वस्तातला 'तारुफ' मलबारी आम्हा गरीबांचा अन्नदाता होता. सकाळी २.५ दिर्हम मध्ये आमचा चहा नाश्ता आटोपायचा. ५० पैशांचा (फिल्स्) चहा, लच्छा पराठा सोबत चणा/मुगाची भाजी/खिमा/ऑमलेट/हाफ फ्राय/एग रोस्ट या पैकी काही तरी एक. किंवा मग कुठल्याही दक्षिण भारतीय हॉटेलात मिळणारे डोसा/इडली/वडा सांबर, अप्पम आदी पदार्थ. दुपारी जेवणात ४-५ दिर्हम मध्ये अनलिमिटेड (४ ला मोटा राईस आणि ५ ला बारीक राईस) थाळी मिळायची. तारुफ मलबार्‍याकडची बिर्याणी मस्त असायची. मी नेहमी तीच हाणायचो.

तर ह्या जुन्या आठवणी काढायच कारण असं की काल घरातला बहुतेक सगळा भाजीपाला खल्लास झाला होता. अगदी अडी नडीला साथ देण्यार्‍या बटाट्यांनी ही पाठ फिरवली होती. मोजुन ३ कांदे आणि २ टमाटि तेवढी बाकी होती. डिफ्रिजर उघडला तर तो पण 'आ'वासुन माझ्याकडेच पहायला लागला. दरवाज्यात ३ अंडी उरली होती. काल परवाच भुर्जी करुन झाली होती म्हणुन तो ऑप्शन पण बाद. आणि अचानक मलबार्‍याचा एग रोस्ट आठवला. नेहमीच्या बैदाकरी आणि अंडा भुर्जी खाउन कंटाळलेल्या माझ्या अंडेखाऊ बॅचलर मित्रांसाठी हा झटपट तयार होणारा मलबारी एग रोस्ट.

साहित्यः

२-३ उकडलेली अंडी.

४-५ पाकळ्या लसुण बारीक चिरलेला.
१/२ इंच आलं बारीक चिरलेल.
१ लहान चमचा जिरेपुड.
१ लहान चमचा धणेपुड.
१ लहान चमचा गरम मसाला.
१ लहान चमचा लाल तिखट.
१ लहान चमचा काळीमीरीपुड.
१/२ लहान चमचा हळद.
१ लहान चमचा मोहरी.

३ मध्यम कांदे उभे चिरलेले.
२ टॉमेटो एकदम बारीक चिरलेले.
कढीपत्ता.
३-४ मिरच्या (ऐपती नुसार.)

कृती:


थोड्या तेलावर मोहरी, आलं, लसुण, मिरची, कढी पत्त्याची फोडणी करावी.

कांद्यासोबत मीठ टाकुन चांगला परतुन घ्यावं.

कांदा गुलाबी झाला की मग त्यात टॉमेटो टाकुन तो पार गळे पर्यंत शिजवुन घ्यावं.

नंतर त्यात वरील सर्व मासाले टाकुन चांगल परतुन घ्याव. मसाला खाली लागत असल्यास किंचीत पाणी टाकावं.

बाजुने तेल सुटायला लागल की उकडलेली अंडी अर्धी कापुन त्यात टाकावी.

चपात्या/पराठ्यांच्या सोबतीसाठी गरमागरम एगरोस्ट तयार आहे.

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

15 Apr 2011 - 9:27 am | शिल्पा ब

चविष्ट दिसतंय. तुम्ही भलतेच प्रयोगी बॉ!! असेच प्रयोग करत रहा आणि आम्हाला पण सांगा. :)
बाकी मलबारी लोक म्हणजे कुठले?

गप्प रहायचे ठरवले आहे .

तरी , तो पिवळा बलक फेकता आला तर पहा , गणपा शेठ.. तुम्ही लोकांची आहारिक दिशाभुल करत आहात !

- ( फक्त पांढरा भाग खाणारा ) टारझन

शिल्पा ब's picture

15 Apr 2011 - 10:12 am | शिल्पा ब

ज्याला जे हवं ते खावं असा आपला माझा फुकट सल्ला.

