✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पहिला पहिला क्रश ......

प
पियुशा यांनी
Wed, 03/02/2011 - 10:45  ·  लेख
लेख
पहिला पहिला क्रश ...... प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येत्तोच (अपवाद वगळता) आमच्याही आयुष्यात हा दिवस तसा जरा लवकरच आला असेच म्हणावे लागेल . त्यावेळी मी नववीत असेन ,आमच्या धिंगाणेबाज कंपूत आम्ही ५-६ मुली होतो आमच्या वर्गात दोन मॉनिटर होते एक मुलांचा ,आणि एक मुलींची ,(ती मी होते ) त्यामुळे काही मुली माझ्यावर नेहमी खार खाऊनच असायच्या वर्ष संपत आले होते जवळ जवळ, पण ग्रुप मधल्या काही मुलीन मधला बदल थोडा उशिराच लक्षात आला माझ्या ! म्हणजे तमुक तमुक मुलगा दिसला कि चोरून चोरून स्मैलींची देवाणघेवाण....... चोरून चोरून चिठ्या - चपट्या, गाणी गुणगुणन, ... (मुलींसाठी )सक्तीची दोन वेण्या आणि काळी रिबीन असताना हि कधीकधी पोनी बांधन, दोन चार केसांची बट मुद्दाम गालावर रुळवन, आणि म्याड्मचे वेणी का नाही घातली ? म्हणून बोलणे खाण..... आणि विशेष ज्यां -ज्यां कबुतरांच्या जोड्या जमल्या होत्या ती टाळकी आम्हाला नेहमी टाळायचे ......खेळायला पण आणि अभ्यासाला पण ..... गम्मत अशी कि ज्या मुलींशी आमची खुन्नस होती त्या बाकी मला जरा टरकायाच्या जरा नरमाईने वागायच्या ... (मी कधी त्यांच्या घरी पचकले (त्यांच्या प्रेमप्रकरणावर )तर नसती पंचाईत !म्हणून बहुतेक ) मला आणि कपूला (कल्पिता ) इंटरेस्ट, त्याना चिडवण्यात वाटायचा वर्गाच्या खिडकी जवळच बेंच होता आमचा ,बाहेर येणारे जाणारे आणि विशेष आत डोकावणारे या सर्वावर आमचा डोळा असायचा " ए गौरे......................देखो तेरा शाहरुख जा .... रहा हे हे हे .... हि हि हि हु हु हु ... गौरी लगेच बद्कासारखी मान उंचावून पहायची ........... काय पण सोल्लिड मजा यायची त्यांना चिडवायला ......... शाळेच्या रस्त्यावरच एका छोटस कॅन्टीन होत आणि त्या शेजारीच एक मावा(मटका) कुल्फी , सरबत ,रॉयल कुल्फीची गाडी लागलेली असायची भर दुपारी उन्हात मावा कुल्फी खाणे म्हणजे अहा अहा सारा थकवा पळून जायचा ......पण सध्या आम्हाला फुकट मध्ये मावा कुल्फी मिळायची कारण ओळखीची एक दोन कबुतरांची जोडी तिथे लुडबुडत असायची आणि आम्ही त्यांना पाहिलं हे (त्यांच्या मुद्दाम लक्षात आणून द्यायचं ) लक्षात आल कि लगेच आम्हाला फुकटात कुल्फी नाहीतर सरबत फ्री फ्री फ्री ...................... नंतर स्पोर्ट days आले आम्ही रनिंग मध्ये भाग घेतला होता नेमकी जिंकायच्या बेतात असताना मध्येच माझा टांगा कल्टी झाला बाकीच्या म्याडम धावत आल्या त्यांनी मला हाताला धरून साईडला घेतले ,पाणी पाजले, आणी त्यात ते पण होते विनय सर ...... आमच्या फुटलेल्या ढोपराणा त्यांनी हळुवार मलम लावले आणि तिथून पुढे......... माझ आयुष्य काही दिवसासाठी प्रेमाच्या झोक्यावर बसून हिंदोळ्या खाऊ लागल मला काय झाल हे मलाच समजत नव्हत न अभ्यासात मन लागेना ना खेळण्यात मला पण अचानक प्रेमाचा साक्षात्कार झाला होता ... आणि तो हि आमच्या विनय सरांवर (अरे बाप रे) विनय सर , २४-२५ वर्षाचे ,जोग्रोफी शिकवायचे ,गोरा रंग ,कुरळे केस ,नाजूकसा चष्मा , बोलणे हि अगदी मृदू ! (त्यामुळ मुली फार मरायच्या त्यांच्यावर ,आणि मुल जळायचे त्यांच्यावर ) वर्गात आले कि पहिला सुविचार वाचणार (लिहिणारी मीच ) ...मग तासाला सुरुवात .... शिकवण पण कित्ती छान ,मधेच एखाददुसरा विनोद करून सर्वाना हसवणार मधेच एखाद्या झोपाळू ला टपली मारणार त्यांना त्यांची खुर्ची नेहमी स्वच्छ हवी असे ,एकदा त्यावर धूळ दिसली तर त्यांनी " बोरसे (मुलांचा monitar ) ला बोलावले "ये बोरसे ये खुर्चीवर बैस ...लाजू नको बैस बैस ....त्याला सुरुवातीला काही कळलेच नाही सर का अस म्हणताय ? तो लाजत लाजत खुर्चीवर बसला आणि त्याची प्यांट मागून खडूच्या धुळीन पांढरी झाली तेव्हा सर्व वर्गात हास्याचे तुषार उडाले होते बिचारा .......... सर ;-"बोरसे समजले ना तुला काय ते ?" उद्यापासून धूळ दिसली नाही पाहिजे ओके ...monitar ना तू? त्यांच्या अश्या गमती -जमती मूळ हसून हसून वाट लागायची त्यांचा तास संपूच नये असे वाटायचे मला ! आता रोज सकाळी आम्हाला " खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे ", " "शेजार्यावर प्रेम करा" " "तुम्ही जेवढे प्रेम जगाला द्याल ,त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळेल" हेच सुविचार आठवायचे सगळ्यां जोडप्यांना चीडवणारी मी आता मला त्यांची अवस्था समजत होती........... मला कुठलाही पिक्चर पहिला कि विनय सरच हिरो म्हणून दिसायचे भले तो, सलमान असो कि शाहरुख ..... मन अगदी पिसासारख अलगद, " कभी इस क्लास में, कभी उस क्लास मे" त्यांना शोधायचं ते दिसले कि पाहून गोड हसायचं, ते पण हसायचे ........ वर्गात त्याचंपण सारख पियू आज सुविचार छान लिहिला ,अक्षर छान आहे तुझ ! "तू टेस्ट मध्ये छान स्कोर केला ह ! कीप इट up गुड ........" आमची स्वारी एकदम हवेत .................. असेच आमचे आयुष्यातले मोरपिसा सारखे सुंदर दिवस मजेत चालले होते होते पण पण अचानक तो दिवस आला .... "पियू जरा इकडे ये ....काय सर '" सर ; -आग त्या प्रभा म्याडम बरेच दिवस झाले आजारी आहेत त्यांना भेटलीस का तू ? (मी अन तिला भेटेन अशक्य ! एक नंबरची खडूस,पण ह्यांना काय पडलाय तीच ) मी ;नाही हो सर, का? सर : तुला माहित आहे त्या कुठ राहतात? (डोम्बल तुमच कशाला भेटताय ? दाल मे कुच्छ काला तो नही) मी ; अज्जिबात माहिती नाही हो सर मला त्या कुठ राहत्तात! सर ; होका जाऊदे अग मला कुणीतरी सांगितलं कि पियू त्यांच्या घरी डान्स प्र्याक्टीस ला जायची म्हणून सहज विचारलं !