लखोबा लोखंडे हरपले!!!
ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचे निधन झाल्याची बातमी आताच टीव्हीवर पाहिली. त्यांची नाटकं प्रत्यक्ष पाहायचा अनुभव नसला तरी दूरचित्रवाणीच्या सौजन्याने 'तो मी नव्हेच' , 'अश्रूंची झाली फुले' ही नाटके पाहल्याचे आठवते.त्यांच्या लखोबा लोखंडे बद्दल म्या पामराने काय बोलावे?? तीच त्यांची ओळख ठरून गेली होती. परवाच त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी सरकार कडून मदतीबद्दलची बातमी वाचली तेव्हाच मन चरकले होते.
अशा ज्येष्ट आणि श्रेष्ठ प्रभूतीला माझी मिसळपाव परिवारातर्फे श्रद्धांजली.
त्यांच्या नाना भूमिकांबद्दल अधिक माहिती इथेच द्यावी ही विनंती.वर्गीकरण
प्रतिक्रिया
गिरगावकर पंत म्हणजे अभिनयाचे