Skip to main content

(कांदे पोहे) ... नीगेटीव्ह शेड

(कांदे पोहे) ... नीगेटीव्ह शेड

Published on 07/01/2011 - 13:55 प्रकाशित मुखपृष्ठ
पॉझीटीव्ह शेड : कांदे पोहे [संवाद] पाउस बरसून गेला .. ओढ ढगांची कोणास निर्जन रानात ...शब्दांचा हा परिभास मनाच्या उंच लहरीवर.. ह्रद्याचा नकार फोल काय मिळवण्यासाठी .. व्यर्थ उगा ध्येयध्यास [गीत] मन हे बेरंग झाले बावरले ..सावरले.. स्वप्न पंखाशी घेवूनी आकाशी उंच उडाले || क्षण हे गोंधळलेले थोडे हिरमुसलेले अंगणात दूरवर आभाळ कोसळलेले || शब्द गहिवरलेले ओठात ओलावलेले (ओलावलेले = रडुन भिजलेले ) श्वासांच्या परिघात हृद्यगीत निजलेले प्रीतफुल कोमेजलेले सप्तसुर विरलेले अस्पष्ट प्रीत गाण ह्रद्यातच संपलेले - शब्दमेघ ( ७ जानेवारी २०११) नोट : विजुभाऊंच्या गतआयुष्य बेक्कार असणार्‍यांच्या वांदे पोह्या साठी ही कविता अर्पण
लेखनविषय:

याद्या 2196
प्रतिक्रिया 3

क्षण हे गोंधळलेले थोडे हिरमुसलेले अंगणात दूरवर आभाळ कोसळलेले || आभाळ कसे कोसळेल .आपल्या मनातले आभाळ आपण स्वच्छ ठेवलेच पाहिजे . मला असेच खूप वाटते . एखादी घटना आपल्या बाजूने घडते तेव्हा ते छान असते पण आपल्या बाजूने होत नाही तेव्हातर ते खूपच छान असते ,त्यात देवाचां हात असतो.

In reply to by प्रकाश१११

एखादी घटना आपल्या बाजूने घडते तेव्हा ते छान असते पण आपल्या बाजूने होत नाही तेव्हातर ते खूपच छान असते ,त्यात देवाचां हात असतो. हं असेच असते .. पण ती ही मनाचीच कल्पना असते असे माझे मत . तरीही असे वाटते.. आभाळ कोसळल्यावर जे उरते ते निरभ्रच असेल कदाचीत .. आभाळ भरुन आल्यावर पडलेला पाउस आणि नंतर उरलेले स्वच्छ निरभ्र आकाश म्हणजे जनु काय नविन पालवी फुटलेले आपले मनच .. माणसाचे मन म्हणजे असेच असेल कदाचीत , कोसळलेल्या आभाळाची कात टाकुन निरभ्र आकाशापरि ते पुन्हा स्वछ हेतुने इतस्त बागडत असेल . थांबतो .. विषयांतर होते आहे म्हणुन .. लेख लिहिला असता या विषयावर तर भरपुर बोलता आले असते .. बघतो नंतर निवांत प्रयत्न करुन अवांतर : मराठी शब्दांची काहिशी जादु डिस्कस करताना आभाळ .. आकाश ...नभ या गोष्टी एक असल्या तरी त्याचा अर्थ वेगळा आहे हे कळाले जे भरुण येते ते आभाळ जे निरभ्र असते ते आकाश जे उंच असते ते नभ