कां?
मी संतान त्या अनादी अभोगी निर्मात्याचे
कां असावे भय मजला कुणा भोगी मानवाचे ?
मी चालतो धरुन कास सदा सत्याची
कां बाळगावी भिड कुणा चित्रगुप्ताची ?
मी प्रवासी त्या लखलखत्या मद्ध्यांनीचा
कां असावा छंद मजला काळोख्या रात्रीचा ?
जर आहे लक्ष माझे शिखर त्या हिमगीरीचे
कां ओढीसी दु:ख मजला या ओसाड माळरानीचे ?
जन्मजन्मांतरीचा दास त्या अनादी अनंताचा
कां छळावा श्रावण मजला माझ्या गतजन्माचा ?
आधार मज असे जगनियंत्याच्या शाश्वत वचनाचा
कां असावा अविश्वास अंतरी या अफाट विश्वपसार्याचा ?
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२०/१०/२०१०)
मी संतान त्या अनादी अभोगी
परत
परीकाठेईल राजा - जर आहे लक्ष
मस्त ह चालु द्या
कविता खुपच छान ...
सुंदर
छान आहे कविता. आवडली.
सर्वांचे