(कुणी काडया केल्या कुणास ठाऊक ) शाळा सुटली तरी तेच विचार विनय सर कशाला चालले तिकडे मरायला नसता खुराक डोक्याला माझ्या ......... दुसर्या दिवशी सकाळी सकाळी आधी विचारले "भेटले का हो सर प्रभा म्याडम्ला......" सर ; नाही ग वेळ नाही मिळाला आणि तश्यापण त्या आल्या आहेत शाळेत आज ! हो क्का (हुष श .......................बर झाल )मरून दे .. आम्हाला अस सुखी बघन देवाला खटकल जाने आम्हाला चिकन pox (कांजण्या )झाल्या आणि सर्व चेहरा भर पसरल्या डॉक्टरांनी त्या बर्या होई पर्यंत शाळेत जाऊ नको ह !नाहीतर दुसर्यानाही होतील असा प्रेमळ सल्ला दिला म्हणजे काय १०-१५ दिवस घरी .....नही............बोंबला............... कांजण्या पेक्षा विनय सर दिसणार नाहीत भेटणार नाहीत ह्या विचाराण गलबलून आल एक एक दिवस कसा कसा गेला मला विचारू नका ! आणि शेवटी तो दिवस आला आणि आम्ही सायकलवरून शाळेकडे प्रस्थान केले ८.१५ ची शाळा असून एरवी आम्ही ८.२५ पोहचून ग्राउंडला दोन राउंड मारायचो आणि आज चक्क ८ ला पोहचून आम्ही विनय सरांची आतुरतेने वाट पाहत बसलो ........प्रार्थना झाली,वर्गात जाउन बसलो सुदैव माझ पहिला तास भूगोलाचाच होता माझ सर्व लक्ष दाराकडे आत्ता येतील मग येतील १० मिनिट झाली .... मध्येच सायन्स च्या म्याडम टपकल्या आणि सायन्सचा तास सुरु झाला मी वेळापत्रक तीनदा चेक केले अरेच्या हे कस काय बुवा ? मी कपुला कोपराने ढूसनी दिली " हे काय ग कपू म्याडम भणजाळली का ? भूगोलाचा तास आहे ना? काय ग विनय सर कुठाय ? आले नाही का आज ? बर नाही का त्यांना ? कपू हळूच ;"ए बावळे जस काय तुला माहितच नाहीं" मी : आईशपथ सांग कि क्काय क्काय ?सांग न प्लीज ? आग त्याचं लग्न झाल ५-६ दिवसापूर्वी प्रभा म्याड्मशी ... क्काय ?कधी? कस? केव्हा ? (कपू अक्ख्या वर्गाची नव्हे शाळेची जेम्स बोन्ड होती अस म्हटल तरी चालेल पट्ठीला सर्व खबरबात असायची ) "छुपे रुस्तुम होते दोघ पण, लव्ह म्यारेज केल त्यांनी आता १५ दिवस रजेवर! हे ऐकून माझ्या डोक्यात हजार घण्टा वाजू लागल्या टन टन टन.......... "प्रभा sss ती दात फारुळी ,सश्यासारखे दोन दात पुढ आलेली खडूस, ती आवडली ? क्काय पण चोइस आहे विनय सरांचा ..... कुठ विनय सर अन कुठ ती ? बाकीच्या मुली (मी ) मेल्या होत्या का ? कपू ;" जाऊ दे ना ती म्हण आहे ना " दिल आया गधी............."अपनेको क्या फरक पडता हे ? (फरक तो पडता हे भाई तुम नहीं समझोगी ") "देवा तू मला ५ -६ वर्ष आधी जगात पाठवलं असत तर तुझ क्काय बिघडल असत का रे ?" (हे बालिश विचार तेव्हाचे ,म्हणून भाषा तशीच वापरली आहे, गुरूंचे स्थान आदरणीय आहे ):)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
16232 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