टारझन's picture

15 Apr 2011 - 10:34 am | टारझन

गणपा भाऊ ... ही पाककृती अंडे न घालता कशी करता येईल ?

* सविता यांस विनंती आहे की ह्या प्रतिसादाला पुर्वीप्रमाणे हि & ही ठरवु नये ;)

- कसा ब

नरेशकुमार's picture

15 Apr 2011 - 9:31 am | नरेशकुमार

फायनल डिश पेक्शा तयारीची डिशच जास्त आवडली.

काय कांदा कापलाय, तिच्यायला पेक्षा भारी कांदा कापुन फोटो टाकावा इथं खरा खरा, जेंव्हा पुण्यात भेटाल ना एक व्हेज जेवण लागु आपल्याकडे.

गणपा भॉ, एक शंका आहे, हे फोटो काढताना फोडणी आणि बाकीचे सग़ळं न जळवता फोटो कसे काढता तुम्ही ? काय आहे नेहमी पाकक्रुतीची कॉतुकं करणं फार मोनोटोनस होतंय, म्हणुन एक वेगळी शंका.

सगळ्या पाककृती करतान एक साहित्य बाय डिफॉल्ट नहमी असतेच बाजुला. माझा कॅमेरा.
बिचार्‍याच मी कधी कौतुक केल नाही की आभार मानले नाहीत. :)

मराठमोळा's picture

15 Apr 2011 - 10:11 am | मराठमोळा

उकडलेली अंडी मला आवडत नाहीत.. आम्ही यात उकडलेला बटाटा घालू. :)
बाकी पाकृ आणि फोटुबद्दल काय बोलायचं.. शब्द संपलेले आहेत, आता फक्त भावना समजून घ्या :)

घरी रोजचा स्वयंपाक कोण करतं हो तुमच्याकडे? ;) (हे आपलं उगाचच)

पाकृचे असे फोटो मला काढता येतील तो सुदिन. कांदा बाकी झक्कास चिरलाय, ममो म्हणतात तसं मीही यात उकडलेला बटाटाच घालून करेन म्हणतो.

मृत्युन्जय's picture

15 Apr 2011 - 11:08 am | मृत्युन्जय

फोटो प्रमाणे अशी पाकृ मला करता येइल तो सुदिन. ;)

बाकी गणपा तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे बे? असल्या काहीतरी पाकृ टाकवुन का जळवतोस बाबा आम्हाला? आमची ना नाही एरवी. तु फक्त पुण्याला येउन रहा. म्हणजे तु पाकृ करणार असशील त्या दिवशी आम्ही तुझ्या घरी येउन बसु. मग टाक काय फोटवर/ पाकृ मिपावर, चेपुवर, खा रे खा वर टाकाय्चे ते

केशवसुमार's picture

15 Apr 2011 - 10:29 am | केशवसुमार

गणपाशेठ,
एक नंबर पाकृ..
ह्याच्या बरोबर अप्पम जब्राट लागतात..
(अंडा पाकृ फंखा)केशवसुमार
पुणे कन्याकुमारी दुचाकी दैर्‍या दरम्यान केरळ मध्ये असताना रोज ही डिश हणायचो..:) त्याची आठवण झाली.. ह्या डिश वरूनच आम्हाला मसाला एग्स.. केसू स्टाईल
सुचली होती
(स्मरणशील)केशवसुमार

पियुशा's picture

15 Apr 2011 - 10:31 am | पियुशा

हे हे गनपा मि हि असच करते फक्त त्यात उकडलेले अन्ड ण घालता कच्च फेटूण घालते आनि २-४ मिनिट झाकन लावुन वाफ आलि कि मस्त डीश तय्यार ! :)

प्यारे१'s picture

15 Apr 2011 - 10:32 am | प्यारे१

अरे काय त्याच त्याच प्रतिक्रिया द्यायच्या? छान छान, लाळेचा पूर्, इ.इ.

एकदातरी काहीतरी बिघडव जरा.

