स्वप्नांचे पान मुंबई

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
27 Jan 2011 - 5:12 pm

स्वप्नांचे पुर्णत्व येथे
स्वप्नांचे पान मुंबई

तरुणाईची सळसळ येथे
तारुण्याची जान मुंबई

वृत्तीतली धगधग येथे
जिवाचे रान मुंबई

मनामनाची ओढ येथे
मनातली जाण मुंबई

प्रीतीतला गोडवा येथे
प्रीतीचे गान मुंबई

लावण्य रुप्-सौंदर्य येथे
लावण्याची खाण मुंबई

नजर घायाळ होती येथे
नजरेचा बाण मुंबई

लखलखता श्रुंगार येथे
नटलेली छान मुंबई

क्षणाक्षणांस महत्त्व येथे
वेळेचे भान मुंबई

भविष्याची उज्वलता येथे
भविष्याचे ध्यान मुंबई

व्यवहारातली कुशलता येथे
व्यवहाराचे ज्ञान मुंबई

ध्येयाचे शिखर येथे
प्रगतीचे यान मुंबई

कष्टकरी हात येथे
हाताचे त्राण मुंबई

जीवनातले अनुभव येथे
अनुभवाचे दान मुंबई

मराठीचे अस्तित्व येथे
मराठीचा मान मुंबई

महाराष्ट्राचा अभिमान मुंबई
देशाची शान मुंबई
आमचा प्राण मुंबई
स्वप्नांचे पान मुंबई.........

- शब्दमेघ ( कविता पुन:प्रकाशित)

अद्भुतरसकवितासमाजजीवनमानरेखाटन

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

27 Jan 2011 - 5:27 pm | अमोल केळकर

मस्त

भविष्याची उज्वलता येथे
भविष्याचे ध्यान मुंबई

- १०० % सहमत

अमोल केळकर

प्रकाश१११'s picture

27 Jan 2011 - 5:28 pm | प्रकाश१११

कष्टकरी हात येथे
हाताचे त्राण मुंबई

जीवनातले अनुभव येथे
अनुभवाचे दान मुंबई

मस्त आणि छान. लिहित रहां. मस्तपैकी . !!

दिल्ली आणि कोलकाता यांवर गाणी ऐकली होती. ये है बॉम्बे मेरी जान असं जुनं गाणं होतं खरं..

पण अशी नवी नवी शहरांवर आधारित गाणी / कविता यायला हवीत.

मस्त आहे.

नरेशकुमार's picture

27 Jan 2011 - 6:13 pm | नरेशकुमार

** मारली, मुंबई पाहीली,
हे कडवे राहीले वाटते.

नाहि, हे कडवे नाहिये कवितेमध्ये

कच्ची कैरी's picture

27 Jan 2011 - 7:23 pm | कच्ची कैरी

'मुंबई मेरी जान' ह्यापेक्षा जास्त काय लिहिणार?

निवेदिता-ताई's picture

27 Jan 2011 - 9:35 pm | निवेदिता-ताई

मस्त .............मस्त...

प्राजु's picture

27 Jan 2011 - 9:58 pm | प्राजु

छान कविता...!
ह्यो आमचा गाव!!.. वाचा.

>>वृत्तीतली धगधग येथे
जिवाचे रान मुंबई

व्यवहारातली कुशलता येथे
व्यवहाराचे ज्ञान मुंबई

ध्येयाचे शिखर येथे
प्रगतीचे यान मुंबई

कष्टकरी हात येथे
हाताचे त्राण मुंबई

जीवनातले अनुभव येथे
अनुभवाचे दान मुंबई>>>

या ओळी विशेष आवडल्या गणेशा! बाकिच काव्य ही सुन्दर्च पण या ओळी स्वतः अनुभवलेल्या.

गणेशा's picture

28 Jan 2011 - 11:34 am | गणेशा

सर्वांचे मनपुर्वक आभार.

प्राजु जी तुमची कविता खुप छान आहे, भावली.
माझ्या एका मित्राने माझय मुंबई कवितेला पुण्याच्या कवितेने उत्तर दिले होते, ती ही कविता खुप छान आहे,
आता माझ्याकडे नाहिये , पण देयिन लवकरच.

तुमची कविता येथे पुन्हा पेस्ट करतो म्हणजे माझ्या लिखानात ती सेव्ह राहिन

--
सह्याद्रीच्या कुशीमध्ये, वसलं गं एक पूर..
पंचगंगेच्या तिरावर, माझं गं ते कोल्हापूर...

महालक्ष्मीचे ते करवीर, पन्हाळा-ज्योतिबा खांद्यावर..
परंपराही शूरवीरांची, सांगे माझे कोल्हापूर..

बाजी लावती कुस्तीगीर, भव्य रंकाळा दूरदूर..
परीस स्पर्शानं शाहूंच्या, भारलं गं कोल्हापूर...

कलेची पंढरीच ती, नृत्य- नाट्य संगीत सूर..
भालजींच्या 'जयप्रभा'त, रंगलं गं कोल्हापूर...

नवरात्राचा रंगबहार, दसरा-दिवाळीचा न्यारा नूर..
आनंदामध्ये रंगरंगूनी, सजून जाई कोल्हापूर...

नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं..
मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर...

साता समुद्रापार मी, माहेर ते माझे दूर..
मन नाही थाऱ्यावर, आठवे माझे कोल्हापूर........

- प्राजू

अमोल केळकर's picture

28 Jan 2011 - 12:48 pm | अमोल केळकर

मस्त कोल्हापूर

अमोल

गणेशा's picture

28 May 2020 - 8:35 am | गणेशा

काल, झी मराठी वर कुठलासा कार्यक्रम लागला होता..

स्टेज वर अवधूत गुप्ते ने कोल्हापूर कविता आणि गाणे म्हंटले..
तेंव्हा हि कविता पुन्हा आठवली..
या कवितेमुळे पुन्हा वर आणतोय...पुन्हा मागे पडण्यासाठी...

मुळ मुंबई कविता, मी 2007-08 ला लिहिली होती.
2010 ला बहुतेक मिपा वर दिलेली माझी पहिली दुसरी कविता असेल..

-
मुंबई आपल्याला आवडायचे.. आवडते..
Miss you mumbai...