जाने दो

कच्ची कैरी
Wed, 03/02/2011 - 14:29 नवीन
>कसला हलकट्ट आहेस .. नको ते विचार कसे काय तुझ्या मनात येतात ?? जाउ दे ग वाहीदा जसी दृष्टी तसी सृष्टी यापेक्षा जास्त काय बोलनार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

>कसला हलकट्ट आहेस .. नको ते

अवलिया
Wed, 03/02/2011 - 15:01 नवीन
>कसला हलकट्ट आहेस .. नको ते विचार कसे काय तुझ्या मनात येतात ?? सवय. बोललेल्या, लिहिलेल्या शब्दांचे अर्थ काय होतात हे पहाण्याची जुनाट सवय. स्वतःलाही कधी सोडलं नाही. :) >>>जाउ दे ग वाहीदा जसी दृष्टी तसी सृष्टी >>यापेक्षा जास्त काय बोलनार ? सहमत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी

पियुशा! मस्त आहे गं

मृगनयनी
Wed, 03/02/2011 - 17:11 नवीन
पियुशा! मस्त आहे गं "क्रश"!... अजून कुणाचे असतील असे क्रशेस.. तरी लिहि... जास्त मजा येइल! ;) ;) ___ आणि अवलिया नाना!..... त्या परा'च्या कवितेतल्या काश्मीरा'ची आग थन्ड होण्याचं रहस्य मला आता कळलं हो! ;) बिच्चारा कृष्णा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

पियु, मस्त ग क्रश. सगळे क्रश

मुलूखावेगळी
Wed, 03/02/2011 - 13:54 नवीन
पियु, मस्त ग क्रश. सगळे क्रश लिहि ना ;) आम्हाला १ सर होते जानवळे पी.जी. ला तर आम्ही त्यांना जानु म्हनायचो. आम्ही त्यांना शिकवताना मुद्दाम क्वेरीज विचारायचो आनि उत्तर देताना लाजायचे . मज्जा यायची त्यांची
  • Log in or register to post comments

जानु नावाचे सर? :D

खादाड अमिता
Wed, 03/23/2011 - 21:21 नवीन
पियुषा, सगळ्यांचेच असे क्रश असतील ग असे! (आमचे पण बायोलोजी चे सर...) छान लिहिलयेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

काय पियु? अजुन सलतात का ग सर

स्पंदना
Wed, 03/02/2011 - 13:55 नवीन
काय पियु? अजुन सलतात का ग सर मनात? की हसु येत स्वतःचच? होता है । होता है । मला काय वाटत सांगु? जीवंत माणस , माणुस असलेली माणस प्रेम करु शकतात. बाकि सारे कट्टर! अन ते मरे पर्यम्त कट्टरच रहातात. तुझा अनुभव मात्र तु अगदी गाण्या बिण्या सकट प्रामाणिक पणे उतरवला आहेस.
  • Log in or register to post comments

ह्या असल्या भानगडींमुळे

५० फक्त
Wed, 03/02/2011 - 13:58 नवीन
ह्या असल्या भानगडींमुळे आमच्या शाळेत फक्त विवाहित शिक्षक शिक्षिका असायच्या. तरी पण दहावीत असताना (आम्ही) सोलापुरातल्या बिएड कॉलेजच्या एक दोन मॅड्म आल्या होत्या लेक्चर साठी, त्या काळजात थोड्या हुरहुरी पेटवुन गेल्या होत्या. बाकी, पियुशा लिखांण एकदम मस्त झालंय. आता कुठे असतात विनयप्रभा काही पत्ता काढलास काय ? 'शाळा' चे ट्रेलर पाहिलेत का, अम्रुता खानविलकर काय जबरा दिसते मॅडम म्हणुन., मी तर पुन्हा इ. ७ वी मध्ये अ‍ॅडमिशन घ्यायला तयार आहे.
  • Log in or register to post comments

म्हंजे मिलिंद बोकिलांच

वपाडाव
Wed, 03/02/2011 - 18:02 नवीन
म्हंजे मिलिंद बोकिलांच का? त्यात अम्रुता खानविलकर वैनी !!!!! मी अ‍ॅडव्हान्स बुकिंग करुन ठेवावं म्हंतोय ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

छान आठवण.

