तंदुरी चिकन

गणपा's picture
गणपा in पाककृती
18 Feb 2011 - 1:24 pm

नमस्कार मंडळी,
उद्या रंणशिंग फुंकल जाणार. भारताचा सुपरबॉल चालु होतोय ना :D.
दोन चार दोस्त मंडळी नसतील सोबतीला तर काय मजा. म्हणुन मित्रांना आमंत्रण गेली आहेत. आमच्या तर्फे जय्यत तयारी केली जाणार आहे. फ्रिज भरलेला आहे. (कश्याने ते सांगायलाच हव का? ;))
बाकी सटर फटर तोंडी लावण्या सोबत तंदुरी केली जाणार आहे.
गेल्या आठवड्यात त्याचा सराव सामना करुन झाला. तुम्हाला ही भारतासाठी जल्लोष करताना वातावरण निर्मीती करुन ठेवायची असेल तर मदत व्हावी म्हणुन हा प्रपंच. :)
तर लागा तयारीला फक्त २४ तास उरलेत. :)

साहित्यः

२ चमचे घट्ट दही (शक्यतो पाणी काढुन टाकलेल.)
२-३ मोठे चमचे तंदुर मसाला.
१-२ चमचे लाल तिखट.
१/४ चमचा केशरी रंग. (आवडत असल्यास.)
२ चमचे तेल.
१-२ चमचे आल-लसुण पेस्ट.
२ चमचे लिंबाचा रस.
मीठ चवी नुसार.

१ आख्खी कोंबडी. स्वछ धुवुन साफ केलेली.

कृती:

एका भांड्यात वरील सर्व पदार्थ एकत्र करुन घ्यावे.

कोंबडीला सुरीने चरे पाडुन वरील मिश्रण नीट चोळुन चोळुन लावावे. आणि कोंबडी फ्रिज मध्ये किमान १ तास मुरत ठेवावी.

ओव्हन २५० ते २७५ °C वर 15 मिनिटं तापवुन मग कोंबडी शिजत ठेवावी. २५-३० मिनिटांनी वरची बाजू खाली करुन परत २०-२५ मिनिटे शिजु द्यावं.


GO INDIA GO

प्रतिक्रिया

अवलिया's picture

18 Feb 2011 - 1:26 pm | अवलिया

कोण आहे रे तिकडे ? जा त्या गणपाला दोन महिन्यांसाठी इकडे उचलुन आणा पटकन !!!

स्वैर परी's picture

18 Feb 2011 - 1:34 pm | स्वैर परी

कोंबडी खाणे कधीच सोडुन दिलेय! पण फोटो पाहुन तर .. जीभ लपलपायी! ;)

वेताळ's picture

18 Feb 2011 - 1:34 pm | वेताळ

हलकट कुठला लेकाचा.....

टारझन's picture

18 Feb 2011 - 1:38 pm | टारझन

पाणी सुटले :)

आजानुकर्ण's picture

18 Feb 2011 - 1:40 pm | आजानुकर्ण

तोंडाला पाणी सुटले :)

sneharani's picture

18 Feb 2011 - 1:51 pm | sneharani

मस्तच फोटो! मस्त रेसिपी
:)

समाधान's picture

18 Feb 2011 - 2:20 pm | समाधान

मस्तच रेसिपी गणपाभाऊ ...
मी तुमचा पंखा झालोय..

यशोधरा's picture

18 Feb 2011 - 2:26 pm | यशोधरा

अय्याय्याय! भारी रे!

मुलूखावेगळी's picture

18 Feb 2011 - 2:35 pm | मुलूखावेगळी

मस्त हो
वेज डिश टाका आता एखादी .

रत्नागिरीकर१'s picture

18 Feb 2011 - 3:28 pm | रत्नागिरीकर१

छान आहे हा.. भारत फायनलला गेला की नवर्याला करुन देइन...

कच्ची कैरी's picture

18 Feb 2011 - 3:48 pm | कच्ची कैरी

और ये लगा सिक्सर !गणपा फिर से चॅमपियन !
मस्त ,तोंडात पाण्याची छोटीशी त्सुनामी उठलीये.

वा, वा. एकदम मस्त. तोंडाला पाणी सुटले.

छान आहे हा.. भारत फायनलला गेला की नवर्याला करुन देइन...

मी पण रत्नागिरीकर१ शी सहमत आहे. :D :D

विजुभाऊ's picture

18 Feb 2011 - 3:59 pm | विजुभाऊ

धन्यवाद रे गणपा भौ. इच्छा व्यक्त केली आणि ती तू पूर्ण केलीस.
अवांतर : ही रेशीपी घरी केली तर माझी कायमची हाकालपट्टी होईल किंवा मिपावर तम्दूर विजुभाऊ अशी एखादी रेशीपी पडेल

आजानुकर्ण's picture

18 Feb 2011 - 4:03 pm | आजानुकर्ण

तम्दूर विजुभाऊ अशी एखादी रेशीपी पडेल

म्हणजे? कोंबडी नाही पण विजुभाऊ चालतात असे काही आहे का?

प्यारे१'s picture

18 Feb 2011 - 4:25 pm | प्यारे१

कच्ची कोंबडी उत्तानपादासन करतेय असे वाटले.

बाकी तोंडाला आवर घालण्याचा प्रयत्न करतोय पण काय होणारे कुणास ठाऊक?

बेक्कार. .

बाकी प्यारे त्याला पवनमुक्तासन म्हणतात. असो. ;-)

प्यारे१'s picture

19 Feb 2011 - 9:12 am | प्यारे१

भा पो महत्वाचे.

बाकी नायल्याला धन्यवाद द्यावे लागतात म्हन्जे....(धाय मोकलून रडल्याची स्मायली)

असो.

धन्स रे नायल्या.

आणि हो, ते 'वडिल' नावाचे बालक नाय दिसले रे कुठे????

विजुभाऊ's picture

18 Feb 2011 - 4:25 pm | विजुभाऊ

ते चालेल हो. कारण तोपर्यन्त नियम मोडलेला असेल.

एकदम मस्त. तोंडाला पाणी सुटले :)

नगरीनिरंजन's picture

18 Feb 2011 - 4:35 pm | नगरीनिरंजन

मस्त! १ नंबर!

स्वाती दिनेश's picture

18 Feb 2011 - 5:00 pm | स्वाती दिनेश

म्याच बघण्याची तयारी जोरात चाल्लेली दिसत्ये.. :)
स्वाती

लवंगी's picture

18 Feb 2011 - 6:57 pm | लवंगी

वाट पहातेय कधी येतोय त्याची.. येच तू आता..

दीविरा's picture

18 Feb 2011 - 7:31 pm | दीविरा

गणपाभाऊ जरा जास्तीच होतय हे :)

फारच सुगरण आहात तुम्ही :) घरगुती अजीबात वाटत नाही.

बायको लकी आहे तुमची !!

छान येऊ द्या अजुन...:)

दीविरा's picture

18 Feb 2011 - 7:32 pm | दीविरा

गणपाभाऊ जरा जास्तीच होतय हे :)

फारच सुगरण आहात तुम्ही :) घरगुती अजीबात वाटत नाही.

बायको लकी आहे तुमची !!

छान येऊ द्या अजुन...:)

मराठे's picture

18 Feb 2011 - 8:19 pm | मराठे

ही पाककृती नसून पापकृती आहे... नुसतं बघूनच तोंडाला धो धो पाणी सुटलंय...

तों.पा.सु.

(लंच टाईम जवळ आलाय आणि त्यात हा त्रास :( )

बेसनलाडू's picture

18 Feb 2011 - 10:32 pm | बेसनलाडू

भारत वि. कोणताही देश (शक्यतो पाकिस्तान/ऑस्ट्रेलिया) असा अंतिम सामना असावा, सचिन पूर्ण भरात खेळत असावा आणि भारत विश्वचषक विजयाच्या उंबरठ्यावर असावा, घरी मित्रमैत्रिणींसोबत हे चिकन खात खात सामन्याचा लुत्फ लुटावा, असे काहीसे इच्छाचित्र डोळ्यांसमोर तरळले.
(चिकनप्रेमी)बेसनलाडू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Feb 2011 - 11:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच भारी आणि ती कोंबडी किती स्वच्छ धुतली आहे राव. :)

-दिलीप बिरुटे

ज्योति प्रकाश's picture

18 Feb 2011 - 11:58 pm | ज्योति प्रकाश

गणपाभौ,तूसी ग्रेट हो,काय फोटू टाकलाय राव ,खल्लास
जरा तंदुरी मायक्रोमध्ये कशी करायची ते सांगू शकाल कां?.

खादाड's picture

19 Feb 2011 - 12:05 pm | खादाड

:)

नि३सोलपुरकर's picture

19 Feb 2011 - 1:43 pm | नि३सोलपुरकर

गणपाभाई,
एकदम मस्त. तोंडाला पाणी सुटले
आनि देवाजवळ एकच विनती आमच्या हिला पन रत्नागिरीकर१ आनि Mrunalini प्रमाने बुद्धि देवो.

नि३

स्वाती२'s picture

19 Feb 2011 - 5:23 pm | स्वाती२

मस्त!

आशिष सुर्वे's picture

19 Feb 2011 - 6:28 pm | आशिष सुर्वे

गणू गणू.. तू म्हणजे, किचनच्या पावरप्लेचा 'युसूफ'च जणू..

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Feb 2011 - 8:29 pm | बिपिन कार्यकर्ते

गणप्या भोसडिच्या तू ना मला कोंबडीचं प्रेत खायला लावणार एकदा!!! :(

कुंदन's picture

19 Feb 2011 - 8:43 pm | कुंदन

इनो घ्या , इनो.

दिपाली पाटिल's picture

20 Feb 2011 - 1:03 am | दिपाली पाटिल

मस्तंय पाकृ... मी ब्लॉगवरून बघून केली होती. मस्त बनते या पाकृने कोंबडी...

संदीप चित्रे's picture

21 Feb 2011 - 4:33 am | संदीप चित्रे

ह्यापुढे गणपाच्या कुठल्याही पाकृला हीच प्रतिक्रिया देणार !
अमेरिकेचा दौरा कधी रे मित्रा?

स्पंदना's picture

21 Feb 2011 - 7:00 am | स्पंदना

कू कूच्या कू ऊऊ !!
मस्त भाजलीय कोंबडी!! गणपा भाउ धन्यवाद जीभ खवळवल्याबद्दल!

अवांतरः - वरच्या बर्‍याच प्रतिसादात 'विश्वामित्र' कसा ढळला असेल त्याचा प्रत्यय येतो नाही?

पियुशा's picture

22 Feb 2011 - 11:14 am | पियुशा

व्वा क्या बात !