साँदेश

गणपा's picture
गणपा in पाककृती
6 Jan 2011 - 2:43 am

इंग्रजी नववर्षाच्या सर्व आंतरजालिय स्नेह्यांना शुभेच्छा !!!
म्हटलं या वर्षाची सुरवात एखाद्या गोड पाककृतीनं करावी. त्यात आज बाबांचा वाढदिवसही आहे. म्हणुन ही पाककृती खास त्यांच्यासाठी.

साहित्यः

प्रमाण साधारण १० साँदेशसाठी.

दिड लिटर दुध.
१ वाटी पीठी साखर
२-३ मोठे चमचे व्हिनेगर / लिंबाचा रस / दह्याचं पाणी (यापैकी काहीही एक)
केशर,पिस्ता /पाकातली चेरी/अननस/आंबा (जे हाताशी असेल ते)

कृती:

सर्वप्रथम दुध एका मोठ्या कढईत/भांड्यात तापवुन घ्या.
एक उकळी आली की आच मंद करुन, त्यात व्हिनेगर/ लिंबाचा रस / दह्याचं पाणी घालुन दुध फाडा.
कलथ्यान ढवळत रहा. पनीर तयार होतान दिसेल.

चाळणीवर स्वच्छ कापड आंथरुन घ्या.

फाटलेल दुध या चाळणीत टाकुन त्यावर लगेच बर्फाच गार पाणी टाकुन पनीर धुवुन घ्या.
थंड पाण्यामुळे पनीर मऊ होतं.

वाटल्यास वरुन वजन ठेउन पनीर मधल सगळ पाणी काढुन टाकाव.
पनीर हाताने कणिक तिंबतात तस तिंबुन घ्याव. (बोटांना पनीरचे छोटे छोटे गोळे लागता कामा नये.)
यासाठी खुप मेहेनत घावी लागते. श्रम वाचवायचे असल्यास १/२ मिनिट मिक्सर मध्ये फिरवल तरी चालेल. पण जास्त फिरवल तर पार लोळागोळा होईल. तेव्हा जरा जपुन. :)


मग त्यात पिठीसाखर घालुन नीट मळुन घ्याव.

किंचीत पाणी आहे अस जाणवल्यास कढई मंद आचेवर ठेउन तयार पनीरचा गोळा त्यात थोडावेळ परतावा.

मिश्रण थोडं गार झाल्यावर हातावर पेढे वळुन किंवा साचे असल्यास साच्यात टाकुन आकार द्यावा.
मध्ये बोटाने थोडा दाब देउन खड्डा करावा. त्यात केशर मिश्रीत दुधाचं बोट लावुन वरुन सजावटीचे जिन्नस टाकावे.

प्रतिक्रिया

प्राजु's picture

6 Jan 2011 - 3:11 am | प्राजु

:)
क्या बात है!

रेवती's picture

6 Jan 2011 - 4:31 am | रेवती

खूपच छान!

नंदन's picture

6 Jan 2011 - 4:41 am | नंदन

झक्कास पाकृ, गणपाभौ.

< पीजे वॉर्निंग सुरू> 'संदेसे आते है, हम तडपाते है' हे गाणं आठवलं ;) <पीजे वॉर्निंग समाप्त>

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Jan 2011 - 5:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हम तडपाते है

ये संदेस हजम नहीं हुआ! ;-)

गणपा, पाकृ एक नंबर ... नेहेमीप्रमाणेच.

नंदनने शुद्धलेखनात केलेली चुक पाहुन साँदेश दसपट गोड लागला! >)

गणपाशेट, तुमच्या पाकृने नंदनला शुद्धलेखन विसरवले ह्यापेक्षा मोठी पावती मिळणे अशक्य हो!

विकास's picture

6 Jan 2011 - 5:17 am | विकास

कधी येऊ? :-)

छोटा डॉन's picture

6 Jan 2011 - 10:09 am | छोटा डॉन

>>कधी येऊ?

प्रिसाईजली एवढेच विचारतो :)

- छोटा डॉन

अवलिया's picture

6 Jan 2011 - 12:33 pm | अवलिया

>>कधी येऊ?

एक्जॅक्टली एवढेच विचारतो :)

आत्मशून्य's picture

6 Jan 2011 - 5:51 am | आत्मशून्य

.

