बेदखल
धुराच्या ढगात वेढलेला, आणि
चारी बाजूनी घोंगावणा-या
चारचाकी यंत्राच्या गोंगाटात,
डांबराच्या तापलेल्या रस्त्यांवरच्या
करड्या मळकट पट्ट्यांना ओळख देत
तल्लीन झालेला तो रंगारी…
त्यांनी ह्याला कि ह्यानी त्यांना बेदखल केलंय,
हे ओळखण तसं कठीणच.
जपणा-या माणसांपेक्षा
मुकाट खपणा-या बिन हृदयाच्या
यंत्रांची जंत्री वाढली कि
हे अस व्हायचंच…
पहिल्या परिच्छेदात
त्यांनी ह्याला कि ह्यानी
कविता आणि त्यामागील उद्देश
+१