मैत्रीमधे वजाबाकी
दोषांची करावी
मैत्रीमधे बेरीज ती
गुणांची करावी
मैत्रीत हवा गुणाकार
मैत्रीत नको भागाकार
मैत्रीच्या गणितांमधे
शून्याला नकोच आधार !
खेळता खेळता आकड्यांनी
मैत्रीचे धागे विणावे
विणता विणता धाग्यांनी
जाळे सुंदरसे बनवावे
मैत्रीच्या जाळ्यात
खूप खूप गुरफटावे
मैत्रीचे नंतर गणित
आयुष्यात ना सुटावे !!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1447
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
मैत्रीच्या जाळ्यात खूप खूप
मित्रा सठि वट्टेल ते
मैत्रीमधे वजाबाकी दोषांची