अरे हा, 'मास्टर शेफ ऑफ इंडिया' परत आले तर प्रयत्न कर की लेका.

मस्त ,
ते दिलाच्या शेपच अंड कुठ मिळाल?

ते दिलाच्या शेपच अंड कुठ मिळाल?

हे हे हे. तो प्रयत्न जरा फसलाच. पुढाल्या वेळी नीट जमला तर टाकीन परत फोटु.

उकडलेल्या अंड्याला काही साच्या मध्ये घालुन सेट करता का?

प्यारे१'s picture

15 Apr 2011 - 4:49 pm | प्यारे१

उकडून झालेले गरम अंडे टरफल काढून लगेच वरुन एखादा पेन/पेन्सिल अथवा बारीक लांब नळी लावून दाबून ठेवले तर तसा आकार मिळेल.

मेल आली होती मागे.

बाकी, करा की जरा प्रयत्न सगळं गणपानेच करायचं का?

नगरीनिरंजन's picture

15 Apr 2011 - 12:48 pm | नगरीनिरंजन

मस्त मस्त म्हणून थकलोय पण पुन्हा एकदा पोटभरून खावी आणि तोंडभरून वाखाणावी अशी एक पाकृ!
धन्य आहे गणपाची!

परिकथेतील राजकुमार's picture

15 Apr 2011 - 3:13 pm | परिकथेतील राजकुमार

गणपा अरे बाबा कुठे सुट्टीवर वैग्रे जाणार नाहियेस का ?

जा की मेल्या :P

असुर's picture

15 Apr 2011 - 3:14 pm | असुर

जोपर्यंत मला स्वत:ला नवीन प्रतिसाद सुचत नाहीत, किंवा कोणी नवीन प्रतिसादांची लाट/पाऊस आणत नाही तोपर्यंत गणपाच्या पाककृतींवर प्रतिसाद द्यायचे नाहीत असं ठरवलेलं आहे. :-)

दर वेळी काय तेच ते छान छान म्हणायचं, आपल्याच तोंडात त्सुनामी उठवायच्या आणि नंतर घरी जाऊन मॅगी खायची? आणि त्याचे धागे पाहिल्याशिवाय चैन पडत नाही! म्हणूनच आता साधूसंतांच्या विरक्ती वृत्तीने गणपाचे धागे पहायचे असं ठरवलंय, किमान जळजळ आणि इनोचा खर्चतरी कमी होईल!!! ;-)

पण तरीही, हापिसात विचारुन दुबैला बदली करुन घ्यावी काय असा विचार उगाच आपला जिभल्या चाटून गेला खरा.

--असुर

सहज's picture

15 Apr 2011 - 3:39 pm | सहज

>दर वेळी काय तेच ते छान छान म्हणायचं, आपल्याच तोंडात त्सुनामी उठवायच्या आणि नंतर घरी जाऊन मॅगी खायची?

गणपाने दिलेले भरले वांगे ,चिकन भुजींग, केळफुलाचे कबाब (वडे) वगैरे ठीक पण ही अंड्याची डीश मात्र कमी श्रमात बनवायचा चान्स आहे. त्यामुळे आजतरी तुमच्या मॅगीला सुटी द्या किंवा बिकाकाकांकडे पाठवा :-)

त्यामुळे आजतरी तुमच्या मॅगीला सुटी द्या किंवा बिकाकाकांकडे पाठवा

अबब !! काय वाचतोय मी हे ? होप तुमच्यावर अब्रु णुस्काणी चा दावा भरल्या जाणार नाही :)

- निरा टारिया

सध्यातरी मी माझ्या मॅगीमुळेच जीवंत आहे हो सहजकाका! भले ती पाककृती गणपाची असेल, पण मी माझ्या हाताने एखादा पदार्थ बनवला (बापरे), आणि खाल्ला (वाचवा) यातल्या दोन्ही कृती (पक्षी: बनवणे-खाणे) म्हणजे अग्निदिव्यच हो! :-)

और तुम बोल रहे हो सहजबाबू, की मॅगी को बिकाकाकांकडे पाठवो?? नहीं.... ;-)

--असुर

ज्योति प्रकाश's picture

15 Apr 2011 - 3:16 pm | ज्योति प्रकाश

सकाळचं जेवण सगळं संपलय्.संध्याकाळी काय करावं या विचारात होते.धन्यु ही जबरा पा.कृ.देऊन माझी मदत
केल्याबद्द्ल्.फोटु झकासच.

