Skip to main content

कां?

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 28/02/2011 12:48 या दिवशी प्रकाशित केले.

मी संतान त्या अनादी अभोगी निर्मात्याचे
कां असावे भय मजला कुणा भोगी मानवाचे ?

मी चालतो धरुन कास सदा सत्याची
कां बाळगावी भिड कुणा चित्रगुप्ताची ?

मी प्रवासी त्या लखलखत्या मद्ध्यांनीचा
कां असावा छंद मजला काळोख्या रात्रीचा ?

जर आहे लक्ष माझे शिखर त्या हिमगीरीचे
कां ओढीसी दु:ख मजला या ओसाड माळरानीचे ?

जन्मजन्मांतरीचा दास त्या अनादी अनंताचा
कां छळावा श्रावण मजला माझ्या गतजन्माचा ?

आधार मज असे जगनियंत्याच्या शाश्वत वचनाचा
कां असावा अविश्वास अंतरी या अफाट विश्वपसार्‍याचा ?

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२०/१०/२०१०)

लेखनविषय:

वाचने 1697
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मी संतान त्या अनादी अभोगी निर्मात्याचे
कां असावे भय मजला कुणा भोगी मानवाचे ?

पहिलाच लायनीत झोल आहे ... आता निर्माता "अभोगी" असेल तर निर्माती ऊप्स .. निर्मिती कशी होणार ?

असो , कवीता एका वेगळ्याच "अंगाने" जाते आहे असे वाटले :)

- राजपाटील राजा
(और राजा को प्रजा धोका नही दे सकती)


परीकथेतील राजा -
जर आहे लक्ष माझे शिखर त्या हिमगीरीचे
कां ओढीसी दु:ख मजला या ओसाड माळरानीचे ?

छान लिहिले आहे .पु.ले.शु.


कविता खुपच छान ...

विशेषत:

मी प्रवासी त्या लखलखत्या मद्ध्यांनीचा
कां असावा छंद मजला काळोख्या रात्रीचा ?

जर आहे लक्ष माझे शिखर त्या हिमगीरीचे
कां ओढीसी दु:ख मजला या ओसाड माळरानीचे ?


सुंदर रचना. लय अपोआप लागते वाचतांना. शब्द निवड खूपच सुंदर आहे.
-पु. ले. शु.