पिंगू's picture

6 Jan 2011 - 6:10 am | पिंगू

गोडाचा नैवेद्य आवडला बुवा...

- सोंदेशप्रेमी पिंगू

मदनबाण's picture

6 Jan 2011 - 6:56 am | मदनबाण

भालो एकदम भालो... :)

(बंगाली मिठाई प्रेमी) ;)

बेसनलाडू's picture

6 Jan 2011 - 7:03 am | बेसनलाडू

(खवय्या)बेसनलाडू

पंगा's picture

6 Jan 2011 - 9:55 am | पंगा

(आता याची मांसाहारी/मत्स्याहारी आवृत्ती कधी येणार म्हणे? किंवा, कशी आली नाही अजून?)

लवंगी's picture

6 Jan 2011 - 8:33 am | लवंगी

एकट्याने मटकावले का सगळे?

यशोधरा's picture

6 Jan 2011 - 8:55 am | यशोधरा

भीषॉण शुंदॉर गॉणपॉ!

आशिष सुर्वे's picture

6 Jan 2011 - 9:33 am | आशिष सुर्वे

खूब भालो गण्पॉ दादा!!
आमाके दाओ तो..

मी_ओंकार's picture

6 Jan 2011 - 10:11 am | मी_ओंकार

साँदेश हा खास बंगाली प्रकार. तिथला रशगुल्ला जितका सगळ्यांना माहीत आहे तितका हा माहीत नाही. एकदम अशा खास गोष्टीला हात घालून तो यशस्वी पार पाडल्याबद्दल अभिनंदन गणपाभौ.

- ओंकार.

अमोल केळकर's picture

6 Jan 2011 - 10:13 am | अमोल केळकर

छान . आपल्या बाबांना आमच्या तर्फेही वाढदिवसाच्या शुभेच्छा :)

अमोल केळकर

पियुशा's picture

6 Jan 2011 - 10:53 am | पियुशा

अम्म अम्म अम्म
लय आवडला आम्हाला साँदेश !

नगरीनिरंजन's picture

6 Jan 2011 - 11:24 am | नगरीनिरंजन

अरे!! कुठे फेडाल ही पापे?
एकतर इथे बंगाली हलवाई मिळणे दुरापास्त. इतकं खावसं वाटतंय की आता झक मारून करणे आले.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jan 2011 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार


कोणाकडे ह्या गणपाचा पत्ता हाय काय ?

कुसुमिता१२३'s picture

6 Jan 2011 - 12:31 pm | कुसुमिता१२३

मस्तच! करुन बघेन एकदा!

इन्द्र्राज पवार's picture

6 Jan 2011 - 12:43 pm | इन्द्र्राज पवार

"गणपाभाऊ....मला तुमचा पाहुणा होण्यासाठी काय केले पाहिजे...?"

तुमच्या बाबांना वाढदिवसानिमित्य हार्दिक शुभेच्छा...!!

इन्द्रा

पर्नल नेने मराठे's picture

6 Jan 2011 - 12:49 pm | पर्नल नेने मराठे

तुमच्या बाबांना वाढदिवसानिमित्य हार्दिक शुभेच्छा...!!

गणपा तु आम्हा बायका कम मुलिंना उगाच कॉम्प्लेक्स देत जाउ नकोस ..याद राख.

सिद्धार्थ ४'s picture

6 Jan 2011 - 12:49 pm | सिद्धार्थ ४

एक नबर......
And happy B'day to Uncle

खादाड अमिता's picture

6 Jan 2011 - 1:04 pm | खादाड अमिता

तुमच्या उत्साहाला सलाम!

झील's picture

6 Jan 2011 - 1:12 pm | झील

काय बोलणार शब्दाच नाही.

नक्की करुन बघाणार.

स्वाती दिनेश's picture

6 Jan 2011 - 2:22 pm | स्वाती दिनेश

मस्तच रे, एकंदरीतच बंगाली मिठाई करण्याच्या वाटेला मी फार क्वचित जाते, :) कारण ती फसेल असे सारखे वाटत असते,आता मात्र तुझ्या साँदेशांनी पार लालचावले आहे..
तुला स्टँडिग ओवेशन!
स्वाती

शाहरुख's picture

6 Jan 2011 - 11:05 pm | शाहरुख

>>तुला स्टँडिग ओवेशन!

