✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अल्बम

ट
टारझन यांनी
Wed, 03/02/2011 - 12:27  ·  लेख
लेख
णमर्स्कार्स फोक्स , "अल्बम " ! हा शब्द वाचल्यावर किंवा आठवल्यावर कोणाच्या मनात जर फोटोंचा अल्बम सोडुन जर आजकालचे ऑडियो-विडियो अल्बम येत असतील तर .. तर काही नाही हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा प्रश्न आहे ( उगाच जड जड डायलॉग्ज ने कशाला सुरुवात करा ? ) प्रत्येकाला बर्‍याचदा असं वाटत असावं , हा काळ जर इथेच थांबवता आला तर ? ही वेळ सरु च नये ! अर्थात ह्या आपल्या सुखी काळातल्या इच्छा असतात. उगाच जोराची लागलीये आणि कधी ऑफिसात किंवा घरी जाऊन मोकळा होतोय त्या वेळी " हा काळ असात अनंत युगे निरंतन चालत रहावा , मी ह्याच अवस्थेत ह्या पायावरुन त्या पायावर भार देत , कपाळाचा घाम पुसत , इकडे तिकडे बघत कधी कधी इच्छा नसताना स्माईल करत उभा रहावं " असं निश्चित कोणाला वाटणार नाही. सांगण्याचा मुद्दा असा , आपल्या आयुष्यात बर्‍याचदा चांगल्या गोष्टी घडतात. आपण त्या वेळी खुप आनंदात असतो. पण तो आनंद असा त्या ठिकाणी गोठुन रहात नाही. आपण ते क्षण कैद करतो ते आपल्या कॅमेर्‍यात. आता तर मोबाईल मधे ही कॅमेरे आल्याने त्याचं एवढं महत्व राहिलेलं नाहीये . पण हे असं नव्हतं . पुर्वीच्या काळी , जास्त लांब कशाला जाता , दहाएक वर्षांपुर्वीच पब्लिक फोटो स्टुडियो मधे जाऊन फोटो काढायचे. फोटो स्टुडियो म्हंटलं की लगेच बायकांची त्यांची सर्वांत स्पेषल साडी घालनं , फेयर अँड लव्हली , लिप्सस्टिक , नथनी , इयर रिंग्ज ( भल्या त्या दिसेनात का त्या फोटोत ) ,एटुझेड ज्वेलरी , बांगड्यांपासुन चपलांपर्यंत , सगळी जैय्यत तयारी असायची. पुरुष वर्ग तेवढा उत्साही नसावा हे मला आमचा अल्बम पाहिल्यावर कळते. असेल तोच ड्युटीवर जायचा ड्रेस , त्याकाळी आलेली बेल बॉटम फॅशन ची पँट, हेयरस्टाईल वगैरे म्हणजे काय ? सगळ्यांची एकाच मोल्ड मधुन काढलेली केशभुषा, लहान पोरं असतील तर त्यांना डोळे भर फासलेलं काजळ , हातात त्या काळ्या-पांढर्‍या बांगड्या ( बांगड्याच असतात का हो त्या ? आठवत नाही ) , नजर लागु नये म्हणुन चार ठिकाणी लावलेलं काजळ , शर्ट बर्‍याचदा असतो , पण खाली चड्डी / पँट असेल की नाही ह्याची काही गॅरेंटी नाही. आज्जी -अजोबा किंवा सिनियर सिटिझन असतील तर मग आज्जी च्या कपाळावर भलं मोठं कुंकु , आजोबांना पगडी किंवा फेटा , हातात छडी हवीच , बांडीस , धोतर आणि असे ऐटित बसुन मग ते फोटो काढणार . कमी बजेट असलेल्या फॅमिली एकाच फ्रेम मधे कोंबुन कोंबुन बसवल्या जायच्या. बर्‍याचदा माझा वेळ जात नसला की मी आमचा अल्बम उघडुन बघतो. त्यात सगळे नातेवाईक असे एका ठिकाणी असतात. तसे नातेवाईक घरी आले की माझ्या कपाळावर आठ्या पडतात हे प्रांजळपणे नमुद करतो. त्याला तसं कारणंही आहे म्हणा. मी जास्त कोण्या नातेवाईकाकडे एक तर कधी राहिलो नाही , आणि बरेच दिवस ये जा नसल्याने त्यांच्या विषयी म्हणावा तसा भावनिक जिव्हाळाही नाही. पण अल्बम मधले ते मला आवडतात . अल्बमचं स्वरुपही काळाच्या ओघात खुपसं बदललेलं आहे. एका पानावर एक फोटु बसणारे , एका पानावर दोन फोटु बसणारे ,प्लास्टिक कोट मधे फोटो ठेवायचे बुकलेट सारखे अल्बम मागे पडलेत आता तर मोठे मोठे .. स्पायरल वाईंडिंग असणारे अल्बम आलेत. संगणक युगात तर आता त्याचीही गरज नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. ऑनलाईन अल्बम पर्यंत येउन पोचलोय . माध्यमं बदलली तरी भावना त्याच राहिल्यात. बी.