Skip to main content

तंदुरी चिकन

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 18/02/2011 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, उद्या रंणशिंग फुंकल जाणार. भारताचा सुपरबॉल चालु होतोय ना :D. दोन चार दोस्त मंडळी नसतील सोबतीला तर काय मजा. म्हणुन मित्रांना आमंत्रण गेली आहेत. आमच्या तर्फे जय्यत तयारी केली जाणार आहे. फ्रिज भरलेला आहे. (कश्याने ते सांगायलाच हव का? ;)) बाकी सटर फटर तोंडी लावण्या सोबत तंदुरी केली जाणार आहे. गेल्या आठवड्यात त्याचा सराव सामना करुन झाला. तुम्हाला ही भारतासाठी जल्लोष करताना वातावरण निर्मीती करुन ठेवायची असेल तर मदत व्हावी म्हणुन हा प्रपंच. :) तर लागा तयारीला फक्त २४ तास उरलेत. :) साहित्यः २ चमचे घट्ट दही (शक्यतो पाणी काढुन टाकलेल.) २-३ मोठे चमचे तंदुर मसाला. १-२ चमचे लाल तिखट. १/४ चमचा केशरी रंग. (आवडत असल्यास.) २ चमचे तेल. १-२ चमचे आल-लसुण पेस्ट. २ चमचे लिंबाचा रस. मीठ चवी नुसार. १ आख्खी कोंबडी. स्वछ धुवुन साफ केलेली. कृती: एका भांड्यात वरील सर्व पदार्थ एकत्र करुन घ्यावे. कोंबडीला सुरीने चरे पाडुन वरील मिश्रण नीट चोळुन चोळुन लावावे. आणि कोंबडी फ्रिज मध्ये किमान १ तास मुरत ठेवावी. ओव्हन २५० ते २७५ °C वर 15 मिनिटं तापवुन मग कोंबडी शिजत ठेवावी. २५-३० मिनिटांनी वरची बाजू खाली करुन परत २०-२५ मिनिटे शिजु द्यावं.

GO INDIA GO


वाचने 16930
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

कोंबडी खाणे कधीच सोडुन दिलेय! पण फोटो पाहुन तर .. जीभ लपलपायी! ;)

हलकट कुठला लेकाचा.....

मस्तच फोटो! मस्त रेसिपी :)

और ये लगा सिक्सर !गणपा फिर से चॅमपियन ! मस्त ,तोंडात पाण्याची छोटीशी त्सुनामी उठलीये.

वा, वा. एकदम मस्त. तोंडाला पाणी सुटले. छान आहे हा.. भारत फायनलला गेला की नवर्याला करुन देइन... मी पण रत्नागिरीकर१ शी सहमत आहे. :D :D

धन्यवाद रे गणपा भौ. इच्छा व्यक्त केली आणि ती तू पूर्ण केलीस. अवांतर : ही रेशीपी घरी केली तर माझी कायमची हाकालपट्टी होईल किंवा मिपावर तम्दूर विजुभाऊ अशी एखादी रेशीपी पडेल

कच्ची कोंबडी उत्तानपादासन करतेय असे वाटले. बाकी तोंडाला आवर घालण्याचा प्रयत्न करतोय पण काय होणारे कुणास ठाऊक?

In reply to by Nile

भा पो महत्वाचे. बाकी नायल्याला धन्यवाद द्यावे लागतात म्हन्जे....(धाय मोकलून रडल्याची स्मायली) असो. धन्स रे नायल्या. आणि हो, ते 'वडिल' नावाचे बालक नाय दिसले रे कुठे????

म्याच बघण्याची तयारी जोरात चाल्लेली दिसत्ये.. :) स्वाती

गणपाभाऊ जरा जास्तीच होतय हे :) फारच सुगरण आहात तुम्ही :) घरगुती अजीबात वाटत नाही. बायको लकी आहे तुमची !! छान येऊ द्या अजुन...:)

गणपाभाऊ जरा जास्तीच होतय हे :) फारच सुगरण आहात तुम्ही :) घरगुती अजीबात वाटत नाही. बायको लकी आहे तुमची !! छान येऊ द्या अजुन...:)

भारत वि. कोणताही देश (शक्यतो पाकिस्तान/ऑस्ट्रेलिया) असा अंतिम सामना असावा, सचिन पूर्ण भरात खेळत असावा आणि भारत विश्वचषक विजयाच्या उंबरठ्यावर असावा, घरी मित्रमैत्रिणींसोबत हे चिकन खात खात सामन्याचा लुत्फ लुटावा, असे काहीसे इच्छाचित्र डोळ्यांसमोर तरळले. (चिकनप्रेमी)बेसनलाडू

गणपाभौ,तूसी ग्रेट हो,काय फोटू टाकलाय राव ,खल्लास जरा तंदुरी मायक्रोमध्ये कशी करायची ते सांगू शकाल कां?.

गणपाभाई, एकदम मस्त. तोंडाला पाणी सुटले आनि देवाजवळ एकच विनती आमच्या हिला पन रत्नागिरीकर१ आनि Mrunalini प्रमाने बुद्धि देवो. नि३

गणू गणू.. तू म्हणजे, किचनच्या पावरप्लेचा 'युसूफ'च जणू..

ह्यापुढे गणपाच्या कुठल्याही पाकृला हीच प्रतिक्रिया देणार ! अमेरिकेचा दौरा कधी रे मित्रा?

कू कूच्या कू ऊऊ !! मस्त भाजलीय कोंबडी!! गणपा भाउ धन्यवाद जीभ खवळवल्याबद्दल! अवांतरः - वरच्या बर्‍याच प्रतिसादात 'विश्वामित्र' कसा ढळला असेल त्याचा प्रत्यय येतो नाही?