मन उगाच धावतं..कशापाठी वेडावतं!
जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं..
मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास!
जशी कोकीळाची साद अन् नुसताच त्रास!!
मन उगाच निस्तब्ध..काळजाचा थरकाप..
जसा स्तब्ध पाण्यावर, उठे तरंग..अश्राप!
मन उगाच तत्वज्ञ, करी अनंत विचार..
जशी अळवाच्या पानी मोतियाची थरथर!
मन उगाच अल्लड..दोन अश्रुंची झिम्मड!
जशी पावसाची सर..अलगद..अलवार..
मनं जुळून येतात..हातांमधे दोन हात..
जशी रात्र दिवसाची उलगडते पहाट!!
राघव
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2644
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली!
मस्त !
आवडली कविता. मन उगाच
+ १
In reply to आवडली कविता. मन उगाच by यशोधरा
मनं जुळून येतात..हातांमधे दोन
सुरेख!! एकदम तरल कविता.
+१
In reply to सुरेख!! एकदम तरल कविता. by प्राजु
सुंदर...
मस्त
सुंदर
आवडली
सुंदर कविता राघव. खूप आवडली!
आभार!