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/02/2011 - 14:00 नवीन
छान आठवण.
  • Log in or register to post comments

छान लेखन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/02/2011 - 19:50 नवीन
छान आठवण. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अनुभव मजेशीर आहे. अवांतरः

पाषाणभेद
Wed, 03/02/2011 - 14:16 नवीन
अनुभव मजेशीर आहे. अवांतरः "शिक्षक" अन "गुरू" यात गल्लत होते आहे.
  • Log in or register to post comments

लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही

मदनबाण
Wed, 03/02/2011 - 14:21 नवीन
लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही वाचनीय...:) मला आमच्या संस्कॄतच्या बाई आठवल्या !!! ;) गोर्‍यापान...देखण्या,आमच्या मुलांच्या भाषेत सांगायच झालं तर...क्या पीस कट पीस. ;) स्लीवलेस ब्लाउज घालुन आल्या की लयं तर्रास्स्स्स व्हायचा च्यायला. ;) त्यांच्या दंडावरचं देवीच्या इंजेक्शनच चिन्ह लयं ग्वाड दिसायचं बघा !!! ;) जाउ दे इथेच थांबतो कसा... ;) महत्वाचे वाक्य रिपीट मारतो :--- गुरूंचे स्थान आदरणीय आहे. ( अभ्यासु) ;)
  • Log in or register to post comments

मदणबाण -आपण कोण्त्या

वपाडाव
Wed, 03/02/2011 - 18:05 नवीन
मदणबाण -आपण कोण्त्या शाळेचे? कारण आम्च्या संस्कृतच्या बाई पण अग्गाग्ग्गा!!! तुफ्फ्फान कटपिस होत्या असं आठवतंय.
स्लीवलेस ब्लाउज घालुन आल्या की लयं तर्रास्स्स्स व्हायचा च्यायला
हेच म्हंतो बघा. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

कोणिही कोण्त्याही शाळेचे असा

५० फक्त
Wed, 03/02/2011 - 18:25 नवीन
कोणिही कोण्त्याही शाळेचे असा , संस्क्रुतच्या बाई ह्या गो-यापानच असणार. आम्ही मार्कांसाठी पुर्ण संस्क्रुत घेतलं होतं ८-९-१० त. ह्या बाई नेमक्या त्याच वर्षी जॉईन झाल्या. स्लिवलेस वगैरे घालायच्या नाहीत पण छान दिसायच्या. आमच्या सगळ्या मास्तर आणि बाईंप्रतिच्या भावना सार्वजनिक मुतारीत शुद्धलेखानाच्या रुपाने व्यक्त व्हायच्या, त्याची अंमळ आठवण झाली. असो, गेले ते दिवस, आता पुन्हा गेलो की सगळ्यांना भेटुन येतो परत एकदा. संस्क्रुतच्या बाईपण आता म्हाता-या दिसायला लागल्या असतील आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

आमच्या सगळ्या मास्तर आणि

आत्मशून्य
Wed, 03/02/2011 - 23:37 नवीन
आमच्या सगळ्या मास्तर आणि बाईंप्रतिच्या भावना सार्वजनिक मुतारीत शुद्धलेखानाच्या रुपाने व्यक्त व्हायच्या, त्याची अंमळ आठवण झाली.
आमच्या इथे म्हर्‍हाठी शूध्द लेखनाची बोंब पहील्या पसूनच असल्याने कल्लाकार लोक्सच ह्या जागी बाजी मारून जायचे. लेखन फक्त त्याच्या कलेला शब्दरूपाने योग्य ओळख देण्या इअतपतच मर्यादीत र्‍हाईलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

