मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मेल्टिंग मोमेन्ट्स (कोकोनट कुकीज)

Mrunalini · · पाककृती
साहित्यः मैदा - १२० ग्रॅम बटर - १०० ग्रॅम साखर - ९० ग्रॅम अंडे - १/२ (पांढरे+बलक) व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब बेकिंग पावडर - १/४ टि स्पुन डेसिगेटेड कोकोनट - ५० ग्रॅम कृति : १. रुम temperature ला आलेले बटर व साखर एकत्र फेटुन घ्यावे. २. १/२ अंडे व्हॅनिला इसेन्स टाकुन फेटावे. ३. हे अंडे बटर व साखर मधे टाकुन मिक्स करावे. ४. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्यावे. ५. मैदा बटर मधे टाकुन त्याचा rubber spatula वापरुन गोळा करुन घ्यावा. ६. हा गोळा १५-२० मिनिटे फ्रिज मधे ठेवावा. ७. १५-२० मिनिटांनी गोळा बाहेर काढुन त्याचे समान आकाराचे छोटे छोटे गोळे करुन घ्यावेत. ८. प्रत्येक गोळा गार पाण्यामधे बुडवुन डेसिगेटेड कोकोनट मधे घोळवुन बटर लावलेल्या बेकिंग ट्रे मधे ठेवावा. प्रत्येक गोळ्यामधे १ इंचाचे अंतर ठेवावे, कारण ते बेक होत असताना मोठे होतात. ९. ओवन १८० degree celcius ला १० मिनिटे preheat करावा. १०. ओवन preheat झाल्यावर बेकिंग ट्रे आत मधे ठेवुन कुकीज १५-२० मिनिटे किंवा सोनेरी रंग येइस पर्यंत बेक कराव्यात. ११. बेक झाल्यावर थोडा वेळ गार होउन द्याव्यात. १२. चहा किंवा कॉफी सोबत serve कराव्यात. Cookies cookies cookies

वाचने 6628 वाचनखूण प्रतिक्रिया 30

सहज Wed, 02/09/2011 - 06:51
एक नारीयल पेड से टुटा गिरतेही वो बिचसे फूटा सेकताप कर उसे पकाया खुब कुरकूरा उसे बनाया मृणालिनी कोकोनट कुकीज! सहज आगा

In reply to by सहज

प्राजु Wed, 02/09/2011 - 07:43
हाहाहा!! सहज राव... खूप जुन्या जाहिरातीची आठवण करून दिलीत. मृणालिनी, खूप सुंदर दिसताहेत कुकीज. अप्रतिम. शेवटचे दोन्ही फोटो जीवघेणे आहेत. :)

In reply to by निवेदिता-ताई

Mrunalini Wed, 02/09/2011 - 14:41
सगळ्यांचे आभार. :) हो, निवेदिता-ताईंचे बरोबर आहे. हेच प्रमाण घेउन व अंड न टाकता, तुम्ही ह्या कुकीज करु शकता.

प्यारे१ Wed, 02/09/2011 - 16:35
>>>>अंडी न घालता कशा करायाच्या कुकीज.प्लीज सांगाल का? हे वाक्य अगदी सरळ वाचले आणि फुटलो. स्वारी बर्का काकवांनो.