Skip to main content

मेल्टिंग मोमेन्ट्स (कोकोनट कुकीज)

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 09/02/2011 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मैदा - १२० ग्रॅम बटर - १०० ग्रॅम साखर - ९० ग्रॅम अंडे - १/२ (पांढरे+बलक) व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब बेकिंग पावडर - १/४ टि स्पुन डेसिगेटेड कोकोनट - ५० ग्रॅम कृति : १. रुम temperature ला आलेले बटर व साखर एकत्र फेटुन घ्यावे. २. १/२ अंडे व्हॅनिला इसेन्स टाकुन फेटावे. ३. हे अंडे बटर व साखर मधे टाकुन मिक्स करावे. ४. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्यावे. ५. मैदा बटर मधे टाकुन त्याचा rubber spatula वापरुन गोळा करुन घ्यावा. ६. हा गोळा १५-२० मिनिटे फ्रिज मधे ठेवावा. ७. १५-२० मिनिटांनी गोळा बाहेर काढुन त्याचे समान आकाराचे छोटे छोटे गोळे करुन घ्यावेत. ८. प्रत्येक गोळा गार पाण्यामधे बुडवुन डेसिगेटेड कोकोनट मधे घोळवुन बटर लावलेल्या बेकिंग ट्रे मधे ठेवावा. प्रत्येक गोळ्यामधे १ इंचाचे अंतर ठेवावे, कारण ते बेक होत असताना मोठे होतात. ९. ओवन १८० degree celcius ला १० मिनिटे preheat करावा. १०. ओवन preheat झाल्यावर बेकिंग ट्रे आत मधे ठेवुन कुकीज १५-२० मिनिटे किंवा सोनेरी रंग येइस पर्यंत बेक कराव्यात. ११. बेक झाल्यावर थोडा वेळ गार होउन द्याव्यात. १२. चहा किंवा कॉफी सोबत serve कराव्यात. Cookies cookies cookies

वाचने 6641
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

एक नारीयल पेड से टुटा गिरतेही वो बिचसे फूटा सेकताप कर उसे पकाया खुब कुरकूरा उसे बनाया मृणालिनी कोकोनट कुकीज! सहज आगा

In reply to by सहज

हाहाहा!! सहज राव... खूप जुन्या जाहिरातीची आठवण करून दिलीत. मृणालिनी, खूप सुंदर दिसताहेत कुकीज. अप्रतिम. शेवटचे दोन्ही फोटो जीवघेणे आहेत. :)

म्रुणालिनी, खुप मस्त फोतो अनि पाक्रु पन पुन्हा डेसिगेटेड खोबरे आलेच :( पन ते न टाकता ही करता येइल ना नुसते कुकीज?

वा काय मस्त दिसताय !आत्ताच डाऊनलोड करुन घेते .

छान दिसत आहेत कुकीज, @सहजराव, खूप जुनी जाहिरात- आठवण ताजी केलीत,:) स्वाती

माझाही हाच प्रश्न खुप छान दिसत आहेत कुकीज. अंडी न घालता कशा करायाच्या कुकीज.प्लीज सांगाल का?

खुप छान दिसत आहेत कुकीज. अंडी न घालता कशा करायाच्या कुकीज.प्लीज सांगाल का?

In reply to by निवेदिता-ताई

सगळ्यांचे आभार. :) हो, निवेदिता-ताईंचे बरोबर आहे. हेच प्रमाण घेउन व अंड न टाकता, तुम्ही ह्या कुकीज करु शकता.

>>>>अंडी न घालता कशा करायाच्या कुकीज.प्लीज सांगाल का? हे वाक्य अगदी सरळ वाचले आणि फुटलो. स्वारी बर्का काकवांनो.