संमिश्र भावणा

सहज
Wed, 03/02/2011 - 15:19 नवीन
आपल्या लेखाने संमिश्र भावना जागृत केल्या. अंबळ हळवा व हॅपी एन्डींग. अंबळ हळवा - हम जिनपे मरते थे वो उनके गुरुपर मरते थे! हॅपी एन्डींग - त्यांचा साखरपुडा झाल्यानंतर फाटले. (हॅ हॅ हॅ आपल्याला ह्याचा लै लै आनंद आहे ;-) खोटे कशाला बोला!)
  • Log in or register to post comments

हल्कत

रमताराम
Mon, 03/21/2011 - 15:11 नवीन
अच्रत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

एकदम मस्त लिहलयस ग... मला पण

Mrunalini
Wed, 03/02/2011 - 16:55 नवीन
एकदम मस्त लिहलयस ग... मला पण आमचे कॉलेज चे दिवस आठवले. पण आमच्या कॉलेज मधले आमचे सर एकदम मेंगळट होते. एकतर काय शिकवायचे, ते काही झेपायचे नाही. त्यात तो त्यांचा मोठ्या भिंगांचा चश्मा आणि क्लास मधल्या सुंदर मुलींकडे बघुन सारखी smile करणे. आम्ही त्यांना चम्या हे नाव ठेवल होतं. खुप मस्ती केली होती कॉलेज मधे. सगळे दिवस आठवले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

हम्म हम्म खरतर मास्तरांच्या विषयी लिहावे थेवढे थोडेच आहे.

वेताळ
Wed, 03/02/2011 - 17:20 नवीन
आमच्या इथे एका देखण्या मास्तरांवर पोरी लाईन मारत होत्या,त्यात एका नव्या शिक्षिकेने देखिल लाईन मारायला सुरुवात केली. मग काय सरानी आणि तिने बोभाटा झालेवर लग्न केले.सहा महिने सर गावा कडे आले नाहित म्हणुन त्याची बायको दोन मुलाना घेवुन शाळेत आल्यावर काय झाले ते विचारु नका.पुढे काय लिहता येत नाही कारण .............................गुरूंचे स्थान आदरणीय आहे.
  • Log in or register to post comments

लई झ्याक!

कुसुमिता१२३
Wed, 03/02/2011 - 18:23 नवीन
ए मस्त लिहीलयस पियुशा! झक्कास!
  • Log in or register to post comments

एकदम भारी अनुभव आहे . विषय

निनाद मुक्काम …
गुरुवार, 03/03/2011 - 00:35 नवीन
एकदम भारी अनुभव आहे . विषय मांडण्याची शैली आवडली . . एक गमतीदार किस्सा आठवला . दहावी नंतर डोंबिवलीतून मुंबापुरीत उच्च का काय ते म्हणतात ते शिक्षण घेण्यासाठी कॉलेज सोबत कोचिंग क्लास लावला .( पंत म्हणाले तसे '' महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही ह्या उक्तीचा प्रत्यय आला . सिंधी आणी पंजाबी समूहात मी एकटा अल्पसंख्यांक त्यांचे पॉश रहाणे/वागणे आम्हाला संभ्रमीत करायचे .एका मैत्रिणीला क्लास मधील एक सर जाम आवडायचे . तिला इतरांनी ते सुध्धा तुझ्यावर कटाक्ष टाकतात ..... त्यामुळे ती प्रेमात दिवाणी झाली . पहिल्या बाकावर बसून एकटक त्यांच्याकडे पहायची . तरीही काहीच प्रतिसाद मिळत नाही म्हणून तिने मेनकेने जो मार्ग स्वीकारला तो स्वीकारला . नटण्या मुरडणे वैगरे प्रकार करून झाले . प्रतिसाद मिळत नाही हे पाहून ती बिथरली . स्वताच्या आधीच लो कट असणाऱ्या टोप ची बटणे खुली सोडून पहिल्या बाकावर बसली पहिल्यांदा सरांनी तिला पेन्सिलीने खुणेने सर्वांसमोर सांगितले .( ते हि जरा तिच्यावर कावले होते .) मग परत माझ्या टंक लेखाना प्रमाणे काहीच सुधारणा नाही हे पाहील्यावर त्यांनी सर्व क्लास समोर तिला'' बटणे लाव असे सांगितले . तिने त्यावर'' मला कम्फर्टेबल वाटते'' असे सांगितले . ह्यावर तिला क्लास बाहेर जायला सांगितले .तर तिने ''मी क्लास बाहेर तुमची वाट पाहीन असे सांगितले'' तिच्या पालकांना निरोप धाडला त्यांनी गाडीतून येऊन फार काही झाले नसल्याच्या अविर्भावात तिला घेऊन गेले . ह्यामुळे क्लास मधील प्रेम प्रकरण दीर्ध काळा पर्यत तहकूब झाली . .
  • Log in or register to post comments

गुरूंचे स्थान आदरणीय आहे.

आत्मशून्य
Wed, 03/02/2011 - 21:16 नवीन
हा या कथेचा सारांश मनाला एकदम हळवा बनवून गेला.
  • Log in or register to post comments

आठवणी जाग्या झाल्या!!!

अतुल पाटील
गुरुवार, 03/03/2011 - 03:51 नवीन
आठवणी जाग्या झाल्या!!! सहिच आहे हे.
  • Log in or register to post comments

सर्व वाचकान्चे मनापासुन आभार

पियुशा
गुरुवार, 03/03/2011 - 09:44 नवीन
सर्व वाचकान्चे मनापासुन आभार :)
  • Log in or register to post comments

आमच्या शाळेत एक मास्तर आणि

विजुभाऊ
गुरुवार, 03/03/2011 - 13:40 नवीन
आमच्या शाळेत एक मास्तर आणि बैंचे असेच काहीसे होते. चं. पा शिंदे नावाच्या एका महा नाठाळ मुलाने ( सातवी क) त्या मास्तरांना " मास्तर त्या बै ना लै चालू आहेत" अशी गुप्त माहिती पुरवली. आणि त्या बदल्यात बुक्क्यानी अंग रगडून घेतले होते. ( मार खाऊन) नंतर त्या मास्तरांचे आणि बैंचे षुभमंगल झाले. गुरुचे स्थान अढळ्च आहे
  • Log in or register to post comments

लई भारी लिखाण....

प्रास
गुरुवार, 03/03/2011 - 18:27 नवीन
आवडलं..... एकदम आवडलं.....
  • Log in or register to post comments

अले अले अले. कित्ती कित्ती

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 03/03/2011 - 18:47 नवीन
अले अले अले. कित्ती कित्ती गोग्गोड. डैबीटीस झाला. यश चोप्रानंतर पियुषाच.
  • Log in or register to post comments

लेख शेर तर परतिकिरिया

नरेशकुमार
Fri, 03/04/2011 - 09:30 नवीन
लेख शेर तर परतिकिरिया सव्वाशेर !
  • Log in or register to post comments

मला पन सरव परतिकिरिया कुपच

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 03/04/2011 - 12:41 नवीन
मला पन सरव परतिकिरिया कुपच आवल्ड्या ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

क्रश भंग....

Antarang
Mon, 03/21/2011 - 14:40 नवीन
हम हम... काही होत नाही ....पुन्हा एकदा...
  • Log in or register to post comments

क्रमशः असे लिहायचे राहीले आहे का?