साती's picture

15 Apr 2011 - 3:55 pm | साती

अंड्यांच्या मानाने कांदा बराच जास्त दिसतोय.
आमच्या जेजेच्या बाहेर रात्री ११ नंतर एक गाडीवाला उभा रहायचा त्याच्याकडे व्हेजी लोकांसाठी कांदा टोमॅटो भाजी असायचि आणि नॉनव्हेजींसाठी तो त्या भाजीतच एक उकडलेले अंडे दोन भाग करून टाकायचा ते आठवले.
एकंदर तुमच्या बाकीच्या पा.कृं च्या मानाने ही फारशी आवडली नाही.

एकंदर तुमच्या बाकीच्या पा.कृं च्या मानाने ही फारशी आवडली नाही.

तुमच्या मताचा आणि तस स्पष्ट सांगण्याचा पुर्ण आदर आहे.
कधी डावं कधी उजवं, कधी कमी कधी जास्त व्हायचच. शेवटी माणुसच आहे. :)
या वेळी आवडलं नसेल तरी पुढल्यावेळी जरुर भेट द्या गरीबाच्या धाग्याला. :)

साती's picture

16 Apr 2011 - 12:08 pm | साती

अहो,तुमच्या पा.कृ. ची फॅन आहे मी.
तुमचा ब्लॉगही नियमित बघते. पण मला फोनवरून लॉग इन होता येत नसल्याने बर्‍याचदा प्रतिसाद देता येत नाही.
आणि आज नेमका आवडली नाही चा प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला बघा. :(
पुढिल पा. कृ. च्या प्रतिक्षेत,
साती.

अलख निरंजन's picture

15 Apr 2011 - 4:57 pm | अलख निरंजन

तसेच कांदा नीट परतला पण नाहीये. गणपा सारख्या नावजलेल्या शेफाकडून हे अपेक्षीत नाही. डेकोरेशनलाही घाई केली ह्यावेळेला, वरच्या कोपर्यात एक बोट चाटून घेतल्याचे दिसुन आहे. इतर कुणी असेल तर ठिक आहे पण गणपा म्हंटल की जे डिटेलींग पाहिजे ते दिसले नाही.

वरच्या कोपर्यात एक बोट चाटून घेतल्याचे दिसुन आहे.

हॅ हॅ हॅ.
वडिलधारी निरंजनराव फसलात...फ्लॅश चमकतोय हो तो.

अलख निरंजन's picture

15 Apr 2011 - 5:07 pm | अलख निरंजन

उजव्या नाहि हो डाव्या कोपर्यात. पुन्हा एकदा पाहा, बोट नाही पण चपातीचा तुकडा घेउन चाटून पाहिल्यासारखे वाटत आहे.

बॉर्र बॉ जशी तुमची मर्जी.

अलख निरंजन's picture

15 Apr 2011 - 5:15 pm | अलख निरंजन

माझी मर्जी नाही हो, मला दिसल तस सांगितल. तुम्हि मनावर घेऊ नका. तुमच्या पाकक्रुती खरच चांगल्या असतात.

पंगा's picture

15 Apr 2011 - 6:21 pm | पंगा

नॉनव्हेजींसाठी तो त्या भाजीतच एक उकडलेले अंडे

अंडे नॉनव्हेज?

दीविरा's picture

15 Apr 2011 - 4:19 pm | दीविरा

बापरे कांदे कापणे काय अचाट आहे :)

तो फोटो अगदी जबरदस्त !!

बाकी नेहमीप्रमाणेच :)

इरसाल's picture

15 Apr 2011 - 4:36 pm | इरसाल

उद्याच. आपल्याला शनिवार-बिनीवर काय लागत नाय

सानिकास्वप्निल's picture

15 Apr 2011 - 5:09 pm | सानिकास्वप्निल

मी तर आत्ताच बनवणार नाहीतरी दुपारच्या जेवणाला काय बनवू असा विचार करतच होते...गणपा भाऊ मस्त मस्त मस्तच पाकृ आहे :)

सानिकास्वप्निल's picture

15 Apr 2011 - 6:14 pm | सानिकास्वप्निल

म्हण्टल्याप्रमाणे लगेच करून बघितले, वाह वाह चव तर मस्तच आहे...खुप आवडली पा़कृ नेहेमी नेहेमी भुर्जी, कालवण, एग बिर्याणी बनवण्यापेक्षा हे जरा वेगळे आणी झटपट होणारे आहे.

अगदी तुमच्यासारखे चविष्ट नाही बनवता आली पण जे काही बनवले आहे ते मस्तच झाले आहे :)

हा फोटो आत्ता बनवलेल्या मलबारी एग रोस्ट चा :)

धन्यवाद ह्या पा़कृबद्दल :)

.

नगरीनिरंजन's picture

18 Apr 2011 - 11:02 am | नगरीनिरंजन

हा एगरोस्टपण कातिल दिसतोय.

गवि's picture

15 Apr 2011 - 4:57 pm | गवि

कांदा चिरण्याची सफाई अफलातून आहे.

एकसारखे पातळ काप असे काही झकास दिसताहेत की त्यावरुन हातातल्या पाककौशल्याची आणि सराईतपणाची पावती मिळतेय.

कमी इन्ग्रेडिएंटमधे होणारा पण साग्रसंगीत पदार्थ दिसतोय.

पाकृचा शेवटचा फोटो एकदम तोंपासु.

कांदा चिरण्याची सफाई अफलातून आहे.

वर्षांनू वर्ष कांदा कापून ती सफाई अवगत करायची नसेल तर सिरॅमिकची सुरी वापरणे. खिशाला मजबूत भुर्दंड बसेल ही बात अलहिदा!

पाकृ झकास दिसते आहे.
तयारीही देखणी आहे.
ज्या दिवशी फ्रिजमधल्या सगळ्या भाज्या संपलेल्या असतात, अडीनडीला लागणारे फोझन पदार्थही संपलेले असतात, कडधान्य भिजवलेली नसतात तेंव्हा खरे पाककौशल्य दिसून येते.;)

गंपाशेट, तुम्ही कुकिंगक्लासेस का नाही काढत? खरं तर 'चाटे' कुकिंग क्लासेस हे नाव जाम फिट्ट बसेल, नाही?

स्मिता.'s picture

15 Apr 2011 - 6:42 pm | स्मिता.

तयार भाजीपेक्षा कापलेल्या कांद्यावरच माझं सगळं लक्ष होतं. काय मस्त सफाईदारपणे कापलाय...
ही भाजी म्हणजे साधीसुधी एग-करी वाटते ना? अर्थात ती चविष्ट असणार यात वादच नाही.

प्रभो's picture

15 Apr 2011 - 7:25 pm | प्रभो

लई भारी!!!!!!

sneharani's picture

16 Apr 2011 - 11:18 am | sneharani

मस्त रेसिपी दिसतेय!
बाकी सजावटीबाबत तुमचं कौशल्य वाखाणण्याजोगं!
:)

स्वाती दिनेश's picture

18 Apr 2011 - 10:51 am | स्वाती दिनेश

मस्तच रे.. मलबारी एग रोस्ट! फोटो बघून लग्गेच करावेसे वाटायला लागले आहे.
स्वाती

निकिता_निल's picture

19 Apr 2011 - 6:23 am | निकिता_निल

जबरा फोटो , लवकर मिपा पाहिला असता तर अंडाकरी एवजी हि रेसिपी केली असती की .

यम्मीईइ !!

बादवे, तुम्ही कांदा कापायला कुठली सुरी वापरलीत त्याचा पण एक फोटू टाका न!