आर. चोप्राच्या महाभारतात अँकरिंग करणारा तो " मै समय हुं " , स्वत:चीच लाल करत स्वतःच्याच हजारो डेफिनिशन्स देतो तेंव्हा मला मोठी मौज वाटे . "मै समय हुं .. मै अनंत हु .. अनादी हु .. युगे युगे चलने वाला मै .. ना भगवान श्रीक्रिष्ण के लिये रुका ना पांडवों के लीये , ...." ( असो विषयांतर नको ) वेळ कधीच थांबत नसतो . पण अल्बम ती वेळ आपल्याला पुन्हा पुन्हा जगायचं एक माध्यम आहे. अल्बम कितीही वेळा पहा कधी बोर होत नाही . अल्बम कधीच जुणा होत नसतो , त्याला तर वयंच नसतं म्हणा. उलट अल्बम जेवढा जुणा होतो तितका त्याला पाहिले असता आपल्याला जास्त आनंद भेटतो. आपण लहाणपणी कसे दिसायचो ? हे आपल्याला डोळे मिटल्यावर आठवणार आहे काय ? अल्बम बघा, त्या फोटो बरोबर अजुनही बरंचसं काही आठवेल . अल्बम मधले फोटो हे फक्त फोटो नसतात. ते आठवणींचे ऑफसेट्स असतात. प्रत्येक फोटो बरोबर काही ना काही गोष्ट नक्कीच जुळलेली असते. फॅमिली सोबत अल्बम घेऊन बसलं की बघा २ - ४ तास कसे निघुन जातात . पाहुणे घरी आले की मी हटकुन अल्बम काढायचो . दुपारी महिलावर्ग कामं आटोपुन झोपायच्या तयारीत असायचा. पण मी अल्बम काढला की त्यांच्या झोपा कूठल्या कुठे उडुन जात . आणि संपुर्ण दुपार गप्पा टप्पा , जुण्या आठवणी , त्यांचे अनंत किस्से , कोण कोणाला काय म्हणालं होतं , मग त्याचं कसं झालं होतं , पासुन ते फोटो काढण्या आधी आपण काय केलं नी काय नाही पासुन सगळ्या गोष्टींची पुन्हा एकदा पुणरावृत्ती होते आणि त्याची कोणालाही हरकत नसते , कारण सर्वांना ते हवंच असतं . अल्बम मधले सर्वात जास्त प्रिय असतात ते स्वतः चे फोटो. तेंव्हा मी कसा होतो ? तेंव्हा माझ्या डोक्यावर केस होते , कसे धारदार डोळे होते इत्यादी विचार बुढौंच्या मनात येतात , तर कधी काळी मी देखील यौवनात होते असं आजीबाईंना वाटत असणार. तोच एखादा नागवा फोटु दाखवुन सगळे जण आमच्यासारख्यांवर हसुनही घेतात. पण त्यावेळी तात्पुरतं खजिल व्हायचं असतं :) हो ! एक गोष्ट नक्की , अल्बम हा "स्वत:चा" असेल तरंच प्रिय असतो. दुसर्‍याचा अल्बम म्हणजे कहर असतो . अगदी पुलंच्या शत्रुपक्षाची आठवण व्हावी इतका . :) मी कधी एकटा असलो की नेहमी अल्बम चाळतो . एकेक फोटो पुन्हा पुन्हा बघतो . आणि आठवणींत रमुन जातो. आता ते प्लास्टिक बुकलेट्स चे अल्बम बघायची गरज नाही. स्कॅन करुन लॅपटॉप वरंच उपलब्ध असल्याने ते हवे तिथे बघता येतात. मजा येते. काल रात्रीच अल्बम चाळता चाळता लेख लिहीणार होतो पण डोळा कधी लागला ते कळलंच नाही . जर मला जग सोडताना एखादी गोष्ट बरोबर नेता आली , तर नि:संकोचपणे ती "अल्बम"च असेल .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
16505 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