चिंतामणी
Tue, 03/22/2011 - 00:49 नवीन
धाग्याचे नाव आणि त्याचा शेवट बघता मला असे वाटते की पुढचा भाग येणार आहे. तेंव्हा पुढील(अथवा पुढचे) भाग येण्याची आणि वाचण्यासाठी उत्सुक आहे. 'परा'कोटीचा उत्सुक (चिंतामणी)
  • Log in or register to post comments

पहिला पहिला क्रश ??? वयाच्या

विनायक बेलापुरे
Tue, 03/22/2011 - 01:54 नवीन
पहिला पहिला क्रश ??? वयाच्या टीन एजमध्ये ... वाई-पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यावर माला'ज चा स्ट्रॉबेरी क्रश.... नंतर अनेकदा घेतला पण पहिली चव अजुन तोंडात घोळते आहे. :)
  • Log in or register to post comments

माणनीय लंबूटांग याणा विणंती

गेंडा
Wed, 03/23/2011 - 15:50 नवीन
येका प्रतिसादाचे महाण रसग्रहण करना-या लेखनसम्राट लंबुटांग यांनी या लेखाचे रसग्रहण करावे. त्यांना मार्गदर्शन करनेची माजी लायकी नाय. पन काई नमुने तेंच्या समोर ठिवतो. त्यावेळी मी नववीत असेन ,आमच्या धिंगाणेबाज कंपूत आम्ही ५-६ मुली होतो आमच्या वर्गात दोन मॉनिटर होते एक मुलांचा ,आणि एक मुलींची ,(ती मी होते ) वर्ष संपत आले होते जवळ जवळ, पण ग्रुप मधल्या काही मुलीन मधला बदल थोडा उशिराच लक्षात आला माझ्या ! (मुलींसाठी )सक्तीची दोन वेण्या आणि काळी रिबीन असताना हि कधीकधी पोनी बांधन, दोन चार केसांची बट मुद्दाम गालावर रुळवन, आणि म्याड्मचे वेणी का नाही घातली ? म्हणून बोलणे खाण..... (वाक्यात पुर्णविरामा ऐवजी स्वल्प विरामाचा वापर करने) गम्मत अशी कि ज्या मुलींशी आमची खुन्नस होती त्या बाकी मला जरा टरकायाच्या जरा नरमाईने वागायच्या ... (वाक्यात येकही चिन्ह न वापरणे) आम्ही रनिंग मध्ये भाग घेतला होता नेमकी जिंकायच्या बेतात असताना मध्येच माझा टांगा कल्टी झाला बाकीच्या म्याडम धावत आल्या त्यांनी मला हाताला धरून साईडला घेतले ,पाणी पाजले, आणी त्यात ते पण होते विनय सर ...... (मराटी भाषेला नवा लेहजा देणे) " खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे ", (शब्द जोडुन नवा अर्थ निर्मान करने)
  • Log in or register to post comments

गेंडाभौ, एकाच हाताची सगळी

नगरीनिरंजन
Wed, 03/23/2011 - 15:56 नवीन
गेंडाभौ, एकाच हाताची सगळी बोटं सारखी नसताऽऽत. शिवाय डाव्या हाताची वेगळी, उजव्या हाताची वेगळी. कसं कळत नाही तुम्हाला? मिपावर नवीन दिसताय. अभ्यास वाढवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गेंडा

हेच म्हणतो मी किंवा डू

निनाद मुक्काम …
Wed, 03/23/2011 - 21:08 नवीन
हेच म्हणतो मी किंवा डू आयडी एका महिलेने स्वतःचा अनुभव मांडला हे तुम्हाला फारसे रुचले नाही . तुमच्यासाठी एक कंपू वाट पाहत आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

पहिला पहिला क्रश ...

महेश काळे
गुरुवार, 01/12/2012 - 15:17 नवीन
मस्त लिहिलंय!
  • Log in or register to post comments

लेख आवडला......शैली पण..

अविनाशकुलकर्णी
Fri, 01/13/2012 - 00:06 नवीन
लेख आवडला......शैली पण..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा