नमस्कार,
महाराष्ट्राबाहेर काही साईबाबांची मंदिरे आहेत तेथे अनेक प्रकारच्या आरत्या म्हंटल्या जातात. बेंगळूरमध्ये काही मंदिरांत साईबाबांची आरती मराठीतच म्हंटली जाते. आरती मराठीत असली तरी लिहिली असते कन्नड लिपीमध्ये. खाली दिलेल्या आरतीचा भाग मी कन्नडमधून मराठीत जशाच्या तसा लिहिला आहे.आरतीचे पुस्तक छापायच्या आधी सुधारणा असतील (आहेतच!) तर क्रूपया सुचवाव्यात.
नमस्काराष्टक
अनंता तुला ते कसे रे स्तवावे |
अनंता तुला ते कसे रे नमावे ||
अनंता मुखांचा शिणे शेष गाता |
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा || १||
स्मरावे मनी त्वत्पदा नित्य भावे |
उरावे तरी भक्तिसाठी स्वभावे ||
तरावे जना तारुनी मायताता ||२|| नमस्कार...
वसे जो सदा दावाय संत लीला |
दिसे अज्ञ लोकांपरी जो जनाला||
परी अंतरी ज्ञान कैवल्यदाता ||३|| नमस्कार....
बरालादला जन्म हा मानवाचा |
नरा सार्थका सादनीभूत साचा||
धरा साईप्रेमा गळाया अहंता || ४|| नमस्कार...
धरावे करी सान अल्पज्ञ बाला |
करावे आम्हा धन्य चुंबेनि गाला ||
मुखी घाला प्रेमे खरा घास आता ||५|| नमस्कार...
सुरादिक ज्यांच्या पदा वंद्ताती |
शुकादिक ज्या ते समानत्व देती ||
प्रयागादि तीर्थ पदि नम्र होता ||६|| नमस्कार....
तुझ्या ज्या पदा पाहता गोपबाली |
सदा रंगली चिन्त्वरुपी मिळाली ||
करी रासक्रीडा सवे क्रूष्णनाथा ||७|| नमस्कार ....
तुला मागतो मागणे एक द्यावे |
करा जोडितो दीन अत्यंत भावे||
भवी मोहिनीराज हा तारि आता ||८|| नमस्कार.
अधोरेखित केलेले शब्दांचे अर्थ मलाही माहित नाहीत.शब्द तरी चुकीचे असावेत.
कोणाकडे मराठी आरती असेल तर क्रूपया तुलना केल्यास् बरे होईल.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
याद्या
4338
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही सुचवण्या
धन्यवाद
In reply to काही सुचवण्या by धनंजय
१. अनंता मुखांचा शिणे शेष
In reply to काही सुचवण्या by धनंजय
हा विचार केला होता, पण
In reply to १. अनंता मुखांचा शिणे शेष by प्यारे१
(सुधारणा सुचवण्यासाठी का
In reply to काही सुचवण्या by धनंजय
विधिनिषेध नाही :-)
In reply to (सुधारणा सुचवण्यासाठी का by आमोद शिंदे
नाईल काका त्यानी पूजा करावी
सादनीभूत
"बेंगळूरमध्ये काही मंदिरांत
एक प्रयत्न ...
चित्स्वरूपी असावे
+१
In reply to चित्स्वरूपी असावे by दिगम्भा
साईबाबा नमस्काराष्टक