णेहेमीप्रमाणे छाण लेख!!

घाटावरचे भट
Wed, 03/02/2011 - 18:37 नवीन
णेहेमीप्रमाणे छाण लेख!!
  • Log in or register to post comments

मस्तं लेख .आवडला. अल्बम बघणे

प्राजक्ता पवार
Wed, 03/02/2011 - 19:05 नवीन
मस्तं लेख .आवडला. अल्बम बघणे हा आमचाही आवडता छंद आहे :)
  • Log in or register to post comments

चांगलं लिहिलयस पण जरा तो

रेवती
Wed, 03/02/2011 - 19:15 नवीन
चांगलं लिहिलयस पण जरा तो 'अडचण' हा शब्द वापरला नाहीस तरी चालेल. आजकाल मनापासून काही वाचू लिहू म्हटले तरी तसं होत नाही. सगळे लक्ष या टार्‍याने वापरलेले चावट शब्द शोधणे, तक्रारी निस्तरणे यातच जातो......कळ्ळं का मेल्या!
  • Log in or register to post comments

सगळे लक्ष या टार्‍याने

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/02/2011 - 19:29 नवीन
सगळे लक्ष या टार्‍याने वापरलेले चावट शब्द शोधणे, तक्रारी निस्तरणे यातच जातो......कळ्ळं का मेल्या!
परत झाली का टार्‍याविषयी तक्रारी यायला सुरुवात ? चला 'टारझन ह्यांचे खाते का उडाले' असा लेख लिहायला घ्यायला पाहिजे म्हणजे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अगदी कळीचा नारद आहेस हो परा!

रेवती
Wed, 03/02/2011 - 22:36 नवीन
अगदी कळीचा नारद आहेस हो परा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मी निरागस आहे. नारद नाही.

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/03/2011 - 14:58 नवीन
Image removed. मी निरागस आहे. नारद नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सगळे लक्ष या टार्‍याने

टारझन
Wed, 03/02/2011 - 20:00 नवीन
सगळे लक्ष या टार्‍याने वापरलेले चावट शब्द शोधणे, तक्रारी निस्तरणे यातच जातो......कळ्ळं का मेल्या!
आयला , हे बरंय राव !! आंधळा दळतो नी टार्‍या बोलणी खातो ते उगीच नाही ! अडचण हा शब्द मी प्रथम वापरलेला नाही. पण तुम्ही म्हणताय म्हणुन खरोखर जरी असेल तरी अडचण हा शब्द चुकुन पण वापरणार नाही !! सॉरी !! बाकी तक्रार कोणत्या भ्याडा ने केली ते सांगा. . कोणाला वैयक्तिक उद्देशुन लिहीलेलं नसताना , अश्लिल हेतु ने लिहीलेलं नसताना कोण नरसोट्या / टी तक्रार करते आहे ? हक्क काय ? माझ्या वर असे हिण आरोप लावणार्‍यांविरुद्ध माझी हीच तक्रार समजावी. ज्याला कोणाला प्रॉब्लेम असेल तर खरडवहीत येऊन बोलावे , निस्ताण केल्या जाईल . संपादकांना त्रास देण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

छाण लेख

वेताळ
Wed, 03/02/2011 - 20:12 नवीन
आवडला........
  • Log in or register to post comments

काय रे एकदम नॉस्टॅल्जिक!!!

प्राजु
Wed, 03/02/2011 - 20:37 नवीन
काय रे एकदम नॉस्टॅल्जिक!!! :) अल्बम मधले फोटो हे फक्त फोटो नसतात. ते आठवणींचे ऑफसेट्स असतात. हे वाक्य एकदम आवडून गेलं.. तुझ्या भाषेत काळजाला भिडलं.. (खरंखरं हं!!) :)
  • Log in or register to post comments

मस्त लेख टारूभाऊ.. मागच्या

प्राची
Wed, 03/02/2011 - 21:29 नवीन
मस्त लेख टारूभाऊ.. मागच्या आठवड्यापासून आमच्या वर्गात आपल्या लहानपणीचे फोटो आणून ग्रूपमध्ये दाखवण्याचं फ्याड आलय.मजा येतेय एकेकाचे फोटू बघून.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लेख. अ‍ॅज फार

इंटरनेटस्नेही
Wed, 03/02/2011 - 23:58 नवीन
अतिशय सुंदर लेख. अ‍ॅज फार अ‍ॅज क्वालिटी इज कन्सर्न्ड, अगदी व्यावसायिक (प्रोफेशनल) झाला आहे. जबरी.. विषय पण छान निवडला आहे, राव! जियो टार्‍या, जियो!
  • Log in or register to post comments

तुझ्या ल्हाणपणाचा फोटो टाकायचा होता

वेदनयन
गुरुवार, 03/03/2011 - 02:00 नवीन
एखादा ल्हाणपणाचा (तुझ्या) फोटो टाकायचा ना टार्‍या... पण मला भलताच डावट आला - तु कोणाला आयडी भाडयाने तर दिला नाही. असले नको लिहित जाऊरे फारसे (मिपावर बरेच आहेत असले लिहिणारे). तु आपले टार्‍या ष्टाईल लिहित जा गुमान... १४ फेप्रुवारी सारखे... बाकी लेख छानच हे सां.न.ल.
  • Log in or register to post comments

छान लिहीले...

कौशी
गुरुवार, 03/03/2011 - 03:39 नवीन
अजुन लिहा आणि वाचायला आवडेल...
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
गुरुवार, 03/03/2011 - 10:35 नवीन
मस्त लेखन! सूंदर लिहलय! :)
  • Log in or register to post comments

अल्बम..."स्वतःचा'!

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 03/03/2011 - 11:01 नवीन
"....अल्बम हा "स्वत:चा" असेल तरंच प्रिय असतो. दुसर्‍याचा अल्बम म्हणजे कहर असतो ...." ~ १००% सहमत. यातही हा दुसर्‍याचा अल्बम म्हणजे 'अरे, आलास.....बैस, कॉफी होईपर्यंत माझा आणि मिनीचा हा अल्ब्म बघ....लग्नानंतर आम्ही थायलंडला गेलो होतो हे तुला माहीत आहेच की.....तिथले हे फोटो बर्रर्र का...!" अशी तुपात तळलेली, साखरेत घोळलेली सूचना असली की विनातक्रार समजून घ्यावे की कॉफी आपल्याला चांगलीच चटका देणार.....! मग पुढे "हा डॉल्फिन मास्सा हं....मिने तू सांग ह्याला मी किती जवळ गेलो होतो....(मला वाटले, हा येडीयुराप्पा मधुचंद्राची गोष्ट सांगतो की काय, पण मिनीताई म्हणाल्या, "अरे, धाडसाने हा लेकमधील डॉल्फिनजवळ गेला होता...त्यावेळी किनई..." ~ इ. इ. २> "जर मला जग सोडताना एखादी गोष्ट बरोबर नेता आली , तर नि:संकोचपणे ती "अल्बम"च असेल ..." ~ धिस डिझर्व्हस् ५ स्टार अप्लॉड...रीअली ! श्री. ह.मो.मराठे यांची आठवण झाली. इन्द्रा
  • Log in or register to post comments

टार्‍या भारी ल्हिल्यस्की तू.

विजुभाऊ
गुरुवार, 03/03/2011 - 11:01 नवीन
टार्‍या भारी ल्हिल्यस्की तू. इतके नोष्टाल्जीक ल्हीशील असे वाट्ले न्व्हते
  • Log in or register to post comments

लेख काही ठिकानी ठिक, काही

नरेशकुमार
गुरुवार, 03/03/2011 - 13:33 नवीन
लेख काही ठिकानी ठिक, काही ठिकानी बरा वाटला. तुझ्यासारख्या णवोदित लेखकाला प्रोत्साहन/उत्तेजन मिळावे म्हनुन प्रतिक्रिया देत आहे. केवळ तु आहेस म्हनुन बरं का ! लायटली.
  • Log in or register to post comments

एकदम शेंटी लेख टार्‍या !!

जयवी
गुरुवार, 03/03/2011 - 14:08 नवीन
एकदम शेंटी लेख टार्‍या !! मस्त लिहिलं आहेस. जुन्या फोटोंचे अल्बम चाळणे हा सगळ्यात चांगला टाईम पास आहे. मी तर माझ्याफोटोंसारेखेच बाकींच्याचेही फोटो अगदी मन लावून बघते :)
  • Log in or register to post comments

टारोबा तुमच्या टिपीकल

निखिल देशपांडे
गुरुवार, 03/03/2011 - 17:07 नवीन
टारोबा तुमच्या टिपीकल स्टाईलने लिहिलेला लेख.. अर्थातच आवडला... तुझा लायसंन्स वरचा फोटो पण आठवला :-) आणि नेहमी प्रमाणे "इतके छान लिहिता येत असताना हा... " हा विचार मनात येउनच गेला. असो!!!
  • Log in or register to post comments

.--. .-.. ..- ... .----

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/03/2011 - 22:38 नवीन
.--. .-.. ..- ... .----
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