+१ !!
बेडवरून उठून परत बसलो गणपाजींसाठी !

जागु's picture

6 Jan 2011 - 2:37 pm | जागु

नेहमी प्रमाणेच छान.

आई-वडिलांना आपल्याच मुलाने स्वतःच्या हाताने बनवून गोडाधोडाचा 'साँदेश' नैवेद्य म्हणून द्यावा याहूनही मोठी मानवंदना नाही !
पाकृ नेहमीप्रमाणेच Too Shweet to appreciate :-)
तुमच्या बाबांना माझ्याकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्मिता.'s picture

6 Jan 2011 - 3:43 pm | स्मिता.

साँदेश आवडले. कृतीसुद्धा आम्हा पामरांना जमेल अशी सोपी वाटतेय.

कवितानागेश's picture

6 Jan 2011 - 4:03 pm | कवितानागेश

मागे एकदा माझे रसगुल्ले फसले आणि पाकात फसफसून हसले.
त्यानंतर मी बंगाल्यांच्या वाटेला गेले नव्हते.
ही कृती खूपच सोप्पी आहे. नक्की करुन बघेन.
धन्यवाद.

जिवाणू's picture

6 Jan 2011 - 5:05 pm | जिवाणू

खूपच छान!

तुमच्या बाबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!!

मेघवेडा's picture

6 Jan 2011 - 5:30 pm | मेघवेडा

तेज्यायला सुटी अख्खी इथंच देशात फिरून वाया घालवली.. नायजेरियाला गेलो पायजे होतो! :D

सॉल्लेट रे गणाभौ! तुझ्या बाबांना शुभेच्छा!

रसगुल्ले फसले की मी संदेश करते. पण तुझ्याएवढ्या शिस्तीत नाही. त्यामुळे ते कधी कोरडे होतात नि फुटतात तर कधी वाटीत घेऊन खाण्याइतके सैल !

आज माझं डोकं न चालवता तुझ्या पद्धतीने करून बघते :)

फोटो बघुन पटकन हात पुढे होतोय !!

आजानुकर्ण's picture

6 Jan 2011 - 6:39 pm | आजानुकर्ण

मस्तच गणपाशेठ!

चित्रा's picture

6 Jan 2011 - 7:03 pm | चित्रा

लग्नानंतर आपल्या सुनेला स्वैपाकाचा आळस आहे, आणि सून नवर्‍याघरी नवर्‍याच्या अनुपस्थितीत फारच वेळ फुकट दवडते आहे, हे पाहून आमच्या सासुबाईंनी मला स्वखर्चाने एका बंगाली मिठाया आणि इंडियन चायनीज शिकवणार्‍या बाईंच्या शिकवणीला धाडले होते त्याची आठवण झाली. बहुतेक दुपारची ब्याद घरातून घालवून देत असाव्यात. ते शिकवणीच्या रेसिप्यांचे कागद अजूनही नीट ठेवून दिले आहेत. अधनंमधनं आवरताना लागतात हाताला. :)

पण गणपाभौ, तुमच्या उत्साहाला सलाम. वडिलांना वाढदिवसाच्या आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.

प्रभो's picture

6 Jan 2011 - 8:24 pm | प्रभो

भारी रे!!!!

मराठे's picture

6 Jan 2011 - 8:39 pm | मराठे

অতিশয় মিঠে

ज्योति प्रकाश's picture

6 Jan 2011 - 9:13 pm | ज्योति प्रकाश

गणपाभौ सोप्पी पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद.
आपल्या वडिलाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्छा.

अरेच्या साँदेश इतका सोप आसतो होय! उगाच दुकानात्रून आणायचो.. आता घरीच करून बघतो.
धन्यु! (गणपाची पाकृ वाचून नववर्षाचा संकल्प मोडला आहे :) )

प्राजक्ता पवार's picture

7 Jan 2011 - 2:59 pm | प्राजक्ता पवार

पाकृ व फोटो दोन्ही नेहमीप्रमाणेच मस्तं .

माझा वीकपॉईंट...
गणपा भाउ लगे रहो..
आजपर्यंत फक्त विकत घेउन खात होतो..

वहिनी's picture

17 Jan 2011 - 1:56 pm | वहिनी

म स्त आहे