तुझ्या नशिबी अंकांचा पाऊस

निनाद मुक्काम …
गुरुवार, 03/03/2011 - 23:07 नवीन
तुझ्या नशिबी अंकांचा पाऊस पडून नखशिखांत चिंब भिजण्याचे सौख्य नाही ''बल्लवाचार्य कुठे आहात आपण ? ''आणी आदरणीय .... बिका शेख आता आमच्या अजून काय खुलासा करणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

लेख फर्मास पण.. आल्बम मुळे

माझीही शॅम्पेन
गुरुवार, 03/03/2011 - 17:18 नवीन
लेख फर्मास पण.. आल्बम मुळे आपण काही सेंटी वैइगरे होत नाही , आजही आल्बम ने दुसर्‍याणा विशेषत: पाहुण्यना त्रास देणारे लोक आम्ही आमच्या शत्रू पक्षातच गणतो.. पक्का पु. ल. प्रेमी
  • Log in or register to post comments

आवडला

चित्रा
गुरुवार, 03/03/2011 - 17:39 नवीन
छान लेख, खूप आवडला..
  • Log in or register to post comments

छान लेख.....

प्रास
गुरुवार, 03/03/2011 - 18:43 नवीन
..... मजा आली...... टारझन किंवा खविस या नावाच्या लेखकांना न साजेसे सौम्य नि हृद्य लिखाण आपल्याकडून झाले याचा आनन्दही वाटला......
  • Log in or register to post comments

बी.आर. चोप्राच्या महाभारतात

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 03/03/2011 - 20:53 नवीन
बी.आर. चोप्राच्या महाभारतात अँकरिंग करणारा तो " मै समय हुं " , स्वत:चीच लाल करत स्वतःच्याच हजारो डेफिनिशन्स देतो तेंव्हा मला मोठी मौज वाटे .
टार्याने काळाची पण वेळ आणली.. ;)
  • Log in or register to post comments

छान लेख

पिवळा डांबिस
Fri, 03/04/2011 - 03:33 नवीन
लेख आवडला! पण खरं सांगायचं तर आम्ही अलिकडे जुने फॅमिली अल्बम उघडायचे टाळतो... कारण त्यातली बरीचशी लोकं या जगातून निघून गेलेली आणि उरलेली अगदी उंबरठ्यावर उभी! गळ्यात हमखास वियोगाची कडवट चव! :(
  • Log in or register to post comments

हा प्रतिसाद

गोगोल
Fri, 03/04/2011 - 08:25 नवीन
वाचून का कोण जाणे खूप वाईट वाटल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

टचकन पाणी आले डोळ्यात. जगाचे

प्यारे१
Fri, 03/04/2011 - 09:05 नवीन
टचकन पाणी आले डोळ्यात. जगाचे रहाट्गाडगे आहे काका, सूर्योदय सूर्यास्त होतच राहणार. कालपरवापर्यंत अगदी चान चान आरोग्य प्रकृति असणारे पटकन सोडून जातात तेव्हा काय बोलावे तेच कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अनावधाना ने चुकीची कळ प्रेस

टारझन
Fri, 03/04/2011 - 12:07 नवीन
अनावधाना ने चुकीची कळ प्रेस झाल्याबद्दल क्षमस्व ! बायपास : सॉर्ट करुन का ठेवत नाहीत ? सर्व वाचकांचे हार्दिक आभार मानतो . काहींनी टिपीकल टारु शैली म्हंटलंय तर काहींनी मस्तीखोर लेख लिहा म्हणुन सुचवलंय , पण माझी "टिपीकल" शैली मला अद्याप ठाऊक नाही. लेख लिहीण्या आधी काय शब्द लिहीणार आहे , माहीत नसते . तसंच सांगुन षटकार मारणारे हर्षल गिब्ज सुद्धा आम्ही नाहीत. त्यामुळे जो तुटका मुटका लेख संभाळुन घेतलाय त्या बद्दल सर्व मायबाप मिपाकरांचे आभार. प्रा.डॉ. बिरुटे ह्यांचे विषेश आभार, ते आम्हाला शुद्धलेखणाचे पुस्तक देणार आहेत , त्यानंतर त्यांना आमच्या शुद्धलेखनात त्रुटी आढळणार नाहीत ह्याची काळजी नक्की घेउ. धन्यवाद , टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

छान लिहिलंस!

क्रान्ति
Sat, 03/05/2011 - 22:47 नवीन
टारू, खूप छान लिहिलंस रे!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा